शमा निनावे यांचा 'शमा...साठी’ काव्यसंग्रह रसिकांच्या भेटीला.



कलेच्या प्रांतात मुशाफिरी करत आपल्या अभिनयाचा यशस्वी ठसा उमटविणाऱ्या अभिनेत्री शमा निनावे आता काव्यसंग्रहाच्या माध्यमातून एक संवेदनशील कवयित्री म्हणून आपल्या भेटीला आल्या आहेत. नुकताच त्यांचा 'शमा...साठी’ हा मनमोहक काव्यसंग्रह रसिकांच्या भेटीला आला आहे. मनाच्या पटलावर उमटलेल्या विविध भावभावनांचे तरंग या काव्यसंग्रहातून शमा यांनी मांडले आहेत.

शमा यांच्या आजवरच्या निवडक कवितांचे संकलन असलेले ‘शमा...साठी’ हे पुस्तक त्यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त प्रकाशित करून, त्यांचे पती शशांक निनावे यांनी त्यांना सरप्राईज दिलेय. या पुस्तकाचे प्रकाशन 'भिलार' या  महाबळेश्वर येथील ‘पुस्तकांच्या गावात’ तेथील कार्यकारी मंडळाच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले.

या कवितांच्या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व कविता शमा निनावे यांचे पती विख्यात वास्तूविशारद श्री. शशांक निनावे यांनी स्व-हस्ताक्षरात लिहून, त्यावर अप्रतिम चित्रांकन केले आहे. त्यामुळे हे कवितांचे पुस्तक सर्वसाधारण न राहता वैशिष्ट्यपूर्ण झालेले आहे. प्रत्येकाच्या संग्रही असावे असे हे पुस्तक आहे. या कविता साधारण 'हायकू'  या जपानी काव्य प्रकारात मोडतात. त्यात कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय सांगितला जातो. निसर्ग, समाज, तत्त्वज्ञान तसेच नाजूक संवेदना आणि भाव सहजपणे शब्दातून पोहोचावा ही या कवितांच्या मागील प्रेरणा आहे. अत्यंत हृदयस्पर्शी व सोप्या भाषेत यातील काव्याची मांडणी केली आहे.

या काव्यसंग्रहाबद्दल बोलताना शमा सांगतात की, ‘शब्दांमधून व्यक्त होण्याचं समाधान लिहित्या हातासाठी खूप मोलाचं असतं’. या काव्यसंग्रहाची संकल्पना राजश्री निकम, शिल्पा वडके, कनीनिका निनावे यांची आहे. प्रकाशकाची जबाबदारी अंकित उदेशी तर मुद्र्काची जबाबदारी माधव पोंक्षे यांनी संभाळली आहे. मुखपृष्ठाच्या आतील पोट्रेट खुशी निनावे यांनी काढले आहे. रचना, सुलेखन, रेखाचित्रे शशांक निनावे यांची आहेत.

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.