मनोरंजन क्षेत्रात अग्रेसर असणा-या त्या तिघींनी धरली "निर्मिती" ची वाट.....
२२ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ६ वाजता दीनानाथ नाट्यगृह, पार्ले येथे सादर होणाऱ्या "स्वरांगण" दिवाळी पहाट ह्या एक सुरेल दीपोत्सवाच्या माध्यमातून जयंती वाघधरे, पूजा भंडारे आणि अश्विनी कांबळे या तीन मुलींनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे.
*गेली कित्येक वर्ष पत्रकारिता, anchoring ,मार्केटिंगचा तगडा अनुभव असलेली "जयंती वाघधरे "... तर थिएटर, आर.जे, संगीत, आणि नृत्य कलेचा चिकित्सक अभ्यास असलेली "पूजा भंडारे "... व पत्रकारिता,पी.आर, मार्केटिंग चा अनुभव घेऊन निर्मिती संस्थेत निर्मिती आणि व्यवस्थापनाचा अनुभव घेऊन "अश्विनी कांबळे " ...* या तीन मैत्रिणींनी नव निर्मितीचे स्वप्न रंगवण्यात सुरुवात केली. मुली ह्या कोणत्याच क्षेत्रात मागे पडू शकत नाही हा विश्वास बाळगत त्यांनी "झेन एंटरटेनमेंट" ची स्थापना केली.
मनोरंजन क्षेत्रात बरीच लोक कलाकार, लेखक, दिग्दर्शक म्हणून कामाची सुरुवात करत स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात. मालिका चित्रपट नाटक यांमार्फत बरेच कलाकार लेखक, दिग्दर्शक जन्माला येतात. या सगळ्यांवर प्रकाश ज्योत टाकणारी महत्वाची भूमिका निभावत असतो तो म्हणजे निर्माता. आपल्या कलाकृतीचे प्रत्येक डिपार्टमेंट योग्य त्या व्यक्तीमार्फत हाताळले जाणे. प्रत्येकाची निवड करत असताना या प्रत्येक डिपार्टमेंटचे सांगड घालून त्यातून एखादी कलाकृती निर्माण करणे. एवढेच नाही तर ती रसिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा आणि वेगवेगळ्या कल्पनांचा वापर करून त्या कलाकृतीला न्याय मिळवून देणे. म्हणजे एका बाळाला जन्म देऊन त्याचे संगोपन करण्यासारखेच आहे.
आपण कुठेतरी टिव्ही अथवा वृत्तपत्रात दिसावं अशी स्वप्न बघत असणाऱ्या या सोशल मीडिया च्या प्रेमात पडलेल्या पिढीत. आपल्या माध्यमातून कुणीतरी दिसावं आणि लोकांपर्यंत पोहोचावं, एखाद्या कलेचे आणि कलाकाराचे निर्माते आपण असावं असा वेगळा विचार करत या तीन मैत्रिणींनी मनोरंजन क्षेत्रात आपल्या प्रवासाला सुरुवात केली.
फिल्ड वरील आणि अभ्यासातील अनुभवां सोबतच या कलाक्षेत्रातील काही वरिष्ठांची साथ आणि मार्गदर्शन मिळवत. आपली वेगळी ओळख निर्माण कशी होईल यासाठीचे धडपड यांची सुरू असताना त्यांनी आपल्यासारख्याच काही जिद्दी कलागुणसंपन्न मुलींची निवड करून या संस्थेचा कारभार चालवण्यास सुरुवात केली.
"झेन एंटरटेनमेंट" या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे या संस्थेत प्रत्येक डिपार्टमेंटची धुरा एक सक्षम महिलेच्या हाती देण्याचा निर्णय यांनी घेतला व तो त्या प्रत्येक मुलीने उत्तमरित्या पार पाडण्याचा निश्चय केला. आणि सुरुवात झाली ती "झी युवा" प्रस्तुत "अद्वैत थिएटर" प्रकाशित आणि "झेन एंटरटेनमेंट" निर्मित "स्वरांगण" दिवाळी पहाट या पहिल्या कलाकृती पासून.
सुरांचा धागा धागा गुंफत काळजात घुसणारी, मालिका चित्रपटसृष्टीत सुरेल बरसात करणारी गायिका “आनंदी जोशी” आणि कितीदा नव्याने जुन्या गाण्यांसह शास्त्रीय संगीताची परंपरा जपणारा असा सुरेल गायक संगीत दिग्दर्शक “मंदार आपटे” यांच्या सुमधुर आवाजातून साकारलेल्या या संगीत मैफिलीला "प्रशांत लळीत" यांच्या संगीत संयोजनाची साथ लाभल्याने कार्यक्रमाची रंगत वाढली आहे. सोबतच सुर नवा ध्यास नवा च्या माध्यमातून प्रत्येकाच्या काळजाचे सूर छेडणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री स्पृहा जोशी हिच्या निवेदनाची साथ लाभलेला हा कार्यक्रम बुकिंग सुरू होताच पहिल्या दिवसापासूनच ऑनलाईन तिकीट विक्री च्या माध्यमातून प्रतिसाद मिळवू लागलेला आहे. रसिकांसाठी हा कार्यक्रम नक्कीच अविस्मरणीय ठरेल.
भविष्यात संगीत, नाट्य, मालिका, चित्रपट अशा माध्यमातून मनोरंजन क्षेत्रात वेगळ्या धाटणीचे विषय घेऊन झेन एंटरटेनमेंट सर्व रसिकांचे मनोरंजन करण्यास नेहमीच तत्पर असेल. आत्ताच्या युवा पिढीस आम्ही सादर करीत असलेली कलाकृती आणि आमचे कार्य वाखनण्याजोगे वाटेल. इतकेच नव्हे तर या मनोरंजन क्षेत्रात मनोरंजनासोबत सामाजिक विषय हाताळून डोळ्यात अंजन भरण्याचे काम आम्ही स्त्रीशक्ती करून, “यशस्वी ती” हे उदाहरण समाजापुढे ठेऊ.
Comments
Post a Comment