कलाकाराला रसिकांच्या ऋदयापर्यंत पोहचता आलं पाहिजे! मराठी रंगभूमीदिनी रंगकर्मी डॉ.वासुदेव विष्णूपूरीकर यांचे प्रतिपादन.
कोणत्याही कलावंताला रसिकाच्या ऋदयापर्यंत पोहोचता आलं पाहिजे,तरच अभिनयात तो श्रेष्ठ ठरतो,असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.वासूदेव विष्णूपुरीकर यांनी येथे ज्येष्ठ रंगकर्मिच्या सन्मान सोहळ्यात बोलताना केले.बुधवारी मराठी रंगभूमीदिन श्री.विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या वतीने प्रभादेवीच्या रविद्रमंदिरमध्ये मोठ्या आदराने पार पडला.या प्रसंगी नाट्यकलेसाठी आयुष्य वाहिलेल्या सहा गुणीकलाकारांचा सन्मान सोहळा पार पडला.
समारंभाला ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक विश्वास सोहनी,अभिनेते डॉ. वासुदेव विष्णुपुरीकर,ज्येष्ठ कथालेखक काशिनाथ माटल,दिग्दर्शक राम सारंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.संस्थेचे निर्माते दत्ता मोरे अध्यक्षस्थानी होते. डॉ.वासुदेव विष्णुपुरीकर सत्कार मूर्तीचा गुणगौरव करताना पुढे म्हणाले,नाटकात आयुष्य झोकून देणा-या या कलावंतांच्या योगदानाला नाट्यक्षेत्रात तोड नाही.प्रसिध्द सिनेदिग्दर्शक विश्वास सोहनी म्हणाले,कलाकाराला कलेशिवाय जागता येत नाही. ज्येष्ठ कथालेखक काशिनाथ माटल म्हणाले,राज्य नाट्यस्पर्धेत सातत्याने प्रथम क्रमांकाने आपली नाटके आणणारे निर्मिते दत्ता मोरे आपले यश सांघिक मानतात,ही वृत्ती आज नाट्यक्षेत्रात दुर्मिळ होऊ लागली आहे.निर्माते दत्ता मोरे आपल्या आभाराच्या भाषणात म्हणाले, कलावंताचे यश हेच आपले अंतिम समाधान असले पाहिजे.पाहुणे दिग्दर्शक राम सारंग यांनीही आपल्या भाषणात कलाकारांचा गुणगौरव केला.या औचित्याने रामकृष्ण पार्टे,विजय सूर्यवंशी, निलांबरी खामकर, डॉ.अनुराधा कान्हेरे, विद्याधर शिवणकर,बाबा घोणे या मराठी नाट्य, चित्रपट,मालिकेत आपल्या कुशल अभिनयाने लिलया साकारणा-याकलावंताचा शाल,श्रीफळ,मानपत्र,सन्मानचिन्हपुष्पगुच्छाने सन्मान करण्यात आला. या प्रसंगी आपले एका पेक्षा एक वाचनीय पाच कथासंग्रह लिखाण करणारे यशस्वी लेखक काशिनाथ माटल यांचा श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे खुमासदार सुत्रसंचलन ज्येष्ठ रंगकर्मी, कवी,अभय पैर यांनी केले.प्रेक्षकात "स्वामी" या नाटकात स्नामींची दिलखेचक भूमिका साकारणारे ८० वर्षाचे कलाकार के.राघवकुमार आणि नाट्य क्षेत्राशी निगडीत असंख्य कलाकार उपस्थित होते.सर्वश्री विजय सर्क्रे,अमन दळवी,विद्या निकम,विशाल साळवे,जयवंत सातोसकर, वैष्णवी देशमुख यांचे सहकार्य विशेष लक्षणीय ठरले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा