'फसक्लास दाभाडे' ने बार्सिलोना आणि स्पेनमध्ये आपली छाप पाडून रसिकांच्या मनावर राज्य केले .
टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांच्या 'फसक्लास दाभाडे' या चित्रपटाने फक्त महाराष्ट्रात नाही तर सातासमुद्रापार देखील आपली जादू दाखवली आहे. इंग्लंड ,युएई जीसीसी या प्रदेशांनंतर आता 'फसक्लास दाभाडे' ने बार्सिलोना आणि स्पेनमध्ये आपली छाप पाडून रसिकांच्या मनावर राज्य केले आहे. . रसिकांनी तिकडेही चित्रपटाला भरभरून प्रेम दिले असून महाराष्ट्राबाहेरही ‘फसक्लास दाभाडे' ने आपली जादू दाखवत
प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केलंय. चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे आणि राजसी भावे यांच्य प्रमुख भूमिका आहेत. हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, क्रिशन कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग आहेत. चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओजने केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा