२७ वा चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठानचा सांस्कृतिक कलादर्पणचा अंतिम फेरीतील सर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव.....
२७ वा चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत सांस्कृतिक कलादर्पण चा यंदाचा अंतिम फेरीतील सर्वोत्कृष्ट नाटकांचा महोत्सव २०२५. श्री छत्रपती शिवाजी स्मारक ट्रस्ट यांच्या विशेष सहकार्याने साजरा झाला.यंदाच्या महोत्सवाचे प्रवेशद्वार कै. विजय कदम जेष्ठ अभिनेते यांच्या स्मृतीला अर्पण केला आहे. याचं उद्धाटन ज्येष्ठ लेखिका प्रतिभाताई मतकरी,अभिनेत्री सुप्रिया विनोद,तसेच अभिनेत्री पद्मश्री विजय कदम, श्री शिवाजी मंदिरचे बजरंग चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला.महोत्सवाचे उदघाटन प्रतिभा मतकरी,यांनी नटराजाचं पूजन करुन केलं तसेच सुप्रिया विनोद,पद्मश्री विजय कदम यांनी ही नटराजाचं पूजन केलं ,उपस्थित पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ आणि शाल,श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष-संस्थापक चंद्रशेखर सांडवे यांनी केले.
श्रीमती प्रतिभाताई मतकरी यांनी नाट्य महोत्सवास शुभेच्छा दिल्या,"या निमित्ताने शिवाजी मंदिर नाट्यगृहात येण्याचा योग आला,आज अगदी पुन्हा माहेरी आल्यासारखं वाटतंय,"अशी हृद्य भावना त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली,आणि चंद्रशेखर सांडवे यांचे आभार व्यक्त केले.
यंदा नाटकांचे परीक्षण शिरीष घाग, सतीश आगाशे, रवींद्र आवटी, राज पाटील,मनोहर सरवणकर यांनी काम पाहिले आहे ते सारेच आज उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे निवेदन तेजस्विनी मुंडे यांनी केले.नाट्यमहोत्सवाची शुभारंभी सुरुवात 'उर्मिलायन' या नाटकाच्या प्रयोगाने झाली, प्रयोगाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला, लवकरच चित्रपट महोत्सव ही सुरु होणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा