तरुणाईच्या भरारीला झी युवाचं आकाश! रविवार ३१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता झी युवा वाहिनीवर झी युवा सन्मान पुरस्कार सोहळा .



आजची तरुणाई सतत नवीन शोध घेत आहे.ती ज्या क्षेत्रात काम करते तिथे मळलेल्या वाटेपेक्षा नवी वाट तयार करण्यासाठी धडपडत आहे. त्यातही थेट लोकांशी संबंधित असलेल्या क्षेत्रातील तरुणाईचं काम आणि त्यांच्यातील समाजभान हे कौतुकास्पद आहे. अशा तरुणाईचा चेहरा, त्यांच्या कामाची पावती समाजासमोर आणण्याची विधायक पाऊल उचललं आहे झी युवा या वाहिनीने. युवकांच्या मनातील संकल्पनांना आकार देणाऱ्या झी युवा वाहिनीकडून युवा सन्मान पुरस्काराच्या रूपाने मिळणारी शाब्बासकी नेहमीच सक्रिय तरुणाईचं बळ वाढवत आली आहे.

यावर्षीही झी युवा सन्मान पुरस्काराच्या निमित्ताने समाजातील विविध १२ कार्यक्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या तरुणाईला झी युवा सन्मानचं आकाश मिळालं आहे. रविवार ३१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता झी युवा वाहिनीवर झी युवा सन्मान पुरस्कार सोहळा प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्या सहकार्याने हा सोहळा प्रसारीत होणार आहे.

यंदाच्या पुरस्कारांसाठी निवडण्यात आलेल्या तरुणांचं काम थक्क करणारं तर आहेच पण प्रचंड प्रेरणादायीही आहे.

यंदाच्या झी युवा सन्मान पुरस्काराचे मानकरी:
झी युवा नेतृत्व सन्मान :मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे
झी युवा तेजस्वी चेहरा सन्मान :अभिनेत्री शिवानी सुर्वे
झी युवा शैक्षणिक सन्मान: प्रा. संदीप गुंड
झी युवा कला सन्मान: चित्रकार भटू भामरे
झी युवा डिजिटल कला सन्मान:अतरंगी कलाकार अथर्व सुदामे
झी युवा साहित्यिक सन्मान: लेखक प्राजक्त देशमुख
झी युवा विज्ञान व तंत्रज्ञान सन्मान:डॉ. अमेय देसाई
झी युवा बळीराजा सन्मान:शेतकरी काव्या दातखिळे
झी युवा सामाजिक जाणीव सन्मान:डॉ. विजय आणि डॉ. मनीषा सोनावणे
झी युवा क्रीडा सन्मान:खेळाडू देविका घोरपडे
झी युवा संगीत सन्मान:संगीतकार देवदत्त बाजी

हे तरुण प्रेरणादायी आहेत आणि त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडून येत आहेत.तर  रविवार ३१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता झी युवा वाहिनीवर झी युवा सन्मान पुरस्कार सोहळा पहायला विसरु नका.

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.