पोस्ट्स

जानेवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तिसऱ्या मराठी विश्व संमेलनाचा भव्य शुभारंभ; ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांना 'साहित्य भूषण' पुरस्कार प्रदान.

इमेज
पुणे, दिनांक:३१/०१/२०२५ ___ : राज्य शासनातर्फे आयोजित तिसऱ्या मराठी विश्व संमेलनाचे पुण्यात भव्य उद्घाटन करण्यात आले. दीपप्रज्वलनाने संमेलनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार तसेच उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. उदय सामंत उपस्थित होते. कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक मा. मधू मंगेश कर्णिक यांना 'साहित्य भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.    मराठी भाषेच्या अभिजात दर्जाच्या मान्यतेबद्दल गौरवोद्गार काढताना, मा. उदय सामंत यांनी पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ४ ऑक्टोबर रोजी मराठी माणसाचे अभिजात भाषेचे स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले.    यावेळी पुणेकरांनी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळी बाल गंधर्व रंगमंदिर वरुन  सुमारे ७ ते ८ हजार मराठी युवकांनी भव्य शोभायात्रेत सहभाग घेत संमेलनाचा उत्साह द्विगुणित केला.    मालगुंड - ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून घ...

कलेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला आनंद देणारा दिवस - सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार.

इमेज
  मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते अशी चतुरस्र कामगिरी तब्बल सहा दशके करणारे ज्येष्ठ अभिनेते कै. रमेश देव यांच्या ९६ व्या जयंती दिनानिमित्ताने अंधेरी पश्चिम, वर्सोवा येथील रस्त्याचे *‘अभिनेते श्री. रमेश देव मार्ग’* असे नामकरण करण्यात आले. मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंतांचा गौरव करण्यासाठी निर्मिलेल्या *‘मराठी चित्रपट कट्टा’* चे लोकार्पण आणि रस्त्याचे नामकरण सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार अमित साटम यांच्या संकल्पनेतून हे नामकरण करण्यात आले.  ‘मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेते रमेश देव यांची महती खूप आहे, या महान कलाकाराच्या नावाचा मार्ग होणे हे समस्त महाराष्ट्रासाठी आणि कलेवर प्रेम करणाऱ्या सर्वांना आनंद देणारा दिवस असल्याची भावना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी यावेळी व्यक्त केली. ‘मराठी चित्रपट कट्टा’च्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंतांचा सन्मान करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आमदार अमित साटम, नगरसेवक रोहन राठोड  या  प्रत्येकाने आपल्यापरीने केलेलं काम महत्त्वपूर्ण आ...

"सर्वव्यापी मराठीसाठी विश्वमराठी संमेलन",उदय सामंत, उद्योगमंत्री, (मराठी भाषा मंत्री)

इमेज
विश्वमराठी संमेलन हे मराठी भाषेच्या अस्मितेचे संमेलन आहे. 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारीला या कालावधीत हे संमेलन राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातील ऐतिहासिक फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होत आहे. मराठीला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे स्थानिक ते ग्लोबल अशा सर्व स्तरांवर मराठी भाषेचा जागर सातत्याने होत राहिला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक मराठी माणसाचे योगदान महत्त्वाचे आहे. या दृष्टीने विश्वमराठी संमेलनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. विश्व संमेलनासाठी जगभरातील विविध देशांतील मराठीजन आवर्जून उपस्थित राहणार आहेत.  संमेलनात भरगच्च कार्यक्रम मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे पहिले विश्वमराठी संमेलन पुण्यातील ऐतिहासिक फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होत आहे. विश्व संमेलनात विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञानापासून अध्यात्मापर्यंत, बालसाहित्यापासून संत साहित्यापर्यंतच्या विषयांवर परिसंवाद, चर्चासत्र होणार आहेत. लहान मुलांपासून ज्येष्ठापर्यंत प्रत्येक घटकाशी संबंधित विषय या संमेलनात समाविष्ट करण्यात आले आहेत. यंदापासू...

आमिर खानच्या उपस्थितीत रंगला 'इलू इलू’ चित्रपटाचा प्रिमियर.

इमेज
फाळके फिल्म्स एण्टरटेन्मेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य फाळके दिग्दर्शित ‘इलू इलू’ या चित्रपटाची सध्या बरीच चर्चा सुरू आहे. नुकताच या चित्रपटाचा शानदार प्रीमियर सोहळा बॉलीवूड स्टार आमिर खान यांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी या प्रिमियर सोहळ्याला आवर्जून हजेरी लावली.  ‘फाळके या नावातच एक स्पार्क आहे. अतिशय सुंदर चित्रपट अजिंक्य फाळके यांनी केला असल्याचे आमीर खान यांनी यावेळी सांगितले’. चित्रपटाची निर्मीती आणि अजिंक्य फाळके यांच्या दिग्दर्शनाचे मनापासून कौतुक करत चित्रपट पसंतीची पोचपावती आमिर खान यांनी यावेळी दिली. उत्तम कथा असल्यास एखादा मराठी चित्रपट करायला नक्कीच आवडेल असं आमिर खानने याप्रसंगी आवर्जून सांगितलं.    ‘आमिर खान सरांचं मार्गदर्शन या चित्रपटासाठी लाभलं ते आमच्यासाठी मोलाचं होतं. त्यांची ही कौतुकाची थाप आमचा हुरूप  वाढवणारी असल्याचं दिग्दर्शक अजिंक्य फाळके याने यावेळी सांगितलं’.   'इलू इलू’ या चित्रपटाबाबत तरुण वर्गामध्ये विशेष उत्सुकता पहायला मिळतेय. चित्रपटाच्या गाण्यांनी आणि संगीताने याआधीच प्...

