कास्टिंग वाईब - प्रादेशिक कलाकारांना मनोरंजन क्षेत्रात पदार्पण देणारे नवीन व्यासपीठ !

गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशातील चित्रपट उद्योग आणि त्याच्याशी निगडित इतर टीव्ही आणि ओटीटी माध्यमांची झपाटय़ाने वाढ होत आहे. भारत हा आजच्या घडीला जगात सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश आहे. त्यामुळे या क्षेत्रांशी निगडित अभिनय, दिग्दर्शन, पटकथा लेखन, सिनेमॅटोग्राफी, संकलन, ध्वनी, संगीत, नृत्य दिग्दर्शन, ग्राफिक्स इ. वेगवेगळ्या विभागांमध्ये करिअर करण्याच्या उत्तम संधी आज उपलब्ध आहेत. संधी जरी असल्या तरीही  प्रादेशिक विभागातील अनेक विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे अनेकवेळा त्यात अपयश येते . प्रादेशिक कलाकारांना अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठीसुद्धा  भरपूर मेहनत करावी लागते. मुख्यतः आपले गाव सोडून महत्वाच्या शहरांमध्ये मध्ये येऊन राहावे लागते.काम शोधण्याची मेहनत आणखी वेगळी .त्यातच  गेल्या २ वर्षात कोविड च्या प्रादुर्भावांमुळे प्रादेशिक कलाकारांचा हा प्रवास आणखीच खडतर झाला आहे. त्यामुळे अंगात अभिनय कौशल्य आणि  प्रचंड मेहनत करण्याची तयारी असली तरीही मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करणे हे स्वप्नवत होऊ लागले आहे .अशाच प्रादेशिक कलाकारांना मनोरंजन  क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी नवीन व्यासपीठ देण्याचा प्रयत्न लायनगेज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने केला आहे .कास्टिंग वाईब हे टॅलेंट आणि कास्टिंग चे डिजिटल व्यासपीठ त्यांनी या प्रादेशिक कलाकारांसाठी तयार केले आहे आणि ते सुद्धा पूर्णपणे मोफत. 

चित्रपटामध्ये कथेच्या आणि भूमिकेच्या गरजेनुसार योग्य ते अभिनेते आणि अभिनेत्री यांची निवड केली जाते. याशिवाय अनेक छोटय़ा-मोठय़ा भूमिकांसाठी चांगल्या कलाकारांची गरज असते. मात्र आजही अनेक प्रादेशिक कलाकार अंगात सर्व गुण असून सुद्धा मनोरंजन क्षेत्रातील योग्य त्या व्यक्तींपर्यंत पोहोचू शकत नाहीत. अनेक वेळा ऑडिशन्स नेमक्या कुठे सुरू आहेत, याबाबत कोणतीही योग्य माहिती उपलब्ध नसते. याबाबत एक पद्धत (सिस्टिम) असणे खरंच आवश्यक होते  आणि त्यासाठीच कास्टिंग वाईब ची निर्मिती झाली आहे. कास्टिंग वाईब हे  डिजिटल टॅलेंट आणि कास्टिंग व्यासपीठ आहे . ज्यावर मनोरंजन क्षेत्रातील कलाकार आणि त्याचबरोबर तंत्रज्ञ स्वतःची एक मोफत प्रोफाइल बनवू शकतात. या प्रोफाइल मध्ये त्या कलाकार किंवा तंत्रज्ञ चे सोशल मीडिया संपर्क , त्या कलाकार किंवा तंत्रज्ञ यांच्याबद्दल खाजगी आणि व्यवसायिक माहिती , कामाचा अनुभव , स्वतःचे आणि कामाचे फोटोस आणि विडिओ असे सर्व काही एकाच लिंक वर उपलब्ध होऊ शकणार आहे . त्याच बरोबर या कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यासाठी ऑडिशन आणि इतर कामाच्या निवड प्रक्रियेबद्दल  सुद्धा माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. आणि महत्वाचे म्हणजे ही सर्व माहिती निशुल्क असणार आहे . त्याचबरोबर यावर बनलेल्या प्रोफाइल या विविध निर्मिती संस्था , टीव्ही वाहिनी आणि ओटीटी माध्यमांपर्यंत मोफत पोहोचवली जाणार आहे. हे व्यासपीठ कलाकार , तंत्रज्ञ आणि  निर्मिती संस्था , टीव्ही वाहिनी आणि ओटीटी माध्यम यांच्यातील एका ब्रिज चे काम करणार आहे. 

कास्टिंग वाईब या व्यासपीठावर अनेक आघाडीच्या कलाकारांनी स्वतःच्या प्रोफाइल बनवल्या आहेत . या व्यासपीठावर  प्रोफाइल बनवण्यासाठी तुम्हाला https://castingvibe.com/ या संकेत स्थळावर भेट द्यावी लागणार आहे आणि तिथे टॅलेंट रजिस्ट्रेशन या टॅब वर जाऊन स्वतःची मोफत प्रोफाइल बनवता येणार आहे..

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.