'श्री गणेशा'.........वाटेवर गवसलेला मार्ग. समीक्षण: वैभव बागकर.

'श्री गणेशा'.........वाटेवर गवसलेला मार्ग.
समीक्षण: वैभव बागकर.

     शासकीय सुधारगृहातून काही काळासाठी रजा घेऊन टिकल्या या आपल्या मुलाला वडिल,त्याची आई आजारी असल्याचे कारण देऊन कोकणातील त्यांच्या गावी नेतात,हा प्रवास सुरू होतो आणि हळूहळू कथापट उलगडत जातो.बाप मुलांचे संबंध,आईचा आजार, सुधारगृहात केलेली रवानगी, हा 'टिकल्या' त्याचे नकळत्या वयातील प्रेमसंबंध,वडिलांचे विविध उद्योग,नफातोटा,वाटेत कोकणात जाणारी फुडब्लॉगर दिपाली वेंगुर्लेकर,त्यांची होणारी सहप्रवासी,तिचे वडील भाई वेंगुर्लेकर,त्यांची गोष्ट,असा एकाच गाडितून चाललेला प्रवास, वडिल मुलगा यांचे नातेसंबंध, मतभेद,रागलोभ,काळजी,यासगळ्यातुन चाललेला प्रवास कथापट हा पथ चित्रपट या शैलीतील असल्याने सतत प्रवास, काही काळासाठी थांबणे,आणि उलगडत जाणारा जीवन प्रवास, विविध गोष्टीतून समोर येणारे जीवनातील प्रसंग,त्यांचा उल्लेख, हळूहळू माणसांची स्वभाव ओळख,अशातून चाललेला प्रवास केवळ रस्त्यावरचा नाही तर विविध पातळ्यांवर तो चालू राहतो.तशी गोष्ट छोटी पण त्याचा आवाका मोठा,
     कथापट हा प्रवासात मुलगा वडिल यांच्यातील संबंध,सतत एकमेकांच्या वर कुरघोडी करणारे संवाद,यातुन विनोद निर्मिती होते आणि हसु येतं, आपल्याला जरी हसु येत असलं तरी, त्यांच्यातील तो गंभीर विसंवाद आहे.टिकल्या हा आपल्या आईला भेटायला चाललोय या भावनेने प्रवास करतोय,पण वडिलांशी त्यांचा अजिबात सुसंवाद होतं नाही, मधेच येणारा अंमली पदार्थ तस्करीचा विषय,तर वाटेत भेटणारी आणि त्यांची सहप्रवासी झालेली दिपाली कोणालाच ओळखत नाही पण आपल्याला आपल्या घरी जाण्यासाठी झालेली सोबत,सोय या दृष्टीकोनातून ती पाहते पण हळूहळू ती वडिल मुलगा यांच्या संबंधात ती स्वताचं नातं निर्माण करते,टिकल्या ची आधीची प्रेयसी आत्ता संसारात रमलेय,तिला आता टिकल्या बद्दल कोणतीही जवळीक उरलेली नाही,तर केवळ भौतिक सुखासाठी आपण त्याचा वापर केला याची तिला जाणीव आहे,ती मिळविण्यासाठी टिकल्या ने काय केलं याबद्दल तिला काही देणंघेणं नाही,तर दिपाली काही काळासाठी त्यांच्या सोबत असली तरी तिला कुठंतरी भावनिक ओलाव्याची जाणीव झालेली आहे,तिथंच कुठतरी काही रुजायला सुरुवात होते.प्रवासाच्या एका टप्प्यावर ती आपल्या घरी पोहोचते आणि टिकल्या आणि त्याच्या वडिलांशी ओळख करुन देते,भाई वेंगुर्लेकर,हा एकेकाळी मोठा गुंड, भाईगिरी,अशा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला,पण आयुष्यातील या वयाच्या टप्प्यावर मात्र पार हादरून गेलेला, सुरक्षारक्षक घेऊन सतत फिरणारा,कायम असुरक्षित, पश्चात्ताप करणारा पण आता तो काहीच करु न शकणारा,त्यांची गोष्ट जशी उलगडत जाते तशी टिकल्याने घरातच चोर्यामार्या करुन त्यांच्या प्रेयसीला दिलेल्या भेटवस्तू, यासाठीच त्याला वडिलांनी सुधारगृहात टाकलंय,पण त्याला ही गोष्ट चुकीची वाटते.तर भाई वेंगुर्लेकरला आपल्याला वडिलांनी वेळीच का सुधारले नाही काहि शिक्षा का केली नाही, याबद्दल जाणीव होताना दिसते,भाई वेंगुर्लेकर हा पार आतून तुटलेला,सतत जिवाच्या भीतीने ग्रस्त आहे,टिकल्याचे वडिल,त्याची भूमिका आता बरोबर आहे,यांची जाणीव टिकल्याला झालेय पण. तो ती मान्य करत नाही, अशाच त्यांचा पुढचा प्रवास सुरु होतो, प्रवासात एक हृद्य प्रसंग येऊन जातो, आणि टिकल्या काहिसा सावरतो,ते अखेर कोकणातील त्यांच्या घरात पोचतात टिकल्या आपल्या आईला भेटतो, आणि एक दुसरं सत्य समोर येतं.
