छत्रपती संभाजी महाराजांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाची झलक प्रदर्शित.



अलीकडेच आलेल्या 'शिवरायांचा छावा' चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढवली होती. त्यातच आणखी एका नव्या पोस्टरने आपल्या उत्सुकतेमध्ये भर घातली आहे. दणकट शरीरयष्टी.. धारदार नाक... डोळ्यांत फुललेला अंगार.. ती मनाचा ठाव घेणारी भेदक नजर आणि मागे सिंहाच्या रुद्रावताराची छबी. अगदी सूचक अशा या पोस्टरमधून 'शिवरायांचा छावा' आपल्या समोर मोठया दिमाखात अवतरला आहे. पण.. अजूनही या कलाकाराची ओळख आपल्याला पटलेली नाही. शंभूराजेंच्या तेजाळत्या व्यक्तिमत्त्वाची आठवण करून देणारा हा नवा चेहरा नेमका आहे तरी कोण..? यासाठी आपल्याला अजूनही वाट पहावी लागणार आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगणाऱ्या या  चित्रपटातील प्रमुख पात्र निभावणाऱ्या या कलाकाराचे नाव घोषित करण्यात येणार आहे. 

ए. ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत 'शिवरायांचा छावा' नववर्षात म्हणजेच *१६ फेब्रुवारी २०२४* ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मल्हार पिक्चर्स कं.चे वैभव भोर, किशोर पाटकर, मधू यांनी या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सह-निर्मिती भावेश रजनीकांत पंचमतीया यांनी केली आहे. संभाजी महाराजांच्या धगधगत्या अजेय पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. गाण्यांना साजेसं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी ए. ए . फिल्म्स सांभाळत आहे.

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.