प्रेक्षकांवर मोहिनी घालायला येतेय 'तुंबाडची मंजुळा'..
कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो निसर्गरम्य परिसर, नयनरम्य समुद्रकिनारा आणि याचभोवतीने फिरणाऱ्या किती तरी गूढ अशा रहस्यमय कथा आणि सोबतीला गावाकडच्या गजाली. भुता - खेतांवरील चर्चा हा गावाकडच्या माणसांचा कायमच मनोरंजनाचा विषय राहिलेला आहे. यातच वीतभर घडलेल्या गोष्टी हातभर लांब करून सांगणे हा जणू अनेकांचा आवडता छंदच. अशाच काहीशा गूढ वातावरणातली आणि कोकणाच्या परंपरेला साजेशी एक अतिशय रंजक गोष्ट झी स्टुडिओजने आपल्या प्रेक्षकांसाठी आणली आहे. ' तुंबाडची मंजुळा ' असे या चित्रपटाचं नाव असून होळीच्या दिवशी सोशल मीडियावरून या चित्रपटाचं आगळं वेगळं मोशन पोस्टर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. ज्यातून चित्रपटाबद्दलची उत्सुकता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. एका घराच्या अर्धवट बंद दाराआड दिसणारा एक गूढ चेहरा आणि दोन्ही कवाडांच्यामध्ये अडकलेले काही हात.. जणू काय घरातून बाहेर पडायचा ते प्रयत्न करत आहेत हे सांगणारं हे पोस्टर अतिशय औत्सुक्यपूर्ण झालेलं आहे. येत्या ५ जून रोजी म्हणजेच जागतिक पर्यावरण दिनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. विशेष म्हणज...