कथापटात खरं तर आईला तिच्या गंभीर आजारात भेटायला जाणारा मुलगा,त्याचीआई बद्दलची ओढ दिसते पण,आपण नेहमीच आई मुलाच्या नात्यावर आधारित चित्रपट पाहतो पण इथे आई आहे पण कथापट घडतोय मित्र वडिल मुलाच्या नातेसंबंधांवर, अर्थातच सतत एकमेकांवर कुरघोडी करणारे बापलेक भावनिक पातळीवर एकत्र येत नाही,ते केवळ सोबत आहेत,जेव्हा ते भावनिक सलगी करतात तेव्हा ते नातं एकतर्फी होतं,पण ज्यावेळी कथापट उत्तरार्धात अंतिम टप्प्यात येतो तेव्हा मात्र पुन्हा नव्याने बापलेकाच्या नात्याची नांदी सुरु होते.
     कथापटात बापलेक झालेले अनुक्रमे वडिल शशांक शेंडे (भाऊसाहेब पाटील) यांनी गंभीर वाटणारा, खोडसाळपणे मुलाशी संवाद करणारा,बाप यावेळी दिसण्यातुन ही वेगळा साकारला आहे,एक चकचकीत चेहरामोहरा आपल्याला दिसतो,याआधी साकारले बाप दाढीमिशा,केस ,त्याही वाढलेल्या असा आपण नेहमीच पाहिला आहे.इथं तो नेटनेटका दिसतो.प्रथमेश परब (सदानंद पाटील) ते साकारलेला 'टिकल्या' हि भूमिका अतिशय समंजसपणे साकारली आहे.संजय नार्वेकरने साकारलेला भाई वेंगुर्लेकर त्यांच्या नेहमीच्या शैलीत न साकारता संयमितपणे अभिनीत केली आहे, मेघा शिंदेने दिपाली छान साकारली आहे.अंजली जोगळेकर टिकल्याची आई छोटिशी व्यक्तीरेखेत चांगली केली आहे.
एका गाडितुन होणारा कोकणच्या दिशेचा प्रवास सुंदर चित्रित झाला आहे.ड्रोनने चित्रित केलेली विहंगम दृश्य चित्रचौकटी सौंदर्यपूर्ण करतात,पण कधी कधी त्याचा अतिरेक ही जाणवतो,पार्श्वसंगीत, संगीत,यांचा चांगला मेळ जुळून येतो,आणि कथापटाला पोषक ठरतो, पण ॲटम सॉग म्हणून आलेलं गाणं उगाच आलेलं वाटत, एकूणच दिग्दर्शक मिलिंद कवडे,यांचा वेगळा चित्रपट पहायला मिळतो,टकाटक,एक नंबर, सिनेमा, यांचे विषय त्यांची मांडणी याला फटकून हा चित्रपट आहे.आधीच्या चित्रपटांची विषय वैविध्य ही गोष्टीत वेगळी असली तरी मांडणीची पद्धत तिचं होती,पण हा विषय बापलेक हा तसा नवीन राहिलेला विषय नसला तरी पटकथा, निश्चितच वेगळी आहे, आणि वेगळ्या वळणावर घेऊन जाते, भावनिक नात्यांची विण हळूहळू हलके हलके उलगडत जाते, त्यातील विनोद हा चित्रपटला पुढे नेत जातो, त्यामुळे गांभीर्य अधोरेखित होतंच पण कंटाळा येत नाही, आपल्याला अलगद एका भावनिक वळणावर सोडतो.संथलयीत संगीत द्रुत लयीत जाऊन अगदी समेवर येतं.आनंददायी ..... वळणावर येऊन ठेपतं.

निर्मिती: संजय भोसले, कांचन संजय भोसले.
दिग्दर्शक: मिलिंद कवडे.
पटकथा: मिलिंद कवडे, संजय नवगिरे.
संगीत:वरुण निखाते.
पार्श्वसंगीत: अभिनय जगताप.
कलादिग्दर्शक:सुमीत पाटील.
छायांकन:हजरत शेख वली.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वैत मसूरकर दिग्दर्शित 'छबी' चित्रपट २५ एप्रिलला.....अभिनेता समीर धर्माधिकारी, अभिनेते मकरंद देशपांडे यांची मध्यवर्ती भूमिका

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...