'स्टोलन' या हिंदी ओरिजिनल गुन्हेगारी थ्रिलर चित्रपटाचा जागतिक प्रीमियर; ४ जूनपासून केवळ प्राइम व्हिडीओवर.

   भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मनोरंजन प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओने आज जाहीर केलं की, त्यांचा नवा हिंदी ओरिजिनल इन्व्हेस्टिगेटिव्ह क्राईम थ्रिलर चित्रपट'स्टोलन' याचा एक्सक्लुझिव्ह जागतिक प्रीमियर ४ जून २०२५ रोजी होणार आहे. ही करण तेजपाल दिग्दर्शित पहिलीच फीचर फिल्म असून ती जंगल बुक स्टुडिओसाठी गौरव ढींगरा यांनी निर्मित केली आहे. 'स्टोलन' ची कहाणी करण तेजपाल यांनी स्वप्निल सालकार - अगडबम आणि गौरव ढींगरा यांच्यासोबत लिहिली आहे.
    फिल्मच्या केंद्रस्थानी आहेत दोन आधुनिक विचारांचे भाऊ, जे ग्रामीण भारतातील एका रेल्वे स्थानकावर एका गरीब महिलेच्या लहान मुलाचं अपहरण होताना पाहतात. नैतिक जबाबदारीने प्रेरित होऊन, एक भाऊ दुसऱ्याला त्या आईची मदत करण्यासाठी आणि त्या मुलाला शोधण्याच्या धोकादायक मोहिमेत सामील होण्यास तयार करतो.
   या उत्कंठावर्धक आणि भावनिक चित्रपटात अभिषेक बॅनर्जी, हरीश खन्ना, मिया मेल्जर, साहिदुर रहमान आणि शुभम यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट भारतासह २४० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये ४ जून रोजी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.
   आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेली मान्यता
'स्टोलन'ने आपली दमदार सुरुवात व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये केली, जिथे त्याला स्टँडिंग ओव्हेशन मिळालं. त्यानंतर चित्रपटाने बीजिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफी आणि अभिनेत्रीचे पुरस्कार पटकावले. जपानमधील स्किप सिटी इंटरनॅशनल डी-सिनेमा फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शकाचे पुरस्कार मिळाले. झ्युरिच फिल्म फेस्टिव्हल कडून विशेष उल्लेख मिळाला. भारतात याचे प्रीमियर जिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाले आणि त्यानंतर २८ व्या केरळ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील चित्रपट सादर करण्यात आला.
प्राइम व्हिडीओचे प्रतिक्रिया:
मनीष मेंघानी, डायरेक्टर – कंटेंट लाइसेंसिंग, प्राइम व्हिडीओ इंडिया म्हणाले, "‘स्टोलन’ ही आमच्या त्या बांधिलकीचं प्रतीक आहे ज्यामध्ये आम्ही प्रामाणिक आणि प्रभावी कथा सादर करण्याचा प्रयत्न करतो. हा थ्रिलर केवळ मनोरंजन नाही तर समाजाला आरसा दाखवतो — न्याय, आघात आणि मानवी लवचिकतेसारख्या विषयांवर प्रकाश टाकतो. जागतिक स्तरावर याला मिळालेली मान्यता आणि आमचे प्रतिष्ठित एग्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर्स यांचं पाठबळ ही आमची दिशा अधिक स्पष्ट करते. करण तेजपाल यांच्या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांसमोर सादर करताना आम्हाला अभिमान वाटतो."
   एग्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर्सची अनुराग कश्यप म्हणाले,"‘स्टोलन’ या चित्रपटाने पहिल्याच फ्रेमपासून मला खिळवून ठेवलं. यातील सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे हा चित्रपट पारंपरिक साच्यात बसण्यास नकार देतो. सिनेमाला निडर असावं लागतं, आणि करणने ती गोष्ट सिद्ध केली आहे. ही एक अशी फिल्म आहे जी एक दिग्दर्शक म्हणून तुम्हाला प्रेरणा देते आणि सिनेमा बद्दलच्या आशा पुन्हा जागवते."
   किरण राव म्हणाल्या, "‘स्टोलन’ ही एक विलक्षण फिल्म आहे – ही रोमांचक कथा मानवी भावना आणि संघर्षांचं अतिशय संवेदनशील चित्रण करते. झुम्पा या पात्राचं सामर्थ्य आणि कोमलता पाहून ती दीर्घकाळ मनात राहते. प्राइम व्हिडीओसारख्या प्लॅटफॉर्मवर ती सादर करणे हा माझ्यासाठी सन्मान आहे."
   निखिल आडवाणी म्हणाले, "मी नेहमीच अशा कथा निवडतो ज्या रूढ चौकटी मोडतात आणि संवादाला सुरुवात करतात – ‘स्टोलन’ हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. कथा रोमांचक आहे पण त्याचवेळी अत्यंत भावनिक सखोलता असलेली आहे."
  विक्रमादित्य मोटवानी म्हणाले, "या चित्रपटाची गोष्ट वेगळी आहे – ती रहस्य व भावनांच्या समन्वयाने पुढे जाते. करण, गौरव, आणि स्वप्निल यांनी मिळून एक जबरदस्त कथा लिहिली आहे. मला आनंद आहे की मी या प्रोजेक्टचा भाग आहे."
   गौरव ढींगरा, निर्माता आणि सहलेखक म्हणाले, "‘स्टोलन’ ही एक अशी थ्रिलर फिल्म आहे जी मानवी भावनांना स्पर्श करते आणि ती सस्पेन्सच्या रूपात गुंफलेली आहे. लेखक आणि निर्माता म्हणून ही कथा जगभर पोहोचवणे आणि प्रेक्षकांकडून मिळालेला प्रतिसाद पाहणे अत्यंत भावनिक अनुभव होता. करण तेजपाल यांची सिनेमॅटिक शैली वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रभावी आहे. आमच्या प्रतिभावान कलाकारांनी प्रत्येक फ्रेमला जीवंत केलं आहे."

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

'साजनभाई'च्या भूमिकेतील मंगेश देसाईचा रावडी लूक.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...