‘आफ्टर ओ.एल.सी’ चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल; नवीन तारीख लवकरच होणार जाहिर.

   'आफ्टर ओ.एल.सी' या मराठी ॲक्शन चित्रपटाबद्दल गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चा सुरू होती. चित्रपटाचा ट्रेलर आल्यावर प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली होती. ट्रेलरमध्ये दाखवलेल्या ॲक्शन आणि थरारक सीनमुळे प्रेक्षकांना सिनेमा कधी पाहायला मिळणार ही उत्सुकता खूप होती. मात्र आता प्रेक्षकांना आता आणखी वेळ थांबावे लागणार आहे. कारण २८ नोव्हेंबरला रिलीज होणारा हा चित्रपट तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. चित्रपटाशी संबंधित महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवीन रिलीज तारीख लवकरच जाहीर केली जाईल. आणि नवीन अपडेट प्रेक्षकांना जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर सांगितली जाईल.
   या चित्रपटात कवीश शेट्टी, मेघा शेट्टी, शिवानी सुर्वे, विराट मडके, अश्विनी चवरे यांसह अनेक मराठी कलाकारांची मोठी टीम दिसणार आहे. चित्रपटांची कथा थरार आणि रहस्यांनी भरलेली आहे. ट्रेलरमध्ये दिसलेल्या प्रसंगांमधूनच चित्रपटात अनेक रोमांचक गोष्टी असतील हे स्पष्ट झाले आहे. म्हणूनच ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. आता रिलीज डेट बदलल्यामुळे प्रेक्षकांना काही काळ प्रतीक्षा करावी लागेल, पण चित्रपट निर्मात्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व प्रक्रिया पूर्ण होताच चित्रपटाची नवीन तारीख घोषित केली जाईल.
   दिग्दर्शक सडागारा राघवेंद्र यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून हा चित्रपट ‘दिपक राणे फिल्म्स’ आणि ‘इंडियन फिल्म फॅक्टरी’ अंतर्गत चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून हा सिनेमा मराठी भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल अजूनही उत्सुकता कायम आहे. नवीन तारीख जाहीर होताच प्रेक्षकांना त्यांच्या जवळच्या थिएटरमध्ये हा सिनेमा पाहायला मिळणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

'साजनभाई'च्या भूमिकेतील मंगेश देसाईचा रावडी लूक.

"अंकुश" चित्रपटात केतकी माटेगावकर साकारणार "रावी"ची भूमिका...