झी टॉकीजचा विशेष उपक्रम: वारीत विठोबा-रुक्मिणीची भव्य मूर्ती आणि वारकऱ्यांनी स्वतःच्या हातांनी बनवली माऊलींची सुंदर वस्त्रे .



पंढरपूरची वारी म्हणजे संतांचा उत्सव, यंदा झी टॉकीजच्या विशेष आयोजनामुळे अधिकच रंगतदार झाली आहे. झी टॉकीजने दोन भव्य कॅन्टर ट्रकची उभारणी केली असून, त्याठिकाणी १२ फूट उंचीच्या विठोबा आणि रुक्मिणीच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे, ज्यामुळे वारीला एक विशेष आकर्षण मिळाले आहे.
.  वारीच्या २१ दिवसांच्या प्रवासात झी टॉकीजची टीम ३०० दिंड्यांसह सहभागी झाली . पण झी टॉकीज यंदा वारीला आणखी एक अनोखी आयडिया घेऊन आली . त्यांनी प्रत्येक वारकऱ्याच्या मदतीने कॅन्टर ट्रकवर माऊलींची वस्त्रे आणि रुक्मिणीची साडी  बनवण्याचे नियोजन केले आणि सर्व वारकर्यांनी केलेल्या श्रमदानामुळे माऊलींची अतिशय सुंदर अशी वस्त्रे तयार झाली आहेत .  ही वस्त्रे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील विठ्ठल रुक्मिणीला अर्पण करण्यात येणार आहे, ज्यामुळे वारीचे धार्मिक महत्त्व आणखी वाढणार आहे.
   गेल्या वर्षी झी टॉकीजने तुकाराम महाराजांच्या मार्गाचा अवलंब केला होता, तर यंदा ते ज्ञानेश्वर महाराजांच्या मार्गाने प्रवास करणार आहेत. या वर्षीची वारी २९ जून ते १७ जुलै दरम्यान सुरु आहे.
   या कॅन्टर ट्रकवर अनेक सेलिब्रिटींनाही माऊलींचे दर्शन घेतले. अभिनेता-अँकर अमित रेकीने  तिथे उपस्थित राहून सेलिब्रिटींसोबत संवाद साधला  आणि वारकऱ्यांशी त्यांच्या प्रवासाबद्दल चर्चा केली. 
     झी टॉकीजच्या या नवकल्पनाशील उपक्रमामुळे वारीची धमाल आणखी वाढली आहे. त्यामुळे यंदाची वारी अधिक उत्साहपूर्ण, रंगतदार आणि विशेष ठरली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वैत मसूरकर दिग्दर्शित 'छबी' चित्रपट २५ एप्रिलला.....अभिनेता समीर धर्माधिकारी, अभिनेते मकरंद देशपांडे यांची मध्यवर्ती भूमिका

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...