"मराठी सिनेसृष्टीत आता समुद्रमंथनाची वेळ आली आहे – वैशाली सामंत".

इमेज
आपल्या महाराष्ट्रात टॅलेंटची कमी अजिबात नाही आहे.गरज आहे ती फक्त सोबतीची, एका पाठबळाची. नुकतच राष्ट्रीय पुरस्कार विजेती सावनी रविंद्रने Music Podcast सुरू केला असून, त्यात संगीत सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांना बोलतं केलं आहे. याला प्रेक्षकांनी प्रचंड चांगला प्रतिसाद देखिल दिला आहे.     नुकतच सावनीच्या या Podcast साठी सुप्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली सामंत आल्या होत्या. सावनीने आपल्या मराठी संगीत सृष्टीत काय बदल हवे आहेत असं विचारल्यावर वैशाली सामंत म्हणाल्या की, सरकराने आपल्या महाराष्ट्रात असलेल्या कलाकारांना घेऊन अनेक उपक्रम राबवले पाहिजेत. “आपल्या कलाकारांना PF मिळतो का तर नाही, पेंशन मिळते का तर नाही. मला असं वाटत की, एका कलाकाराला यशस्वीपणे पुढे जाण्यासाठी त्यांचे बेनिफिट्स योग्य वेळेत त्याला मिळाले तर तो नक्कीच गगन भरारी घेईल. आम्ही कलाकार जीव ओतून काम करायला तयार आहोत. आम्हाला एक संधी द्या आणि ही संधी फक्त सरकारच देऊ शकते. थोडसं सरकारने मराठी सिनेसृष्टीत लक्ष घालाव. सरकारने प्रत्येक कलाकाराला दरवर्षी एक तरी प्रोजेक्ट द्याला हवे त्यांचा संपूर्ण आढावा देख...

तानाजी जलगुंडेचा श्रीमंत पाटील लूक, मोनालिसाचा सोज्वळ साउथ इंडियन अंदाज.....

इमेज
    सैराट सिनेमा आज प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे त्यातील प्रत्येक पात्र आजही आपल्या डोळ्यासमोर येतात. आर्ची, परश्या, सलिम, प्रदिप ही सगळी पात्र त्यांची स्टाईल त्यांच लूक प्रत्येकाला लक्षात आहे. मात्र यांच सिनेमामधला प्रदिप बनसोडे म्हणजेच आपल्या सगळ्याचा लाडका अभिनेता तानाजी जलगुंडे यांच नवं लूक पाहून तुम्ही हैरान व्हालं. मोनालिसा बागल आणि तानाजी जलगुंडे ही नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटिस येत आहे. नेहमीच स्क्रीनवर पहिला आवडते त्यांच्या गैस्ट आणि भिरकीट सिनेमातील भूमिका प्रेक्षकांना खूप आवडल्या आता हीच जोडी आपल्याला आगामी चित्रपट 13 लीला विला ह्या सिनेमात पहिला मिळणार आहे. या सिनेमाच दिग्दर्शन सिराज अरब ह्यांनी केलं असून मैत्री फिल्म प्रोडक्शन ह्या चित्रपटाची निर्मिती करत आहे. नुकतच या सिनेमातील मोनालिसा बागल आणि तानाजी जलगुंडेचा लूक समोर आला असून तानाजी एका श्रीमंत घरातील मुलगा वाटतोय पांढ-या रंगाचा शर्टे आणि पांढ-या रंगाची पँन्ट, डोळेवर काळा चष्मा आणि धमाल केसांची हेअर स्टाईल, गळ्यात सोळ्याची मोठी चैन, हातात घड्याळ जणू काय गावाताला पाटिलच आहे. आणि त्यासोबत प...

मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर होणारे विश्व मराठी संमेलन म्हणजे मराठी भाषेचा गौरव- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे.

इमेज
    पुणे, दिनांक:२९ जानेवारी २०२५, आज पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषद घेत विश्व मराठी संमेलन २०२५ चे स्वरूप आणि त्यातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती दिली. 'मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर होणारे विश्व मराठी संमेलन म्हणजे मराठी भाषेचा गौरव', असे म्हणत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली.      हे भव्य संमेलन ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना ‘अभिजात मराठी’ असून, यामध्ये मराठी भाषा, साहित्य, कला, संस्कृती आणि परंपरांचा जागर केला जाणार आहे. यावेळी संमेलनाची सुरुवात बालगंधर्व रंगमंदिरापासून भव्य शोभायात्रेने होणार आहे. सदर संमेलनाचे उद्घाटन राज्याचे मा. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते व दोन्ही मा. उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत होईल.    याप्रसंगी बोलताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, "पुण्यात आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते, तेव्हा त्यांनी मर...

मराठी रंगभूमीवरील अविस्मरणीय कलाकृती – ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’चा रौप्यमहोत्सवी प्रयोग.

इमेज
    मराठी रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून, संस्कृती, परंपरा आणि आत्मसन्मानाचे प्रतीक आहे. या परंपरेचा एक मानबिंदू असलेले नाटक ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ लवकरच आपल्या २५ व्या प्रयोगासाठी सज्ज होत आहे.      मराठी संगीत रंगभूमीच्या सुवर्णकाळात ‘संगीत मानापमान’ हे नाटक गंधर्व नाटक मंडळी आणि ललित कलादर्श या दोन प्रतिष्ठित नाट्यसंस्थांमध्ये सादर होत असे. या दोन्ही संस्थांचे मालक– बालगंधर्व आणि संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी एकत्र येऊन एक ऐतिहासिक प्रयोग सादर केला, जो पुढे ‘संयुक्त मानापमान’ या नावाने अजरामर झाला. ही ऐतिहासिक घटना आणि त्यामागील कथा प्रेक्षकांसमोर उलगडणारे ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ हे नाटक प्रेक्षकांना एका वेगळ्याच जादुई रंगभूमीच्या प्रवासाला घेऊन जाणार आहे.      या नाटकाचे लेखक अभिराम भडकमकर, दिग्दर्शक हृषिकेश जोशी असून निर्मिती श्यामराज पाटील आणि अनंत वसंत पणशीकर यांनी केली आहे. आशिष नेवाळकर, हृषिकेश वांबुरकर, ओंकार प्रभूघाटे, अजिंक्य पोंक्षे, श्यामराज पाटील, अशिनी जोशी, प्रद्युम्न गायकवाड परमेश्वर गुट्टे...

'आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील पेन्शन, नियम व अटी शिथिल करा', उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश.

इमेज
मुंबई, दि. २८ : आज (२८ जानेवारी २०२५) आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील पेन्शन, नियम व अटी  शिथिल करून ज्येष्ठ पत्रकार/ छायाचित्रकार यांना योजनेचा लाभ मिळण्याबाबत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात बैठक झाली. जेष्ठ अधीस्वीकृती पत्रकार कार्ड व आयकर भरावा लागत नाही या दोन कागदपत्रकारांच्या आधारे पेन्शन प्रकरणे मंजूरीचा निर्णय मंत्रालयीन अधिस्वीकृती समितीने घ्यावे असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.  राज्य सरकारने सुरू केलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेंतर्गत १८६ पत्रकारांना पेन्शन योजना सुरू आहे. या योजनेकरिता ५० कोटींची तरतुद करण्यात आली असून दरम्यान, जेष्ठ अधिस्वीकृती पत्रकारांना पेन्शन योजनेचा लाभ मिळण्याकरिता अनेक अटी, शर्तीतून जावे लागत आहे. याबाबत कोल्हापूर प्रेस क्लबच्या निवेदनातून विविध मुद्दे या बैठकीत मांडण्यात आले. पत्रकारांना विशिष्ट आजारांसाठी शासनाच्या योजनांमधून वैद्यकीय मदत मिळत असली तरीही नियमित आजारांसाठी वैद्यकीय मदत प्राप्त व्हावी याकरिता CSR फंडातून निधी प...

'फसक्लास दाभाडे' कुटुंबाची युएई, गल्फमध्येही चर्चा....

इमेज
   हेमंत ढोमे दिग्दर्शित 'फसक्लास दाभाडे' हा बहुप्रतिक्षित चित्रपट वर्ल्डवाइड प्रदर्शित झाला असून हे दाभाडे कुटुंब प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहे. या चित्रपटाचे  केवळ महाराष्ट्रातच नाही तर युएई, गल्फ कंट्रीजमध्येही ग्रँड ओपनिंग झाले आहे. परदेशातही या चित्रपटावर प्रेक्षक भरभरून प्रेम करत असून पहिल्याच विकेंडला  'फसक्लास दाभाडे'ने महाराष्ट्रासह परदेशातही 'हाऊसफुल्ल'चे बोर्ड मिरवत करोडोंचा पल्ला गाठला आहे.     दाभाडे कुटुंबातील लग्नकार्य, नात्यात आलेला दुरावा, गैरसमज, सामाजिक विचारसरणी, रूढी परंपरा अशा अनेक गोष्टींवर या चित्रपटात अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने भाष्य करण्यात आले आहे. खदखदून हसवतानाच डोळ्यांची किनार पाणवणारा हा चित्रपट म्हणजे प्रत्येकासाठी मनोरंजनाची मेजवानी ठरत आहे. टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी  निर्मित या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे आणि राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्माते असणाऱ्य...

प्रतीक्षा संपली......‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ १८ एप्रिलला भेटीला.

इमेज
    भक्त संप्रदायातील अगदी लहान वयात मान्यता पावलेली देदीप्यमान शलाका म्हणजे संत मुक्ताबाई! बुद्धिमान, ज्ञानी अशा संतांना आपल्या प्रखर विद्वत्तेने आणि अधिकारवाणीने गुरुमंत्र देऊन ही शलाका तळपती झाली. अशा संत मुक्ताबाईंचे आणि त्यांच्या कुटुंबाचे प्रेरणादायी चरित्र उलगडून दाखवणारा दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य मराठी चित्रपट १८ एप्रिलला आपल्या भेटीला येतोय. रेश्मा कुंदन थडानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाची प्रस्तुती ए.ए.फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे.     सप्रेम निवृत्ती आणि ज्ञानदेव । मुक्ताईचा भाव विठ्ठलचरणी । -संत चोखामेळा आदिमाया आदिशक्ती संत मुक्ताईला भेटूया १८ एप्रिल २०२५ पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात..  अशा कॅप्शनसह आलेल्या या  पोस्टरमधून चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. या पोस्टरमध्ये संत ‘मुक्ताई’ विठूरायाची आराधना करताना दिसते आहे.      देहरूपाने संपले तरी कार्यरूपाने संजीवन असणाऱ्या मुक्ताबाईंच्या कार्य व विचारांना जनमानसापर्यंत पोहोचवण्य...

'आर्यन्स सन्मान २०२४' पुरस्कार सोहळा दिमाखात संपन्न.

