मधु मंगेश कर्णिक यांनी लिहिलेल्या पाच पुस्तकांचा प्रकाशन सोहळा.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आझाद मैदानावर आंदोलन करणारे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक ऊर्फ मधुभाई वयाची ९५ वर्षे पूर्ण करीत आहेत.
नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी त्यांनी लावलेल्या कोकण मराठी साहित्य परिषद नावाच्या छोट्या रोपट्याचे आज वटवृक्षामध्ये रुपांतर झाले आहे.
नवोदितांनी आदर्श ठेवावा, अशी लेखन क्षमता वयाच्या ९५ व्या वर्षी देखील असलेल्या मधु भाईंनी लिहिलेल्या पाच पुस्तकांचा प्रकाशन सोहळा या निमित्ताने प्रभादेवी येथील रवींद्र मिनी थिएटरमध्ये शुक्रवार दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
सदर प्रकाशन सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे भाषा मंत्री ना. उदयजी सामंत आणि सांस्कृतिक मंत्री ना. अॅड्. आशिषजी शेलार आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा