सलमान खानचा संदेश: ‘एमपॉवर मुंबई सायक्लोथॉन २०२५’. “Ride for Your Mind, Ride for Your City, Ride for Change.”
‘राइड टू एमपॉवर मुंबई सायक्लोथॉन २०२५’ हा उपक्रम यावर्षी मोठ्या प्रमाणात आयोजित केला जात असून, मुंबईकरांना फिटनेस, मानसिक आरोग्य आणि पर्यावरण या तिन्ही विषयांबद्दल जागरूक करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या निमित्ताने सलमान खान यांनी खास संदेश देत मुंबईकरांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
सलमान खान म्हणाले –
“Mumbai, gear up! Join us for the Ride to Mpower Mumbai Cyclothon on 30th November at MMRDA Ground, BKC Bandra. Ride for purpose and better mental health and fitness, and be part of the movement for a greener, healthier city. Join a Ride to Mpower Mumbai Cyclothon - for every reel turns a change.”
हा उपक्रम लोहा फाउंडेशन तर्फे, फिट इंडिया मूव्हमेंट आणि क्रीडा प्राधिकरण भारत (एस.ए.आय.) यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. यामागील मुख्य हेतू - मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे आणि “शारीरिक तंदुरुस्तीइतकेच मानसिक आरोग्य महत्त्वाचे” हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणे. मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेले एमपॉवर (आदित्य बिरला एज्युकेशन ट्रस्ट) या उपक्रमासोबत कार्यरत आहे.
रेस डायरेक्टर आणि मुख्य सल्लागार कृष्ण प्रकाश (आय.पी.एस., ए.डी.जी. – फोर्स वन) म्हणाले, “सायकलिंग म्हणजे केवळ स्पर्धा नव्हे; ती शिस्त, सहनशक्ती आणि एकतेची भावना आहे. या सायक्लोथॉनमुळे मानसिक आरोग्याचा महत्त्वपूर्ण संदेश लोकांपर्यंत पोहोचतो.”
सायक्लोथॉनमध्ये विविध अंतरांचे चार पर्याय ठेवण्यात आले आहेत -
१० किमी, २५ किमी, ५० किमी आणि १०० किमी. सर्व वयोगटातील लोकांसाठी हे उपक्रम खुले आहेत. सहभागींना सायक्लिंग जर्सी, मेडल, गुडीज, वैयक्तिक फोटो, ई-टायमिंग प्रमाणपत्र, तसेच वैद्यकीय आणि हायड्रेशन सुविधा कार्यक्रमाच्या संपूर्ण मार्गावर मिळणार आहेत.
कार्यक्रमात पुढील आकर्षक झोन्स देखील असतील -
मानसिक आरोग्य जागरूकता विभाग, झुंबा सेशन्स, लाइव्ह संगीत, हेल्दी नाश्ता, तसेच विशेष ‘चॅरिटी बीआयबी’ पर्याय, ज्यातून मानसिक आरोग्य सेवांना थेट मदत होईल.
कार्यक्रमाचा तपशील
• स्थळ : एम.एम.आर.डी.ए. ग्राउंड, बी.के.सी., मुंबई
• दिनांक : ३० नोव्हेंबर २०२५
• वेळ : पहाटे ४.०० वाजल्यापासून
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा