आदर्श शिंदे यांचे 'श्रीगणेशा देवा श्रीगणेशा...' प्रेक्षकांच्या भेटीला



लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार असून त्याच्या आगमनाची सर्वत्र जय्यत तयारी सुरु आहे. सर्वत्र चैतन्यदायी वातावरण आहे. त्यातच आता बाप्पाच्या स्वागतासाठी ''अल्ट्रा मीडिया ॲण्ड  एन्टरटेन्मेंट प्रा. लि.'' घेऊन आले आहे, ''श्रीगणेशा देवा श्रीगणेशा...'' हे आल्हाददायी गाणं. आदर्श शिंदे यांच्या जल्लोषमय आवाजातील या गाण्याला ओंकार घाडी यांचे शब्द लाभले असून काशी रिचर्ड यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. गणेशोत्सवात सर्वांनाच ठेका धरायला लावणाऱ्या या गाण्याची निर्मिती सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली आहे. 

ढोल ताशांचा गजर ... गुलालाची उधळण.. बाप्पाचा जयघोष... असे गणेशोत्सवातील भारावून जाणारे वातावरण या गाण्यात पाहायला मिळत आहे. बाप्पाविषयीची भाविकांची आत्मीयता या भावपूर्ण गाण्यातून व्यक्त होत आहे. या गाण्याबद्दल  गायक आदर्श शिंदे म्हणतात, ''मुळात बाप्पाचे गाणं गायला मला नेहमीच आवडते. भक्तिमय गाणी गाण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. ''श्रीगणेशा देवा श्रीगणेशा...'' हे गाणेही असेच स्फूर्तिदायी गाणे आहे. हे गाणे भाविकांनाही आवडेल, अशी मी आशा व्यक्त करतो.'' 

त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव  ''श्रीगणेशा देवा श्रीगणेशा...''ने सर्वत्र जल्लोषात आणि थाटात साजरा होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.