काळजाचा ठाव घेणार 'काटा किर्र'‘लावण्यवती’अल्बमचे अखेरचे गाणे भेटीला .



एकविरा म्युझिक प्रस्तुत 'लावण्यवती' या अल्बममधील ' गणराया' , 'करा ऊस मोठा', 'लावा फोन चार्जिंगला' या तीनही गाण्यांना संगीतप्रेमींना प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या अल्बममधील 'काटा किर्र' हे अखेरचे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘लावणी नाही… कापणी’ या टॅगलाईननुसार या गाण्यातूनही आपल्या लोककलेचे दर्शन घडणार आहे. अवधूत गुप्ते यांनी शब्दबद्ध  केलेल्या आणि संगीत दिलेल्या 'काटा किर्र' या गाण्याला मुग्धा कऱ्हाडेच्या  ठसकेबाज आवाज लाभला आहे. तर अभिनेत्री पूर्वा शिंदेच्या बहारदार नृत्याला ऋषी देशपांडेची साथ लाभली आहे. त्यामुळे यात अधिकच रंगत आली आहे. ‘काटा किर्र’चे नृत्य दिग्दर्शन 'सुंदरीकार' आशिष पाटील यांचे असून चैतन्य पुराणिक यांनी याचे छायाचित्रीकरण केले आहे. नुकतीच या गाण्याचा प्रोमो भेटीला आला असून २६ डिसेंबरला हे लाजवाब गीत आपल्याला पाहायला मिळणार आहे. 

'लावण्यवती' अल्बमबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात,   "आपल्या महाराष्ट्राची लोककला जपली पाहिजे, यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो आणि म्हणून तुमच्यासाठी  ‘लावण्यवती' या अल्बममधील 'काटा किर्र' हे चौथे आणि शेवटचे गाणे तुमच्या भेटीला येत आहे.   हे गाणे धमाल उडवून देणारे आणि प्रत्येकाला आवडेल अशी आहे."

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.