इमेज
    'वारसा परंपरेचा... अभिमान संस्कृतीचा!' या घोषवाक्यासह मनोरंजन विश्वातील मान्यवरांच्या कर्तृत्वाला सलाम आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करणारा 'आर्यन्स सन्मान पुरस्कार सोहळा' संपन्न झाला. पुणे येथील स्वारगेटमधील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य-दिव्य दिमाखदार सोहळ्यात विजेत्यांना 'आर्यन्स सन्मान २०२४' प्रदान करण्यात आले. या सोहळ्याला मराठी मनोरंजन विश्वातील मकरंद अनासपुरे, सुनील बर्वे, निर्मिती सावंत, सयाजी शिंदे, संदीप पाठक, आनंद इंगळे, सावनी रविंद्र, शैलेश दातार, अशोक समर्थ, पूजा पवार, उमा सरदेशमुख, मिलिंद फाटक, जगन्नाथ निवंगुणे, मिलिंद शिंतरे, अंशुमन विचारे, सुवेधा देसाई, हेमंत पाटील, प्रसाद वनारसे, निपुण धर्माधिकारी, देवेंद्र पेम, राहुल रानडे, निर्मात्या अमृता राव, सुरेश देशमाने, दीपक देवराज (महाराष्ट्र आर्थिक गुन्हे विभाग आयुक्त) आदी दिग्गज मंडळी उपस्थित होती. मुख्य चित्रपट, व्यावसायिक नाटक आणि प्रायोगिक नाटकाला १ लाख रुपये, तर तंत्रज्ञांसह इतर २५ हजार रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कारांची एकूण रक्कम ...

मिशन अयोध्या चित्रपटाची मराठवाड्यात धुमाकूळ – छत्रपती संभाजीनगरमध्ये १५ शो हाऊसफुल्ल.

इमेज
      मराठी चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित ‘मिशन अयोध्या’ चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, विशेषतः मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये या चित्रपटाने विक्रमी कामगिरी केली आहे. शुक्रवार, शनिवारचे मिळून तब्बल १५ शो या ठिकाणी हाऊसफुल्ल झाले आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली, ज्यामुळे चित्रपटगृहांबाहेरही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. मराठवाड्यातील बालेकिल्ल्यात मिळालेला अफाट प्रतिसाद फक्त छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ संपूर्ण मराठवाड्यात या चित्रपटाने यशाची पताका फडकवली आहे. मराठवाड्यातील २३ चित्रपटगृहांमध्ये ‘मिशन अयोध्या’ हाऊसफुल्ल होताना दिसला. अशा प्रकारचा प्रतिसाद मिळाल्याने स्थानिक वितरकांसह निर्मात्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. *पश्चिम महाराष्ट्रातील लोणावळ्यातीलही हाऊसफुल्ल शो* मराठवाड्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील लोणावळा येथेही ‘मिशन अयोध्या’चे दोन शो हाऊसफुल्ल झाले. या ठिकाणीही प्रेक्षकांनी चित्रपटाला जोरदार दाद दिली, ज्यामुळे या यशाचा दरवळ हळूहळू इतर भागांपर्यंत पोहचत आहे. *यशाचे सूत्र* मराठी संस्कृती, श्रद्...

'इलू इलू’ ३१ जानेवारीला चित्रपटगृहात.

इमेज
  प्रेम म्हणजे मनाला लागलेली मोरपीसी चाहूल. प्रेम अनावधानाने, चोरपावलांनी अलगद येते आयुष्यात.  सुंदर क्षणांची आठवण असणारे प्रेम कित्येकांसाठी आयुष्यभराची साठवणदेखील असते. पहिल्या प्रेमाची अनुभूती आपल्यातील प्रत्येकानेच कधी ना कधी घेतलेली  असतेच  या प्रेमाची आठवण विसरता येत नाही. आपण आयुष्यात पुढे जातो पण या आठवणी आपल्या कायम सोबत असतात. प्रेमाच्या याच अलवार भावनेची हलकी झुळूक घेऊन प्रत्येकाच्या मनात दडलेल्या पहिल्या ‘इलू इलू’ ची आठवण ताजी करायला फाळके फिल्म्स एण्टरटेन्मेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित ‘इलू इलू’ हा मराठी चित्रपट ३१ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.    संस्मरणीय आठवणींचा हा प्रवास दाखवताना प्रेमाच्या वेगवेगळ्या छटांची गोष्ट ‘इलू इलू’ चित्रपटात आहे.  यातील प्रत्येक पात्र आपल्या आजूबाजूला दिसणारे आहे. प्रत्येकाला ‘नॉस्टॅलजिया’ देणारा हा चित्रपट असेल असं दिग्दर्शक अजिंक्य बापू फाळके सांगतात.     बॉलीवूड गाजवलेली प्रसिध्द अभिनेत्री एली आवराम हिने 'इलू इलू' चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर पदार...

सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते 'स ला ते स ला ना ते' चित्रपटाचा ट्रेलर लाँच.

इमेज
    कमी श्रमात आणि कमी काळात अधिक पैसा कमावण्याची आकांक्षा असलेला बडबडा तरुण आणि त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अबोल तरुणीच्या नात्याचं व्याकरण सांगणारी कथा म्हणजे "स ला ते स ला ना ते"  हा चित्रपट आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते पुणे येथे लाँच करण्यात आला असून दमदार स्टारकास्ट असलेल्या ट्रेलरने चित्रपटाविषयीचे कुतूहल आता आणखी वाढवले आहे.      अतिशय बडबड करणारा, गोडबोलू तरुणाची ओळख अचानक एका पर्यावरणप्रेमी तरुणीसोबत होते. या मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात होते आणि गोष्टी थेट लग्नापर्यंत पोहचतात. हा तरुण  विदर्भातील चंद्रपूरमधील न्यूज चॅनेलचा पत्रकार असतो. पर्यावरणप्रेमी तरुणी आणि या तरुण पत्रकाराच्या नात्याच्या व्याकरणाची गोष्ट या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. पत्रकारिता, पर्यावरणाचे प्रश्न, विकास असे मुद्देही या चित्रपटातून हाताळण्यात आले आहेत. पत्रकार होऊ इच्छिणाऱ्या तरुणाला पत्रकारितेच्या माध्यमातून लवकर श्रीमंत होण्याची चटक लागते. त्यासाठी तो अनेक जुगाड करू लागतो. अशाच एका जुगाडात तो कसा अडकत ज...

राज ठाकरेंचा ‘येक नंबर’ कार्यकर्ता: पोलिसांनाही गोंधळात टाकणारा प्रसंग.

इमेज
‘येक नंबर’ हा मराठी चित्रपट सध्या चर्चेत आहे. एका कट्टर कार्यकर्त्याच्या निष्ठा, संघर्ष, आणि आत्मशोधाचा प्रवास उलगडणाऱ्या या सिनेमाचा  वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर रविवार, २६ जानेवारी २०२५ रोजी झी टॉकीजवर दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता होणार आहे. सिनेमा प्रताप नावाच्या कार्यकर्त्याची गोष्ट सांगतो, जो राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेला प्रताप अचानक आयुष्यात घडलेल्या घटनांमुळे स्वतःच्या निष्ठांवर प्रश्न विचारू लागतो आणि सत्याचा शोध घेतो.    एका दृश्यात प्रताप दारूच्या नशेत राज ठाकरे यांच्या पोस्टरवर शिव्या घालत रस्त्यावर गोंधळ घालतो. कॅमेरा लांब ठेवून शूटिंग केल्यामुळे सीन खऱ्यासारखा वाटला. पण शूटिंगदरम्यान खऱ्या पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या प्रतापला रोखण्यासाठी हस्तक्षेप केला. काही वेळाने त्यांना हे शूटिंग असल्याचं कळलं. सत्य समजल्यानंतर पोलिसांनी धैर्य घोलपच्या अभिनयाचं कौतुक करत म्हटलं, “तुझा अभिनय खरंच येक नंबर आहे!” ‘येक नंबर’ हा केवळ मनोरंजनासाठी नाही, तर निष्ठा, सत्य, आणि स्वतःच्या विचारांचा शोध यावर एक सशक्त संदेश देतो.२६ जानेवारी २०२५ ला झी टॉक...

विकी कौशलचा अंगावर काटा आणणारा लूक छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार.

इमेज
बहुचर्चित छावा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार असून चित्रपटाचा ट्रेलर २२ तारखेला प्रदर्शित होतोय! अग्नि भी वो, पाणी भी वो, तुफान भी वो, शेर शिवा छावा है वो! असं म्हणत ‘मॅडॉक फिम्स’ने ‘छावा’ या सिनेमामधली अभिनेता विकी कौशलचा टिझर प्रदर्शित करत त्यांचा लूक रिव्हील केला.     छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिनाचे औचित्य साधून चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत सिंहासनावर बसलेला या पोस्टर मध्ये पाहायला मिळतो आहे.या पोस्टरने चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं असून, प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहतायत    छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा धगधगता इतिहास या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे.अभिनेता विकी कौशल बरोबर , रश्मिका मंदान्ना, अक्षय खन्ना यांचा देखील अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.     या आधीही छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली होती, ...

'मिशन अयोध्या'मध्ये आगीच्या भक्षस्थानी कलाकाराने चित्रित केला थरारक सिन.

इमेज
   निर्माते कृष्णा दादाराव शिंदे आणि योगिता कृष्णा शिंदे यांच्या 'आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित 'मिशन अयोध्या' या चित्रपटातील साहसदृश्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. हे साहस दृश्य जीवावर उदार होऊन चित्रपटात 'कारसेवक विचारे' ही प्रमुख भूमिका करणारे कलावंत डॉ. अभय कामत यांच्यावर चित्रित झाले आहे. चित्रपटातील एका दृश्यात प्रभू श्रीरामांचा झेंडा जाळण्याचा प्रयत्न चित्रपटातील खलनायक करीत असतो.  त्याच्या हातातून हा झेंडा खेचून कारसेवक विचारेंना तो वाचवायचा आहे. या झटापटीत चिडलेला खलनायक त्यांना पेटवून देतो. हे थरारक दृश्य कोणताही डमी कलाकार न घेता चित्रित करायचे होते. दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे आणि प्रख्यात फाईट मास्तर मोझेस फर्नांडिस यांनी डॉ. अभय कामत यांना यातील धोका आणि खबरदारी याबद्दल कल्पना देत दृश्य समजावले. डॉ. अभय कामत यांनीही जीवावर बेतणारे हे दृश्य डमी न घेता चित्रित करण्याचे चॅलेंजिंग स्वीकारले. जराही जीवाची पर्वा न करता या व्यक्तिरेखेच्या 'करो या मरो' स्वभावानुसार त्यांनी हे दृश्य एका टेकमध्ये ओके केले. ते पाहून ऍक्श...

रामराज्याच्या दिशेने नवे पाऊल,'मिशन अयोध्या' २४ जानेवारीपासून चित्रपटगृहात!

इमेज
 प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पण वर्षपूर्तीचे औचित्य साधत, शुक्रवार २४ जानेवारी २०२५ पासून 'मिशन अयोध्या' हा बहुचर्चित चित्रपट महाराष्ट्रभरातील १०० हून अधिक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. प्रभू श्रीरामांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्या रामराज्याची संकल्पना पुढे नेण्यासाठी प्रेरणादायी ठरणारा हा चित्रपट त्याच्या सशक्त कथेमुळे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यातही अव्वल आहे.  एक चित्रपट नव्हे, तर एक प्रेरणादायी प्रवास... निर्माते कृष्णा दादाराव शिंदे, सौ. योगिता कृष्णा शिंदे त्यांच्या 'आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.' निर्मित ‘मिशन अयोध्या’ हा केवळ एक मनोरंजनात्मक चित्रपट नसून, रामभक्तांच्या हृदयातील प्रभू श्रीरामांशी जोडणारा आणि त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत नेणारा एक प्रेरणादाई प्रवास आहे. रामराज्याच्या संकल्पनेला नव्या दृष्टीने उलगडणाऱ्या या कलाकृतीतून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो: पुढच्या पिढ्यांना आपण कोणते प्रभू श्रीराम शिकवणार आहोत? रावणावर विजय मिळवणारे योध्दा राम, की रामराज्याच्या आदर्शाची स्थापना करणारे राजा राम? ...

गाव सोडून शहराकडे जाणाऱ्या तरूणाईसाठी, ‘गाव बोलावतो’ मोशन पोस्टर रिलीज.

इमेज
    सध्या गावाकडची बरीचशी तरूणाई ही शहराकडे येऊन शिक्षण घेताना, नोकरी करताना दिसते. यामुळे अनेक गावांमध्ये फक्त वयस्कर लोकच दिसतात, आणि त्यामुळे गावांकडे आजही सगळ्याच प्रकारच्या प्रगतीचा अभाव दिसतो. एकीकडे शहरं वाढतचं चालली आहेत, तर दुसरीकडे गावं ओसाड पडताना दिसू लागली आहेत. याच गंभीर विषयावर भाष्य करणारा ‘गाव बोलावतो’ हा चित्रपट ७ मार्च रोजी प्रदर्शित होतोय. या चित्रपटाच्या मोशन पोस्टरचे आज (ता. २१) अनावरण करण्यात आले.      गावातील एखादा मुलगा शिक्षण-नोकरीच्या निमित्ताने शहराकडे गेला की तो तिकडचाच होतो. त्याचे कुटुंब, आई-वडिल त्या अप्रगत गावात दिवस ढकलताना दिसतात. मुलाने गावाकडे यावं, शेतीकडे लक्ष द्यावं असं प्रत्येक आई-वडिलांना वाटतं पण इतर गोष्टींना प्राधान्य देणारी तरूण पिढी शहराच्या झगमगाटात हरवून जाते आणि गावाचं मन जाणू शकत नाही. भूषण प्रधान, माधव अभ्यंकर, गौरी नलावडे, श्रीकांत यादव, किरण शरद यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘गाव बोलावतो’ चित्रपटात ग्रामीण प्रश्नांवर आणि समस्यांवर भाष्य करण्यात आलंय त्यामुळे सर्वांनाच या चित्रपटाची प्रतिक्षा आहे....

आधी हळद, मग लग्न आणि आता लग्नानंतरचा गोंधळ.

इमेज
दाभाडे कुटुंब सोनू आणि कोमलच्या लग्नाचा जल्लोष साजरा करत असतानाच या उत्साहात अधिक भर घालण्यासाठी आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘यल्लो यल्लो’ या हळदीच्या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवल्यानंतर आता, ‘तोड साखळी’ हे गोंधळाचं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. ‘तोड साखळी’ हे गाणं लग्नानंतरच्या गोंधळाच्या विधीवर आधारित असून सोनू आणि कोमलच्या लग्नानंतर दाभाडे कुटुंबाचे देवदर्शन आणि गोंधळाचा कार्यक्रम या गाण्यात पाहायला मिळत आहे. या गाण्याचे शब्द सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत कारण ते जुन्या रूढी परंपरांची साखळी तोडूया असं दर्शवत आहेत. गाण्याच्या सुरुवातीला एक छोटा प्रसंग आहे त्यातून आपण विचारांनी पुढारण्याची गरज असल्याचा स्पष्ट संदेश मिळत आहे. ‘तोड साखळी’ या गाण्याला युवाशाहीर रामानंद उगले यांचा दमदार आवाज लाभला असून अमितराज यांचे संगीत या गाण्याला लाभले आहे.  तसेच सगळ्यांची मनं जिंकणारे बोल हे क्षितिज पटवर्धन यांचे आहेत!  सध्या या चित्रपटाचे महाराष्ट्रात जोरदार प्रमोशन सुरु आहे. त्यानिमित्ताने चित्रपटातील कलाकारांनी निमगाव दावडीच्या खंडोबा मंदिरात जाऊन ...

२५ जानेवारीला संपन्न होणार 'आर्यन्स सन्मान २०२४' अंतिम पुरस्कार सोहळा.

इमेज
   'वारसा परंपरेचा... अभिमान संस्कृतीचा!' या घोषवाक्यासह मनोरंजन विश्वातील मान्यवरांच्या कर्तृत्वाला सलाम आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी 'आर्यन्स सन्मान' पुरस्कार सोहळा सज्ज झाला आहे. राज्य सरकारनंतर रोख पुरस्कार देणारा 'आर्यन्स सन्मान' हा एकमेव पुरस्कार सोहळा आहे. यंदा नाटक आणि चित्रपट विभागांमध्ये जबरदस्त चुरस पाहायला मिळणार असल्याचे संकेत घोषित झालेल्या नामांकनांवरून मिळत आहेत. यावर्षी कोणता कलावंत आणि कोणता चित्रपट 'आर्यन्स सन्मान २०२४'च्या ट्रॅाफीवर आपले नाव कोरण्यात यशस्वी होणार हे जाणण्यासाठी सेलिब्रिटिंसोबतच रसिकही आतुरले आहेत. 'आर्यन्स सन्मान २०२४' पुरस्कार सोहळा शनिवार, २५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडणार आहे.       या सोहळ्यात नाटक आणि चित्रपटांसह कलाकार-तंत्रज्ञांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. याखेरीज दोन विशेष पुरस्कारांचीही घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये मागच्या वर्षी 'आणखी एक मोहेंजो दारो' या माहितीपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरणारे ...

'मी व्हर्सेस मी' नाटक रंगभूमीवर क्षितिज दाते,शिल्पा तुळसकर, हृषिकेश जोशी एकत्र.....

इमेज
हल्ली नवे विषय, नव्या संहिता रंगभूमीवर सादर होत आहेत. नव्या वर्षात तर विनोदापासून गंभीर, आशयघन  अशा  वैविध्यपूर्ण विषयांच्या नाटकांचे शुभारंभ होताना दिसत आहेत. या मांदियाळीत आता अमरदीप आणि कल्पकला निर्मित 'मी व्हर्सेस मी' या नव्या नाटकाची  मेजवानी नाट्यरसिकांना मिळणार आहे. या नाटकाच्या  निमित्ताने अभिनेता क्षितिज दाते, शिल्पा तुळसकर  हृषिकेश जोशी हे मराठीतले तीन गुणी नट एकत्र आले आहेत. संजय जमखंडी  यांचे लेखन दिग्दर्शन असलेल्या या नाटकाच्या निर्मितीची जबाबदारी भरत नारायणदास ठक्कर, प्रवीण भोसले यांनी सांभाळली आहे. सहनिर्माती शिल्पा तुळसकर आहेत. शनिवार २५ जानेवारीला सायंकाळी ५.३० वा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह चिंचवड आणि रविवार २६ जानेवारी सायंकाळी ५.३० वा. तुपे नाट्यगृह हडपसर ३० जानेवारी काशिनाथ नाट्यगृह ठाणे रात्रौ ८.३० वा. तर  शुक्रवार ३१ जानेवारी  दिनानाथ नाट्यगृह विलेपार्ले ४.०० वा. येथे या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग रंगणार आहेत.     'मी व्हर्सेस मी' हे नाटक गूढ आणि थरारक धाटणीच असलं तरी समाजातील काही संवेदनशील विषयावर आणि मानव...

"स ला ते स ला ना ते'मध्ये उपेंद्र लिमयेनी साकारली हसनभाईची भूमिका.

इमेज
    जोगवा, अॅनिमल अशा अनेक चित्रपटांतून दमदार अभिनय केलेले उपेंद्र लिमये आता 'स ला ते स ला ना ते' या अनोखं नाव असलेल्या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. उपेंद्र लिमये यांनी नेहमीच भूमिकांमधील वैविध्य जपत उत्तम अभिनयाचं दर्शन घडवलं असून, 'स ला ते स ला ना ते'मध्ये हसनभाईची भूमिका साकरणार असून त्यांची भूमिका काय असणार या विषयी उत्सुकता आहे.  स्टुडिओ लॉजिकल थिंकर्स प्रस्तुत 'स ला ते स ला ना ते' या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन संतोष कोल्हे यांचं आहे. श्रीकांत बोजेवार, तेजेश घाडगे, संतोष कोल्हे यांनी पटकथा लेखन, श्रीकांत बोजेवार यांनी संवाद लेखन केलं आहे. विनायक जाधव यांनी छायांकन, सचिन नाटेकर यांनी संकलन, एकनाथ कदम यांनी कला दिग्दर्शन, रोहित नागभिडे यांनी पार्श्वसंगीत, रोहित प्रधान यांना ध्वनिआरेखन केलं आहे. दिग्दर्शक संतोष कोल्हे यांनी नेहमीच वेगळ्या कलाकृती केल्या आहेत. त्यांच्या मराठी-हिंदी टीव्ही मालिका गाजल्या आहेत. त्याशिवाय चित्रपटांतून मनोरंजक पद्धतीनं सामाजिक भाष्य करण्याची त्यांची शैली आहे.    वृत्तवाहिनीचा रिपोर्टर आणि पर्यावरणप्रेमी ...

सचिन पिळगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला "मुक्काम पोस्ट देवाचं घर" चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च.

इमेज
   आपण पाठवलेलं पत्र अमेरिकेला पोहोचतं, तर देवाच्या घरी नक्की पोहोचेल असं वाटणाऱ्या एका लहान निरागस मुलीचा देवाच्या घराचा शोध "मुक्काम पोस्ट देवाचं घर" या चित्रपटातून उलगडणार आहे. हृदयस्पर्शी आणि मनोरंजक कथानक असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर लाँच नुकताच सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांच्या मुख्य उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आवर्जून उपस्थित होते. येत्या ३१ जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.     लहान मुलांच्या भावविश्वात खूप काही सुरू असतं. मुलांना अनेक प्रश्न पडत असतात. त्या प्रश्नांची उत्तरं मुलं आपल्या पद्धतीनं शोधण्याचा प्रयत्न करतात. "मुक्काम पोस्ट देवाचं घर" या चित्रपटात ग्रामीण भागातली गोष्ट मांडण्यात आली आहे. सैन्यात असलेले वडील देवाघरी गेले असं आईनं मुलीला सांगितल्यावर देवाचं म्हणजे काय ? आणि ते कुठे असतं? याचा शोध सुरू होतो. त्याबरोबरच तिची आई आपल्या शहीद झालेल्या पतीचं पेन्शन मिळवण्यासाठी संघर्ष करत असल्याचं ट्रेलरमधून दिसतं. त्यामुळे भावनिकतेची किनार असलेल्या या क...

हास्याची नवी लहर ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ चा टीझर प्रदर्शित....२४ जानेवारीपासून एव्हरेस्ट हास्य मराठी यूट्यूब चॅनेलवर.....

इमेज
    काही दिवसांपूर्वीच एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ या नव्या मराठी स्टँडअप कॉमेडी शोची घोषणा केली होती. तेव्हापासूनच या शो विषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. आता ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ चा जबरदस्त टीझर प्रदर्शित झाला असून नुकतीच याची पहिली झलक एका कार्यक्रमात सादर करण्यात आली.      ‘ऑलमोस्ट कॉमेडी’मध्ये, लेखक चेतन डांगे, अमोल पाटील, चिन्मय कुलकर्णी, अक्षय जोशी आणि ऋषिकांत राऊत हे मराठी मनोरंजन क्षेत्रातील काही दिग्गज लेखक, प्रत्यक्ष स्टेजवर येऊन प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत. याआधी त्यांच्या लेखणीतून साकारलेली हास्यनिर्मिती आपण पाहिली आहे, आता त्यांचा स्टेजवरील धमाकेदार परफॉर्मन्स प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणणार आहे. आपल्या दिलखेच अंदाजात सूत्रसंचलन करून अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर या शोची रंगत वाढवणार!      पाच लेखकांचे पाच एपिसोड्स रसिकवर्गाला पाहायला मिळणार असून येत्या २४ जानेवारीला ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ चा पहिला एपिसोड एव्हरेस्ट हास्य मराठी या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होणार आहे. प्रत्येक शुक्रवारी नवीन एपिसोड प्र...

गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ह्यांनी केले "संगीत मानापमान" च्या स्क्रीनिंगचे भव्य आयोजन अभिनेत्यांनी हि लावली उपस्थिती .

इमेज
    गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ह्यांनी गोव्यात केले जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे दिग्दर्शित मराठी चित्रपट "संगीत मानापमान" च्या स्क्रिनिंग चे भव्य आयोजन. गोव्यातील चित्रपट प्रेमींसाठी हा जणू एक आनंदाचा उत्सव होता. या स्क्रिनिंग साठी चित्रपटातील मुख्य कलाकार सुबोध भावे, वैदेही परशुरामी, सुमित राघवन, शैलेश दातार, सुनील फडतरे आणि सुबोध भावे ह्यांची पत्नी मंजिरी भावे उपस्थित होते. आपल्या सोशल मिडिया अकाउंट वरून पोस्ट करत मुख्यमंत्री *डॉ. प्रमोद सावंत* म्हणाले की, "चित्रपट बघून खूप छान वाटलं,  सिनेमाच्या संपूर्ण टीमला माझ्याकडुन खूप खूप शुभेच्छा." सर्वत्र "संगीत मानापमान" सिनेमाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळतोय, संगीत प्रेमींसोबत लहान मुलं सुद्धा आनंद लुटताय. अप्रतिम चित्रीकरण आणि एक से बढकर एक गाणी असा हा संगीतमय चित्रपट "संगीत मानापमान" १० जानेवारी पासून मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालाय आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य ही करतोय.

कलेचा आनंद घेता येणे महत्त्वाचे - डॉ. विनय सहस्त्रबुद्धे,.....२१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचा सांगता सोहळा.

इमेज
     गेला आठवडाभर रंगलेल्या २१व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचा सांगता सोहळा मुव्ही मॅक्स चित्रपटगृहात नुकताच संपन्न झाला. यंदाच्या आशियाई चित्रपट महोत्सवात वैविध्यपूर्ण चित्रपटांची मेजवानी देत रसिकांना आशियाई चित्रपट संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. सुमारे ६० चित्रपटांचा आस्वाद रसिकांना यात घेता आला. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करताना महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांनी महोत्सवासाठी सहकार्य लाभलेल्या सर्वांचे आभार मानले आणि मिळालेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त केला. अनेकांच्या प्रयत्नांनी, सहकार्याने हा महोत्सव यशस्वी झाला असून महोत्सवाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल फेस्टिव्हल डिरेक्टर संतोष पाठारे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी ज्येष्ठ नेते डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, महोत्सवाचे कार्यकारिणी सदस्य श्रीकांत बोजेवार, चैतन्य शांताराम, संतोष पाठारे, संदीप मांजरेकर, पत्रकार सुनील नांदगावकर आदि मान्यवर मंडळी उपस्थित होती.     .   यंदाचा सत्यजित राय स्मृती पुरस्कार ज्येष्ठ सिनेपत्रकार रफिक बगदादी यांना तर राष्ट्रीय पारितोषिक विजे...

'टेक इट इझी उर्वशी चित्रपटाचा श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात प्रीमियर...१२ महिन्यांमध्ये १२ चित्रपट प्रदर्शित करण्याचा संकल्प.

        मराठी रंगभूमीवर विश्वविक्रम  करणाऱ्या रत्नाकर मतकरी लिखित 'अलबत्या गलबत्या' या नाटकात नायकाची भूमिका साकारत बच्चे कंपनीला अक्षरश: वेड लावणारा सनीभूषण मुणगेकर आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. मराठी रंगभूमीवर लक्षवेधी कामगिरी करणारा सनीभूषण एक अनोखा प्रयोग करण्यासाठी सज्ज झाला आहे. सनीबॅाय एन्टरटेन्मेंटचा सनीभूषणच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'टेक ईट इझी उर्वशी' या मराठी चित्रपटाचा प्रीमियर दादरमधील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात झाला. यासोबतच यंदा १२ महिन्यांत  १२ मराठी चित्रपटांचा प्रीमियर नाट्यगृहात करण्याचा सनीभूषणचा मानस आहे. याप्रसंगी अनेक मान्यवर मंडळी  उपस्थित होती.     वेगवेगळ्या माध्यमातून मराठी चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपुढे पोहचवण्यासाठी जो प्रयत्न होतोय तो अत्यंत कौतुकास्पद आहे. अभिनेता सनीभूषण मुणगेकर याने त्यासाठी उचलेले पाऊल मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं. त्याच्या या अनोख्या प्रयोगाला माझ्या मनापासून शुभेच्छा असं  सांगताना अभिनेते विजय पाटकर यांनी मराठी चित्रपटांसाठी ठोस काहीतरी कृती करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन य...