रिक्षा चालकाची मुलगी झळकणार चित्रपटात.......




साताऱ्याची ऋतुजा टंकसाळे ही नवोदित अभिनेत्री "प्रेम म्हणजे काय असतं" या चित्रपटातून पदार्पण करत आहे. नव्या दमाच्या कलाकारांनी केलेला 'प्रेम म्हणजे काय असतं' हा चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

तख्त प्रॉडक्शनने 'प्रेम म्हणजे काय असतं' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर प्रसाद दत्तात्रय इंगवले यांनी चित्रपटाचं लेखन,  दिग्दर्शन आणि निर्मिती अशी तिहेरी जबाबदारी निभावली आहे. प्रेम ही संकल्पना अत्यंत वेगळ्या पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात आली आहे. उत्तम कथा, फ्रेश कलाकार, श्रवणीय संगीताचा मिलाफ या चित्रपटात झाला आहे.

ऋतुजा टंकसाळे ही साताऱ्याची तरुणी पहिल्यांदाच चित्रपटात अभिनय करत आहे. प्रेम म्हणजे काय असतं या चित्रपटात ऋतुजानं अपर्णा ही भूमिका केली आहे.ऋतुजाचे वडील रिक्षाचालक असून चित्रपटाची, अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातली ऋतुजा आपला पहिला चित्रपट प्रदर्शित होणार असल्यानं उत्साहात आहे. 'प्रेम म्हणजे काय असतं या चित्रपटातून मला खूप काही शिकायला मिळालं, चित्रपट हे माध्यम समजून घेता आलं. आता याच क्षेत्रात करिअर करायचं का हे ठरवलेलं नाही. पण संधी मिळाल्यास काम करायला नक्कीच आवडेल,' असं ऋतुजानं सांगितलं.

प्रेम म्हणजे काय असतं याचित्रपटातून निर्माते आणि दिग्दर्शकांनी अनेक नवोदित कलाकारांना या चित्रपटातून सुवर्ण संधी दिली असल्याने या चित्रपटातील कलाकारांनी त्यांचे आभार मानले आहेत.

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.