'मराठी संशोधन मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षाची सांगता'
दादर (पूर्व) येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या मराठी संशोधन मंडळाची स्थापना १फेब्रुवारी १९४८रोजी झाली. ही संशोधन क्षेत्रातील महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था आहे जिचे२०२२-२३हे अमृतमहोत्सवी वर्ष असून त्याची सांगता १फेब्रुवारी २०२३रोजी
होणार आहे.
यंदाचे वर्ष हे मुंबई मराठीग्रंथसंग्रहालयाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे! वर्षभरात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाअंतर्गत मराठी संशोधन मंडळाचे अमृतमहोत्सव सांगता सोहळा दिनी
तसेच ''मराठी संशोधन मंडळ आणि अ. का. प्रियोळकर'या विषयावर डाॅ.प्रदीप कर्णिक यांचे व्याख्यान गावस्कर सभागृहात दिनांक १फेब्रुवारी २०२३रोजी संध्याकाळी ५.३०वाजता आयोजित केले आहे, त्याच वेळी प्रदर्शनाचे उद्घाटनही करण्यात येईल ,
तरी या कार्यक्रमाला साहित्यप्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन मुंबई मराठीग्रंथसंग्रहालय चे प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे व मराठी संशोधन मंडळाचे संचालक डॉ नीतिन रिंढे यांनी केले आहे.
दुर्मीळ हस्तलिखितांचे प्रदर्शन १ते४फेब्रुवारी पर्यंत सकाळी १०ते संध्याकाळी६या वेळेत खुले आहे.
Comments
Post a Comment