मुंबई मराठीग्रंथसंग्रहालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, वि. स. खांडेकर यांच्या साहित्याचे प्रदर्शन.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा(१४ते२८जानेवारी २०२३)याचे औचित्य साधून, मराठी भाषेला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करून देणारे ज्येष्ठ साहित्यिक वि .स .खांडेकर यांच्या
१२५व्या जन्मदिनानिमित्त, मुंबई मराठी
ग्रंथसंग्रहालय, दादर(पूर्व)येथील संदर्भ
विभागात लावण्यात आलेल्या त्यांच्या साहित्याच्या प्रदर्शनाचे उद्घाटन अर्थतज्ज्ञ ,साहित्यिक डाॅ .भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते १९जानेवारी रोजी करण्यात आले.
या वेळी बोलताना डाॅ. मुणगेकर म्हणाले,"की खांडेकर यांच्या साहित्यातील ध्येयवाद भाबडा असला तरी आमची पिढी त्यांची ऋणी आहे.त्यांची"क्रोंचवध"ही कादंबरी आपल्या आयुष्यात टर्निंग पाईंट ठरली.खांडेकर यांच्या साहित्यावर टीका झाली असली तरी त्यातील सामाजिक विचार महत्त्वाचा आहे. "
डॉ. अरुंधती वैद्य म्हणाल्या की,त्यांचा वाचकवर्ग विपुल आहे व टीका होऊनही त्यांची १२५वी जयंती साजरी करत आहोत यातच खाडेकराचे मोठेपण आहे.
या कार्यक्रमास मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कार्यवाह उमा नाबर , सेवकवर्ग आणि रसिक वाचक उपस्थित होते.
या प्रदर्शनाचा अभ्यासक व मराठी वाचकांनी आवर्जून आस्वाद घ्यावा असे आवाहन प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे यांनी केले.
हे प्रदर्शन सकाळी १०ते संध्याकाळी ६ या वेळेत २५जानेवारी २०२३ पर्यंत (सोमवार सुटी) खुले आहे.
.ग्रहालय, दादर(पूर्व)येथील संदर्भ

.
Comments
Post a Comment