अश्विनी चवरेचा नववारी साडीतला मोहक लूक सोशल मीडियावर व्हायरल.
मराठी, हिंदी आणि साउथ चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री अश्विनी चवरे हिने नुकताच एक भव्य नववारी साडीतला पारंपरिक फोटोशूट सादर केल आहे. या फोटोशूटमध्ये तिने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे, स्त्रीशक्तीचे आणि परंपरेचे दर्शन घडवताना तिच्या सौंदर्याने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. अश्विनीने परिधान केलेली साडी ही एक नाजूक, सौंदर्यपूर्ण मुक्तासफेद (ivory white) रंगाची आहे, ज्यावर अत्यंत बारकाईने कढकाम केलेले आहे. साडीचे काठ आणि पदर हे झरजरी काठाने सजवले गेले आहेत,
जे तिच्या रूपाला शाहीपणा देतात.तिने परिधान केलेला गुलाबी (rose pink) रंगाचा ब्लाउज हा पूर्णपणे सिग्नेचर आहे — त्यावर आकर्षक झरजरी, सुतकाम व मणीकाम केलेले आहे. ब्लाउजची आस्तीन थोडी लांब असून त्यावरचा भरजरी डिझाईन पारंपरिकतेला आधुनिकतेची किनार देतो.नववारी साडी ही केवळ एक पोशाख नव्हे, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे. हाच वारसा अश्विनीने आपल्या मोहक अदा, क्लासिक दागिने, आणि संयत हास्याने साकारला आहे. फोटोशूटमधील तिच्या प्रत्येक पोझमध्ये नजाकत, आत्मविश्वास आणि एक कलात्मक भान दिसून येते. हे फोटो केवळ सोशल मीडियावर व्हायरलच झाले नाहीत, तर नव्या पिढीला पारंपरिकतेच्या नव्या ओळखी करून देणारे ठरले आहेत.अश्विनी चवरेने अभिनयाची सुरुवात करताच प्रेक्षकांच्या नजरेत भरली. तिने दक्षिणात्य चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, आणि मराठी सिनेमांमध्ये अभिनय करत विविध भाषांतील प्रेक्षकांपर्यंत आपली छाप सोडली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘जिलबी’ या मराठी चित्रपटात तिची भूमिका लक्षवेधी ठरली. तिच्या अभिनयातील सहजता, भावनिक सादरीकरण आणि संवादफेक प्रेक्षकांनी विशेषतः गौरवली आहे.प्रेक्षकांना आता तिच्या आगामी चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. ‘After London Cafe’ या मराठी चित्रपटात ती एका वेगळ्या रूपात दिसणार असून, चित्रपटाच्या कथानकाविषयी आणि तिच्या भूमिकेविषयी प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे. या सिनेमातून तिच्या अभिनयातील आणखी एक नवा पैलू उलगडेल
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा