नृत्य समशेर माया जाधव यांची पंचाहत्तरी .

   भारत सरकारच्या सांस्कृतिक विभाग तर्फे आयोजित करण्यात आलेल्या "फेस्टिवल ऑफ इंडिया " या कार्यक्रमाच्या प्यारीस येथे झालेल्या उदघाटन समारंभाच्या वेळी जगप्रसिद्ध आयफेल टॉवर खाली मराठमोळी लावणी सादर करुन महाराष्ट्राच्या परंपारिक लावणीला लोकमान्यते बरोबर राज्य मान्यता प्राप्त करुन देणाऱ्या नृत्यसमशेर माया जाधव 25 मे 2025 ला 75 व्या वर्षात पदार्पण करत आहेत.                         मुळच्या कोल्हापूरच्या असलेल्या मायाताईनी शिवाजी   विद्यापीठातुन समाजशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली आणि 1964 पासून त्यानी अभिनयाचीं कारकीर्द सुरु केली.    आतापर्यंत त्यानी 62 चित्रपटातुन विविध भूमिका साकारल्या आहेत त्यात 2 हिन्दी व एका गुजराती चित्रपटाचा समावेश आहे.                    9 व्यावसायिक मराठी नाटकातून त्यानी भूमिका केल्या  " होनाजी बाळा " "संगीत बावनखणी"" जय जय गौरी शंकर "या नाटकातील त्याच्या भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.                       6 दर्जेदार वाद्यवृदा च्या कार्यक्रमात नृत्य सादर केली.सुप्रसिद्ध गायक मुकेश. संगीतकार कण्याणजी-आनंद जी व बाबला यांच्या वाद्यवृदा बरोबर परदेश दौरे केले त्या कार्यक्रमात इतर नृत्या बरोबर लावणी नृत्य सादर करुन तेथील प्रेक्षकांची मने जिंकली.           भारत सरकारच्या संस्कृतीक विभागातर्फे रशिया.जर्मनी. मॉरिशस. इस्राईल. दुबई.येथे आयोजित करण्यात आलेल्या "भारत महोस्तव" या कार्यमात लावणी नृत्य सादर करण्यासाठी मायाताई यांना आमंत्रित करण्यात आले होते.दूरचित्र वाहिन्याच्या "दार उघड बये". "अवघाची संसार" "कुंकू"  मालिकांमध्ये त्यानी अभिनय केला आहे. त्याची भूमिका असलेली "सखा माझा पांडुरंग" ही  मालिका सध्या सनटीव्ही वर सुरु आहे.मायाताई यांनी " कुलस्वामिनी " ही स्वतःचीं संस्था स्थापन केली असून या संस्थे तर्फे आता पर्यंत 6 दर्जेदार लोकांनाट्ये. 3 पारंपरिक लोककलेचे कार्यक्रम व लव्हली स्टार आणि चित्रपती व्ही. शांताराम या हिन्दी वाद्यवृदा ची निर्मिती केली आहे, कृणाल मुझ्यिक या संस्थेने तयार केलेल्या विविध विषयावरील 1500 V. C. D.च्या प्रक्रियेत दिग्दर्शना बरोबर  अभिनय पण केला आहे यातील "रेतीवाला नवरा " रसिकाच्या लग्नात ""पार्वतीच्या बाळा" "सोळा हजारात देखणी" " निसर्ग राजा " या VCD लोकप्रिय झाल्या आहेत.            माया ताईंना मुबंई महानगर पालिका आणि पुणे महानगर पालिकेने "विशेष महिला"  म्हणून गौरविले आहे.तसेच मुंबई दूरदर्शन चा  "हिरकणी " पुरस्कार प्राप्त झाला आहे.   या वयातही त्या सक्षम व कार्यरत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

'साजनभाई'च्या भूमिकेतील मंगेश देसाईचा रावडी लूक.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...