‘गोष्ट एका पैठणीची’ला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान'अक्षय बर्दापूरकर', 'शंतनु रोडे' पुरस्काराने सन्मानित.
सिनेसृष्टीत अमूल्य योगदान देणाऱ्या पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकाराला दरवर्षी मानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाचा
६८ वा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा नुकताच दिल्ली येथे संपन्न झाला असून या वेळी ‘सर्वोत्कृष्ट चित्रपटा’चा पुरस्कार ‘गोष्ट एका पैठणीची’ला मिळाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार दिग्दर्शक शंतनू रोडे आणि प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली असून येत्या २ डिसेंबर रोजी ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. स्वप्नाचा नक्षीदार प्रवास घडवणाऱ्या या चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, मिलिंद गुणाजीं, शशांक केतकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमसाठी ही आनंदाची बाब आहे आणि हा पुरस्कार केवळ माझ्या एकट्याचा नसून संपूर्ण टीमचा आहे. खूप सुंदर आणि मनाला स्पर्शून जाणारी ही कथा आहे. या कथेला मध्यमवर्गीय स्वप्नांच्या वास्तवाची किनार आहे. म्हणूनच हा चित्रपट प्रेक्षकांना खूप जवळचा वाटणारा आहे. प्लॅनेट मराठीने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासोबतच त्यांना सर्वोत्कृष्ट आशय देण्याचा प्रयत्न केला आणि त्याचेच हे फळ आहे.
अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, गोल्डन रेशो फिल्म्स आणि लेकसाईड प्रॅाडक्शन प्रस्तुत ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल.
Comments
Post a Comment