रंगभूमीवर रंगलंय कुटुंबाचे 'किर्रतन'...

मराठी रंगभूमीवर सध्या एका कुटुंबाचे 'किर्रतन' रंगल्याचे दिसून येत असून, हे 'किर्रतन' साकारण्यासाठी संकर्षण कऱ्हाडे, तन्वी मुंडले, अमोल कुलकर्णी आणि वंदना गुप्ते या कलावंतांची टीम उत्साहाने काम करत आहे. 'प्रशांत दामले फॅन फाउंडेशन' प्रकाशित व 'गौरी थिएटर्स' निर्मित 'कुटुंब किर्रतन' हे नाटक अलीकडेच रंगभूमीवर आले असून, त्यात हे सर्व कलाकार भूमिका साकारत आहेत. या नाटकाचे कथासूत्र विनोद रत्ना यांचे असून, नाटकाचे लेखन संकर्षण कऱ्हाडे याने केले आहे. अमेय दक्षिणदास हे या नाटकाचे दिग्दर्शक असून, अशोक पत्की यांनी या नाटकाला संगीत दिले आहे. प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य व किशोर इंगळे यांची प्रकाशयोजना या नाटकाला लाभली आहे. 
या नाटकाबद्दल बोलताना संकर्षण कऱ्हाडे सांगतो, "मी लेखक असलेले आणि प्रशांत दामले निर्माते असलेले असे हे आमचे चौथे नाटक आहे. अमेय दक्षिणदास हे आमचे दिग्दर्शक आहेत. त्यांनी प्रायोगिक रंगभूमीवर बरीच वर्षे काम केले आहे आणि त्यांचे हे पहिलेच व्यावसायिक नाटक आहे. तन्वी मुंडले हिचे सुद्धा हे पहिलेच व्यावसायिक नाटक आहे. महत्त्वाचे म्हणजे, या नाटकाच्या निमित्ताने वंदना गुप्ते यांच्याबरोबर मला पहिल्यांदाच काम करायला मिळत आहे. आमच्या या आधीच्या 'तू म्हणशील तसं!' या नाटकातला अमोल कुलकर्णी हा अजून एक गुणी कलाकार याही नाटकात असून, आम्हा सर्वांची छान केमिस्ट्री जुळून आली आहे. आमचे हे कीर्तन कुठल्याही धर्माशी, जातीशी, पंथाशी, संप्रदायाशी किंवा परंपरेशी निगडित नाही. या नाटकातून आम्ही समाजाला काय देऊ शकतो, याचा विचार करत हे 'कुटुंब किर्रतन' करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे". 
   या नाटकात धमाल भूमिका रंगवत असलेल्या वंदना गुप्ते म्हणतात,"एकतर मी या नाटकाच्या निमित्ताने प्रशांत दामलेच्या प्रॉडक्शनमध्ये काम करत आहे. प्रशांत दामले म्हणजे 'ऑल इन वन' निर्माता आहे, उत्तम अभिनेता आहे आणि त्याची निर्मिती पण छान असते. त्यामुळे त्याने या नाटकासाठी मला विचारले आणि मी साहजिकच तयार झाले. संकर्षण या नाटकाचा लेखक आहे. त्याला लेखनाची आणि संवादांची उत्तम जाण आहे. त्याने हे नाटक छान लिहिले आहे आणि यातली माझी भूमिकाही चांगली आहे. खूप दिवसानंतर मला विनोदी प्रकारची भूमिका करायला मिळत आहे".  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वैत मसूरकर दिग्दर्शित 'छबी' चित्रपट २५ एप्रिलला.....अभिनेता समीर धर्माधिकारी, अभिनेते मकरंद देशपांडे यांची मध्यवर्ती भूमिका

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...