पहिल्या प्रेमाची आठवण करून देणारा 'प्रेम म्हणजे काय असतं?,चित्रपटाचा ट्रेलर लाँच




पहिल्या प्रेमाची आठवण करून देणाऱ्या 'प्रेम म्हणजे काय असतं?' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. प्रेम म्हणजे काय हे सांगत प्रेमाची हळुवार भावना उलगडणारा हा चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे

तख्त प्रॉडक्शन यांनी "प्रेम म्हणजे काय असतं?" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर प्रसाद दत्तात्रय इंगवले यांनी चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती अशी तिहेरी जबाबदारी निभावली आहे. ऋतुजा टंकसाळे, पायल कदम, सूरज माने अशा नव्या दम्याच्या कलाकारांचा चित्रपटात समावेश आहे.

प्रेम या संकल्पनेवर आजवर अनेक चित्रपट झाले. मात्र याच संकल्पनेचा आणखी एक वेगळा पैलू 'प्रेम म्हणजे काय असतं?' या चित्रपटातून मांडला जाणार आहे. पहिलं प्रेम ही संकल्पना अत्यंत वेगळ्या पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात आली आहे. तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट, मनाला भावणारं कथानक, श्रवणीय संगीत, फ्रेश कलाकार असा मिलाफ प्रेम म्हणजे काय असतं? या चित्रपटात झाला आहे. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या आयुष्यातल्या पहिल्या प्रेमाची आठवण या चित्रपटामुळे नक्कीच होईल, हळूवार, संवेदनशील प्रेमाचा अनुभव मिळेल. 


दिग्दर्शक प्रसाद इंगवले म्हणाले, की प्रेम ही अजरामर संकल्पना आहे. त्यामुळे पहिल्या प्रेमाची गोष्ट मांडण्याचा वेगळा प्रयत्न आहे. नव्या दमाच्या कलाकारांमुळे चित्रपटाला एक नवा आयाम मिळाला आहे. ४ नोव्हेंबरपासून पहिल्या प्रेमाचा अनुभव प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर घेता येईल.

Trailer Link

https://youtu.be/6zTDbOzAPEs



Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.