'शेवग्याच्या शेंगा' नाटकाच्या तालमीला बॉलीवुड दिग्दर्शक, अभिनेते अनुपम खेर यांची उपस्थिती...

मराठी रंगभूमीवर येऊ घातलेल्या ह्या गजेंद्र अहिरे लिखित दिग्दर्शित ‘शेवग्याच्या शेंगा’ या नाटकाच्या तालमीला बॉलिवूडमधील ख्यातनाम अभिनेते व दिग्दर्शक अनुपम खेर उपस्थित राहिले. 
   कलाकारांनी केलेल्या तालमीचे अनुपम खेर यांनी बारकाई ने निरीक्षण केले. रंगमंचावरील अभिनय, संवादफेक आणि प्रेक्षकांशी निर्माण होणारे नाते यावर त्यांनी कलाकारांशी संवाद साधला.
   "मला हे नाटक हिंदीत करायला आवडेल. आणि हिंदीत करताना मला काय सादर करायचं आहे हे मला अविनाश नारकर यांच्या कडे बघून नेमकं समजलं आहे त्या अनुषंगाने मी काही दृश्यांचं चित्रिकरण सुद्धा केलं आहे." असे मत अनुपम खेर यांनी व्यक्त केले. नाटकाचे दिग्दर्शक व संपूर्ण टीम यांच्यासाठी ही उपस्थिती प्रेरणादायी ठरली असून आगामी प्रयोगांसाठी नवचैतन्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
    ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर, नंदीता पाटकर, अपूर्वा गोरे, अंकिता दिप्ती, साकार देसाई हे कलाकारही नाटकात आहेत. दिप्ती प्रणव जोशी या नाटकाच्या निर्मात्या असून, राहुल कर्णिक, पुलकेशी जपे, डॉ. मंदार जोशी सहनिर्माते आहेत. अथर्व थिएटर्स चे संतोष भरत काणेकर या नाटकाचे प्रस्तुतकर्ता आहेत. ‘शेवग्याच्या शेंगा’ या नाटकाचा शुभारंभ प्रयोग २७ सप्टेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यमंदिर,कोथरूड, पुणे येथे होणार असून मुंबईत शनिवार ४ ऑक्टोबर दुपार ४:३०वा. मा.दिनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले. रविवार ५ ऑक्टोबर दुपार ४:३० वा. कालिदास नाट्यगृह, मुलुंड. या नाटकाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

'साजनभाई'च्या भूमिकेतील मंगेश देसाईचा रावडी लूक.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...