प्रेमकथेच्या ‘आठवणी’ पत्रातून उलगडणार !दोन पिढ्यांच्या प्रेमाचा टीजर आउट.


   
         बदलत्या काळानुसार संवादाची माध्यमे बदलत जातात, मात्र प्रेम तसेच राहते .दोन पिढ्यांच्या आगळ्या वेगळ्या प्रेमकथेची गोष्ट पत्रावाटे उलगडून दाखवणारा सिद्धांत सावंत लिखित-दिग्दर्शित ‘आठवणी’ ह्या  सिनेमाचा टीजर नुकताच आपल्या भेटीला आला आहे .ह्यातून ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांच्यासह प्रमुख भूमिकेत सुहृद वार्डेकर आणि वैष्णवी करमरकर , निनाद सावंत हे तीन आश्वासक चेहरे दिसत आहेत.प्रेमाच्या विषयाला एका वेगळ्या भावनिकतेने साद घालायला दिद्गर्शक यशस्वी झाल्याचे दिसून येते आहे. 
          मराठीत आजकाल कौटुंबिक सिनेमे येत नाहीत असे  म्हणणाऱ्या  प्रेक्षकंसासाठी का सिनेमा मूड चेन्जर ठरणार आहे . प्रेमातील भावनांचे केलेले तरल  चित्रण हि ह्या सिनेमाची जमेची बाजू आहे . उत्तमोत्तम फ्रेम आणि आजचा काळ आणि जुना काळ प्रभावीपणे मांडण्याचे  काम सिनेमॅटोग्राफर ध्रुव देसाई ह्यांनी उत्तमपणे केल्याचे दिसून येते . शिवाय उत्तम कविता,समर्पक संगीत आदी गोष्टींनी संपन्न असा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघायला उत्सुक असलेल्या प्रेक्षकांची संख्या वाढते आहे . 
              ज्येष्ठ रंगकर्मी आणि तरुण अभिनेते ह्यांचा उत्कृष्ठ मिलाप असलेली दोन पिढ्यांची ही गोष्ट आहे . मिनाश प्रॉडक्शन प्रस्तुत आणि सिद्धांत सावंत व अशोक सावंत निर्मित ‘आठवणी’ हा चित्रपट येत्या ७ जुलैला महाराष्ट्रभरात प्रदर्शित होईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वैत मसूरकर दिग्दर्शित 'छबी' चित्रपट २५ एप्रिलला.....अभिनेता समीर धर्माधिकारी, अभिनेते मकरंद देशपांडे यांची मध्यवर्ती भूमिका

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...