' प्लॅनेट मराठी'वर ' मी पुन्हा येईन' प्रदर्शित.,...



राजकारणातील साधारण परिस्थितीवर मार्मिक पद्घतीने भाष्य करणारी ‘मी पुन्हा येईन' वेबसीरिज 'प्लॅनेट मराठी’वर प्रदर्शित झाली असून अरविंद जगताप लिखित, दिग्दर्शित या वेबसीरिजमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, सिद्धार्थ जाधव, रुचिता जाधव, भारत गणेशपुरे असे दमदार कलाकार आहेत. 

 सध्या ‘मी पुन्हा येईन’चे तीन एपिसोड्स प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. यात सत्तेसाठी पक्ष वरिष्ठांना विनवण्या, सत्तानाट्य, मंत्रीपदासाठी राजकारण्यांची फसवणूक, आमदारांची पळवापळवी हे सर्व विनोदी शैलीत दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 
     दिग्दर्शक अरविंद जगताप म्हणतात, "सध्याच्या राजकारणाशी याचा काहीही संबंध नसून निव्वळ मनोरंजनाच्या हेतूने याची निर्मिती करण्यात आली आहे. राजकारणामागील गोष्टी या निमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील."                                                                प्लॅनेट मराठीचे प्रमुख संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " विनोदीशैलीत निर्मित केलेली ही वेबसीरिज श्रोत्यांना खिळवून ठेवणारी आहे. राजकारणात कधीही काहीही घडू शकते, हे वेबसीरिज राहिल्यावर कळेलच."
प्लॅनेट मराठी, गौतम कोळी व जेम क्रिएशन्सने ‘मी पुन्हा येईन’ची निर्मिती केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वैत मसूरकर दिग्दर्शित 'छबी' चित्रपट २५ एप्रिलला.....अभिनेता समीर धर्माधिकारी, अभिनेते मकरंद देशपांडे यांची मध्यवर्ती भूमिका

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.