दिग्गज अभिनेते अशोक सराफांनी केला 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचा ट्रेलर लाँच.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा नुकताच दिमाखात पार पडला. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते श्री. अशोक सराफ यांच्या हस्ते 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचा ट्रेलर लॉंच करण्यात आला. या ट्रेलर लॉंच सोहळ्याला दिग्दर्शक केदार शिंदे, स्टारकास्ट रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते,दीपा परब चौधरी,शिल्पा नवलकर,सुकन्या कुलकर्णी मोने, गायिका सावनी, संगीतकार साई - पियूष सह सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती.
पारंपरिक मंगळागौर नृत्याचा आनंद कलाकार आणि मिडिया यांनी घेतला. खेळी मेळीच्या वातावरणात बाईपण भारी देवाचा ट्रेलर लाँच सोहळा जोरदार पार पडला. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच ट्रेलरलाही खूप भारी प्रतिक्रिया मिळत आहेत.
जिओ स्टुडियोजचा 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट प्रत्येक स्त्रीला आता स्वतःसाठी जगायला शिकवणार हे नक्की.. तेव्हा तयार रहा.. केदार शिंदेंचा स्पेशल टच असलेला, सहा गुणी अभिनेत्रींनी चित्रपटात केलेली धमाल, अनुभवायला!
ट्रेलर लिंक -https://bit.ly/BaipanBhariDevaTrailer
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओज निर्मित, बेला शिंदे-अजित भुरे सह-निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट आपल्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. 'बाईपण भारी देवा' आता प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला असून ३० जून, २०२३ रोजी पासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा