दानशूर भागोजीशेठ कीर यांच्या नियोजित स्मारकाचा भूमिपूजन सोहळा मुंबईत समारंभपूर्वक संपन्न...!
दानशूर , समाजभूषण, महामानव भागोजीशेठ कीर यांच्या नांवे उभारण्यात येणाऱ्या नियोजित स्मारकाचे भूमिपूजन मान. महाराष्ट्र राज्य मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२४ रोजी करण्यांत आले. छत्रपती श्री शिवाजी महाराज पार्क येथील दादर येथील कै. भागोजीशेठ कीर स्मशानभूमी समोरील एक मोकळ्या भूखंडावर उभारण्यात येणाऱ्या महामानव कै. श्री. भागोजीशेठ कीर यांच्या नियोजित स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्यासह इतर अनेक लोकार्पण करण्यांत आलेल्या विकास कामांचे यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे ऑनलाईन उद्घाटन जवाहर बालभवन, चर्नी रोड, पश्चिम,मुंबई येथे करण्यांत आले.
सदर कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. दीपक केसरकर, मा. खासदार श्री. राहुल शेवाळे , मा. कालिदास कोळंबकर , आ. यामिनी जाधव आदी मान्यवर मंडळी मंचकावर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात महामानव भागोजीशेठ कीर यांच्या जीवन प्रवासावर आधारित एक छोटीशी ध्वनी चित्रफित दूरदृष्यप्रणाली द्वारे मोठ्या स्क्रिनवर प्रदर्शित करताच उपस्थित भागोजी प्रेमींनी एकच जल्लोष केला.
समाजभूषण, महामानव कै.भागोजीशेठ कीर यांचे उचित स्मारक त्यांनी सरकारला दान केलेल्या ९ एकर भूखंडावरच व्हावे, अशी आग्रही मागणी मागील अनेक वर्षांपासून तब्बल १२ पत्रे लिहून सरकार दरबारी सातत्याने पाठपुरावा करणारे अखिल भंडारी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. नविनचंद्र भालचंद्र बांदिवडेकर साहेब यांच्यासह कै. भागोजी कीर यांचे नातू अंकुर कीर, आध्यात्मिक गुरु अविनाशजी महाराज, तिमिरातुनी तेजाकडे फेम सत्यवान रेडकर सर, प्रकाश कांबळी, न्यू इंग्लिश स्कूल, जैतापूरचे जगदिश आडविरकर, सौ.सुस्मिता तोडणकर, किशोर केळसकर, युवराज शिरोडकर, प्रविण आचरेकर, सुदर्शन केरकर, वैभव तारी, सौ. निशा भांडे, शशांक पाटकर, सुरेश पटेल, विलास कीर, किशोर बागकर, प्रशांत पाटकर, सुदेश आडविरकर, सुहास पाटील, गीतकार धनंजय कीर, साहित्यिक विजय तारी, हेटकरीचे सुरेश कापडोस्कर, विजयाताई कुडव (अलिबाग तालुका भंडारी मंडळ) दूरदृश्यप्रणाली संयोजक जितू तोडणकर, दिग्दर्शक आबा पेडणेकर, चित्रफीत दिग्दर्शक गणेश तळेकर, तसेच कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी संस्थेचे सहसचिव संतोष बाबुराव मांजरेकर आणि मुंबई, कोकणातील भागोजी प्रेमी भंडारी समाज बंधु-भगिनी या अभूतपूर्व सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment