जिओ स्टुडिओज् प्रस्तुत "झापुक झुपूक" सिनेमामध्ये दिसणार उत्कृष्ट कलाकारांची दमदार फळी, पोस्टर पाहून चित्रपटाची उत्सुकता शिगेला.

जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्माती ज्योती देशपांडे, निर्माती सौ. बेला केदार शिंदे ,केदार शिंदे दिग्दर्शित "झापुक झुपूक" या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दमदार टिझर आणि पोस्टर नंतर आता आणखी एक नवा धमाकेदार पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. 
    फॅमिली एंटरटेनमेंटचा जबरदस्त तडका असलेल्या "झापुक झुपूक" या चित्रपटाच्या ह्या नव्या पोस्टरमध्ये मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरे पहायला मिळत आहेत. केंदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटात सूरज चव्हाणसह लोकप्रिय इतर कलाकार कल्ला करताना दिसणार आहेत. यामध्ये ‘पिरतीचा वनवा उरली पेटला’ मालिकेतील इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, ‘अबीर गुलाल’ मालिकेतील पायल जाधव, ‘तुमची मुलगी काय करते’ मालिकेतील जुई भागवत आणि दीपाली पानसरे, तसेच पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
   पोस्टरमध्ये आपण पाहू शकतो सूरज बैलगाडी ओढत आहे तर त्याच बैलगाडीवर बाकी सर्व कलाकार स्वार आहेत. सर्व कलाकारांच्या चेहऱ्यावर हसू आहे ज्यामुळे नक्की चित्रपटाची कहाणी काय असणार आहे याची सर्वांना उत्सुकता आहे. आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे उत्तम युवा अभिनेत्यांमुळे हा चित्रपट नक्कीच सध्याची युवा पिढी आणि सिनेप्रेमींच्या पसंतीस उतरणार आहे. इतकच नव्हे तर गुढीपाडव्यानिमित्त डोंबिवलीच्या शोभायात्रेत सूरज चव्हाण सहभागी झाला होता यावेळी त्याने आपल्या हटके अंदाज आणि डान्सने चाहत्यांची मनं जिंकली. एकंदरीतच हे सर्व कलाकार मोठ्या पद्यावर धमाल करणार आहे आणि त्यांच्या आयुष्यातील धमाल मस्ती प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. 
   जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ सिनेमा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, २५ एप्रिल पासून प्रदर्शित होणार आहे !!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वैत मसूरकर दिग्दर्शित 'छबी' चित्रपट २५ एप्रिलला.....अभिनेता समीर धर्माधिकारी, अभिनेते मकरंद देशपांडे यांची मध्यवर्ती भूमिका

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.