बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी केला समित कक्कड दिग्दर्शित 'रानटी'चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित.

नावीन्याचा ध्यास घेऊन वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक समित कक्कड मराठी सिनेसृष्टीत रानटी धडाकेबाज अॅक्शनपट घेऊन येतायेत. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला सगळ्यात मोठा अॅक्शनपट असणार आहे. अॅक्शनचे बादशहा असणारे प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित केला आहे.
    माणसात दोन शक्ती कार्यरत असतात. एक त्याला वाईट आणि अयोग्य गोष्टींकडे आकर्षित करते तर दुसरी त्या बाबतीत नकारघंटा वाजवून चांगल्याकडे खेचू पाहते.पण जेव्हा माणसातील रानटी शक्ती इतकी प्रबळ होते की माणसातील चांगले गुण नाहीसे होत थैमान घालणारी माणसं दिसू लागतात. याच थैमान शक्तीला आवरण्यासाठी काही जणांना रानटी व्हावे लागते. आजूबाजूची परिस्थिती त्यांना तसं बनवत असेल कदाचित त्यामुळेच काही रानटी असतात तर काही बनतात… असाच रानटीपणा घेऊन या दशकातील सर्वात मोठा 'अँग्री यंग मॅन' दिग्दर्शक समित कक्कड २२ नोव्हेंबरला आपल्या भेटीला घेऊन येणार आहेत. दमदार व्यक्तिरेखा, अॅक्शन, इमोशन्स, सूडनाट्य असा जबरदस्त मसाला असलेला हा धमाकेदार चित्रपट असल्याचे दिग्दर्शक समित कक्कड सांगतात. 
   आपल्या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून कायम उत्तम कलाकृतीला पाठिंबा देणारे निर्माते पुनीत बालन म्हणाले की, मराठीत अॅक्शन, ड्रामा, इमोशनचा पुरेपूर मसाला असलेले चित्रपट क्वचितच दिसतात. त्यामुळे प्रेक्षकांना आवडेल असं काहीतरी हटके मसालेदार विषय घेऊन येण्याचा आमचा मानस होता. मराठीत एक वेगळा प्रयत्न आम्ही ‘रानटी’ चित्रपटाच्या निमित्ताने केला आहे हा प्रयत्न प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.
   भगवान विष्णूंचा सर्वात उग्र अवतार म्हणून नरसिंह अवतार ओळखला जातो. पातळपूरातील अशाच अधर्मी वृत्तीचा नाश करण्यासाठी विष्णु येतोय. याच विष्णूचा दमदार अवतार ट्रेलर मध्ये पहायला मिळतोय. पिळदार शरीरयष्टी, वाघासारखी नजर, चित्यासारखा वेग लाभलेलं भारदस्त व्यक्तिमत्त्व असलेले अभिनेते शरद केळकर ‘रानटी’ मध्ये शीर्षक भूमिकेत आहे. ‘रानटी’ च्या पोस्टर, टीझर, ट्रेलर मधून शरद यांचं 'अँग्री यंग मॅन' रूपच समोर आलं आहे. स्वत:चं अस्तित्व सिद्ध करताना कुटुंब आणि प्रेमावर घाला घालणाऱ्या खलनायकाला धोबीपछाड देणारा डॅशिंग विष्णूला रुपेरी पडद्यावर पहाणं ही प्रेक्षकांसाठी जणू एक मेजवानीच ठरणार आहे. 
   अखेरच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यासाठी विष्णूचा ‘रानटी’ अवतार सज्ज झाला आहे. प्रसिध्द अभिनेता शरद केळकर यांच्यासोबत संजय नार्वेकर, संतोष जुवेकर, नागेश भोसले, जयवंत वाडकर, संजय खापरे, छाया कदम, अक्षया गुरव, कैलास वाघमारे, माधव देवचक्के, सुशांत शेलार, हितेश भोजराज, सानवी श्रीवास्तव,नयना मुखे अशी तगडी स्टारकास्ट ‘रानटी’ चित्रपटात आहे. 
   ‘रानटी’ चित्रपटासाठी हृषिकेश कोळी यांचं लिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम ह्या चित्रपटाला लाभलेली आहे.

२२ नोव्हेंबरला ‘रानटी’ आपल्या नजीकच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय.

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.