सोनाली कुलकर्णीचा जाळ अन् धूर संगटच… झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड मध्ये ..,


 
 
मराठी विनोदी सिनेमातील बादशहा म्हणून ओळखले जाणारे दादा कोंडके यांच्या गाजलेल्या सिनेमांनी आणि त्यातील ठसकेबाज गाण्यांनी एक काळ गाजवला. विशेष म्हणजे आजही दादा कोंडके यांच्या गाण्यांवर थिरकण्याचा मोह आवरत नाही. त्यात " केळेवाली मी सांगा तुम्हाला शोभल का ? " हे गाणं तर दादांच्या सिनेमातील मास्टरपीस. दादा कोंडके आणि उषा चव्हाण या जोडीने अनेक गाण्यांमध्ये धमाल केलीय त्यापैकीच हे गाणं. दादांच्या सिनेमातील तीच केळेवाली बनणार आहे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. सोनाली , दादा कोंडके यांच्या सुपर हिट चित्रपटातील सुपर हिट गाण्यांवर झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड या सोहळ्यात नृत्य सादर करणार आहे . विनोदाची खाण असलेला हा सोहळा ९ ऑक्टोबरला झी टॉकीज या वाहिनीवर दुपारी १२ आणि सायंकाळी ७ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

मराठी सिनेमातील अप्सरा फेम सोनाली कुलकर्णी म्हटलं की काहीतरी हटके बघायला मिळणार याची आता तिच्या चाहत्यांना सवयच झाली आहे. छंद लागला म्हणत सोशल मीडियावर तुफान हिट झालेल्या सोनालीच्या डान्सचा, अभिनयाचा, भूमिकेचा प्रत्येक अपडेट जाणून घेण्याचा जणू तिच्या चाहत्यांना छंदच लागला आहे. 
झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड मध्ये सोनाली आणि दादा कोंड़केंच्या भूमिकेत विनोदवीर भाऊ कदम सुद्धा  केळ्याची टोपली डोक्यावर घेऊन ठुमके मारताना दिसणार आहेत.
कॉमेडी अॅवार्ड असल्याने विनोदी सिनेमांचा श्वास असलेल्या दादा कोंडके यांची गाणी, डायलॉग अशी या सोहळ्यातील मनोरंजनाची थीम आहे. यामध्येच सोनाली, पांडु हवालदारवर फिदा असलेल्या केळेवालीच्या अदांनी चाहत्यांना घायाळ करणार आहे.
 दरवर्षी झी टॉकीज कॉमेडी अॅवार्डची पर्वणी रसिकांना मिळत असते. यंदाच्या झी टॉकीज कॉमेडी अॅवार्डच्या मंचावर दादा कोंडके यांच्या सिनेमातील ठसकेबाज गाण्यांवरील डान्सवर कलाकार थिरकणार  आहेत. नाटक, सिनेमा या माध्यमातील विनोदी कलाकृतींना गौरवण्यासाठी झी टॉकीज कॉमेडी अॅवार्ड प्रदान करण्यात येतात. या वर्षी झी टॉकीज ला १५ वर्ष पूर्ण  होत आहेत तर गेल्या ७ वर्षापासून झी टॉकीजतर्फे कॉमेडी अॅवार्ड सोहळा रंगतो आहे. विनोदी कलाकृती, कलाकार यांच्यामध्येही झी टॉकीज कॉमेडी अॅवार्डची उत्सुकता असते. यंदाच्या सोहळ्यात झी टॉकीज कॉमेडी अॅवार्डवर कोणत्या कलाकारांनी नाव कोरलं याची प्रेक्षकांची प्रतीक्षा  ९ ऑक्टोबरला झी टॉकीज या वाहिनीवर दुपारी १२ आणि सायंकाळी ७ वाजता पूर्ण होईल.

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.