शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित 'सजना' चित्रपटातील "आभाळ रातीला" या नवीन गाणं रसिकांच्या भेटीला.

प्रेम, नाते संबंध आणि भावना यांची सुरेल गुंफण मांडणारा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट "सजना" या चित्रपटातील नवीन गाणं "आभाळ रातीला" प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. प्रेम ही भावना केवळ शब्दांतून नाही तर सूरांतूनही अनुभवता येते. ‘आभाळ रातीला ’ हे गाणं त्या प्रेमभावनेचा एक सुंदर अनुभव आहे. 
मराठी संस्कृतीच्या ठेव्याला उजाळा देणारा आणि परंपरेचा अभिमान जागवणारा हे गाणं आहे. या गाण्यात ढोल-ताशाचा गगनभेदी नाद, लेझीमच्या तालावर अस्सल मराठी पोशाख मध्ये नाचणारी तरुणाई आणि मुख्य अभिनेते आणि देवीच्या मंगलमय स्तुतीचा संगम रसिकांना अनुभवता येतो.
    गाण्याच्या चित्रीकरणात देखील मोठ्या मिरवणुका, ढोल-ताशाचे पथक आणि सजीव लेझीम नृत्य यांचा भव्य प्रदर्शन करण्यात आलं आहे. हे गाणे केवळ मनोरंजन नसून मराठी संस्कृतीच्या गाढ प्रेमाचा आणि परंपरेच्या जपणुकीचा एक सुंदर सोहळा आहे ज्याच्या प्रत्येक ठोक्यातून मराठी अस्मिता झळकते.
   सुहास मुंडे यांच्या शब्दरचनेमुळे गाण्यात प्रेमभावना अधिक खुलून आल्या आहेत. गाण्याचे चित्रीकरण सुद्धा अतिशय नयनरम्य आहे. ह्या गाण्याचे संगीतकार ओंकारस्वरूप हे आहेत. तर गायक आदर्श शिंदे आणि राजेश्वरी पवार हे आहेत. 
  "सजना" चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून, या गाण्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. शशिकांत धोत्रेंचा हा पहिलाच रोमँटिक सिनेमा आहे. या चित्रपटाची निर्मिती स्वतः शशिकांत धोत्रे ह्यांनी केली आहे तर कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन सुद्धा शशिकांत धोत्रे ह्यांनी केलं आहे. 'सजना' सिनेमा २३ मे २०२५ पासून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

'साजनभाई'च्या भूमिकेतील मंगेश देसाईचा रावडी लूक.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...