'तंजावर' येथे १०० व्या नाट्य संमेलनाचा प्रारंभ.


 
तंजावर दि. २७    नाटककार शहाजी (शाहराज) राजे भोसले हे मराठी रंगभूमीचे पहिले नाटककार असून , 'लक्ष्मी नारायण कल्याण' हे पहिले मराठी नाटक होय, असे उद् गार ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी, तंजावर येथील सरस्वती महालात संपन्न झालेल्या कार्यक्रमात काढले. 
१०० व्या  मराठी नाट्य संमेलनाचा प्रारंभ शाहराज राजे भोसले यांच्या वाङमयाला वंदन करून व नटराज पूजन करण्यात आले. त्यावेळी  नाटककार प्रेमानंद गज्वी बोलत होते. पुढे गज्वी म्हणाले, शाहराजांनी २२ मराठी,२० तेलगु, १ संस्कृत,१ तमिळ व ३ हिंदी नाटके लिहिली असून ते मराठी रंगभूमी बरोबरच तामिळ आणि हिंदी रंगभूमीचेही आद्य नाटककार होते. ते काव्य भाषा शास्त्राचे अभ्यासक होते. त्यांनी बारामास आणि षडरूतुवर्णन ही काव्ये लिहिली असून ते शूर, राजकारणपटू रसिक, कलाज्ञानी आणि नृत्य कलेचे मर्मज्ञ होते. असेही गज्वी म्हणाले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला नटराजाचे पूजन करून आणि शाहराजाचे वाङमयाला पुष्पांजली वाहून करण्यात आली.
       यावेळी केलेल्या भाषणात शिवाजी  राजे भोसले म्हणाले, "मी  व्यंकोजी राजघराण्यातील आठवा वारसदार आहे याचा मला मोठा अभिमान आहे. राजांच्या मुळेच मला सन्मान मिळत आला. १०० व्या नाट्य संमेलनाचे निमित्ताने, महाराष्ट्रातून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदचे पदाधिकारी इथं तंजावरला आले.  ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष नाटककार प्रेमानंद गज्वी स्वत: शाहराजांना वंदन करायला इथं आले.   नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष सतीश लोटके कार्यकारी समिती सदस्य गिरीश महाजन, नियामक मंडळ सदस्यआनंद कुलकर्णी तंजावर इथे आले याचा खूप आनंद झाला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तामिळ विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. तुरूवेल्लुवन, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी दीपक जेकब उपस्थित होते.यानिमित्ताने नाट्य, नृत्य, गायन कार्यक्रम सादर करण्यात आले. 
नाटककार शहाजी (शाहराज) राजे भोसले यांच्या 'लक्ष्मी नारायण कल्याण' या नाटकातील एक प्रवेश नाट्यसंमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी व कोषाध्यक्ष सतीश लोटके सादर केला. रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमास उस्फुर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेकानंद गोपाळ यांनी केले.


Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.