राहुल बोस, कौशिक गांगुली, मीर आणि ओम सहानी हे ' बिनोदिनी एकटी नाटीर उपाख्यान'मध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारणार
जेव्हा सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते राम कमल मुखर्जी यांनी त्यांच्या बंगाली भव्य चित्रपटाची म्हणजे 'बिनोदिनी एकटी नाटीर उपाख्यान' ची घोषणा केली आणि १९ व्या शतकातील सुप्रसिद्ध रंगभूमी कलावंत बिनोदिनी दासी यांची शीर्षक भूमिका रुक्मिणी मैत्रा साकारणार हे जाहीर केले ,तेव्हापासून अनेक जण या चित्रपटाच्या बाबतीत अंदाज करू लागले होते . यावर्षीचा व्हॅलेंटाईन डे येण्यापूर्वीच निर्मात्यांनी त्यांच्या या चित्रपटातील कलाकारांची नावे जाहीर केली आहेत. प्रमोद फिल्म्सचे प्रतीक चक्रवर्ती आणि देव एंटरटेनमेंट व्हेंचर्सचे देव अधिकारी हे एसोर्टेड मोशन पिक्चर्सच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती करत असून त्यात बंगाल आणि मुंबईतील प्रतिभावान कलाकारांच्या भूमिका असणार आहेत.
निर्माते देव अधिकारी म्हणतात ,"दीडशे वर्षाची परंपरा असणाऱ्या बंगाली रंगभूमीला आणि बिनोदिनी दासी यांना नम्रपणे अर्पण केलेली आमची ही आदरांजली असणार आहे.जेव्हा राम कमल यांनी या विषयाबद्दल सांगितले ,तेव्हा माझ्या जाणवले की ही कथा आपण योग्य दृष्टिकोनातूनच सांगितली पाहिजे . ते या विषयावर खूप मेहनत घेत आहेत आणि त्यांच्या एखाद्या विषयात स्वतःला झोकून देऊन काम करण्याबद्दल कोणीच शंका घेऊ शकत नाही . "
या चित्रपटचिषयी बोलताना प्रतीक चक्रवर्ती म्हणाले ,"माझा राम कमल यांच्या दृष्टिकोनावर विश्वास आहे आणि या विषयावर गेली दोन वर्षे ते काम करत आहेत . रुक्मिणी ही बंगालमधील अत्यंत प्रतिभावान अभिनेत्री आहे आणि ते दोघेही पडद्यावर जादू निर्माण करतील, याची नक्की खात्री आहे." देवसोबत काम करण्याबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले , "देव एक सुपरस्टार आणि एक यशस्वी निर्माता देखील आहे. त्याला चित्रपट निर्मितीची सर्जनशील आणि व्यावसायिक बाजू समजते. 'बिनोदिनी ' सारख्या बहुचर्चित चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो आहोत ,याचा मला खूप आनंद होत आहे ."
बॉलिवूड अभिनेते राहुल बोस यात 'रंगाबाबू ' ही व्यक्तिरेखा साकारत आहेत . त्यांच्या मते ही भूमिका एका उत्तुंग नायकाची आहे . "ज्यावेळी जग फक्त हिंसेबद्दल बोलतंय, तेव्हा आपल्याला अव्यक्तपणे प्रेम करणारे क्वचितच पाहायला मिळतात.रंगाबाबू हे अशा दुर्मिळ माणसांपैकी एक आहेत की जे बिनोदिनीच्या संकटकाळात ,तिच्या सुखदुःखात तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. तिच्यावर सर्वात जास्त प्रेम करणारी व्यक्ती तेच होते. देव हा एक चांगला माणूस आहे, प्रेमळ आणि उदार आहे, आणि मला त्याच्यासोबत काम करताना आनंद होत आहे .राम कमल एक संवेदनशील निर्माते आहेत आणि मला खात्री आहे की प्रेक्षकांना त्यांची ही चित्रपट कलाकृती पाहायला नक्की आवडेल.,"राहुल बोस म्हणाले.
या चित्रपटाची कथा आणि पटकथा प्रियांका पोद्दार यांनी लिहिली आहे. सौमिक हलदर सिनेमॅटोग्राफीची धुरा सांभाळणार आहे. तन्मय चक्रवर्ती कलादिग्दर्शक म्हणून त्या युगाची पुनर्रचना करत आहे आणि सुचिस्मिता दासगुप्ता कॉस्च्युम डिझायनर म्हणून कथेला योग्य न्याय देत आहेत . सुप्रसिद्ध संगीतकार जोडी सौरेंद्र आणि सौम्यजीत यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे, तर राम कमल यांनी यातील गीते लिहिली आहेत
Comments
Post a Comment