निर्माते, दिग्दर्शक महेश टिळेकर यांची दिग्गज मल्याळम कलाकारांशी भेट,.........





सिनेमाचा विषय आणि सहज अभिनय करणारे कलाकार यामुळे मल्याळम सिनेमा जगभर पाहिला जातो.मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि दिग्गज कलाकारांच्या बरोबर काम केलेले निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकर यांचे साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील कलाकारांशी मैत्री आहे. नुकतेच त्यांनी केरळ मध्ये मल्याळम सिनेमांमध्ये अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या काही कलाकारांच्या घेतलेल्या भेटीचे फोटो फेसबुक वर पोस्ट केले आहेत.

छोट्या दुकानात टेलरिंग काम करून पुढे मल्याळम सिनेमांसाठी कॉस्च्युम डिझायनर म्हणून काम करत अभिनयाला सुरुवात केलेले लोकप्रिय जेष्ठ कलाकार इंद्रन तसेच छोट्या मोठ्या कार्यक्रमातून मिमिक्री ,निवेदन करून मग मल्याळम सिनेमांतून कधी विनोदी तर कधी गंभीर भूमिकांमधून प्रसिद्ध असलेले अभिनेते सूरज,ज्यांना एक नॅशनल अवॉर्ड आणि २० केरळ सरकारचे उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाले आहेत त्यांची भेट महेश टिळेकर यांनी घेऊन चित्रपटसृष्टी बाबत चर्चा केली.
जय भीम या बहुचर्चित चित्रपटातून लक्षवेधी भूमिका साकारणारी मल्याळम अभिनेत्री लिजोमोल जोस हिच्याशी पण महेश टिळेकर यांनी संवाद साधला.

महेश टिळेकर यांच्या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या "हवाहवाई" या चित्रपटात द ग्रेट इंडियन किचन या मल्याळम सिनेमातून समर्थ अभिनयाचं दर्शन घडवणारी अभिनेत्री नीमिषा सजयन ही मराठीत प्रथमच पदार्पण करीत आहे.

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.