जिओ स्टुडिओजची पहिली मराठी वेबसिरीज "एका काळेचे मणी" प्रदर्शनास सज्ज.



मी वसंतराव आणि गोदावरी चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता जिओ स्टुडिओज् त्यांची पहिली ओटीटी कौटुंबिक कॉमेडी वेबसिरीज "एका काळेचे मणी" प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. यानिमित्ताने जिओ स्टुडिओज आणि महेश मांजरेकर एकत्र आले असून यात प्रशांत दामले, समीर चौघुले, विशाखा सुभेदार, हृता दुर्गुळे, पौर्णिमा मनोहर, रुतुराज शिंदे आणि ऋषी मनोहर अशा धम्माल कलाकारांची फौज प्रेक्षकांना पोट धरून हसवायला सज्ज झाली आहे.

ही गोष्ट आहे मध्यमवर्गीय काळे कुटुंबाची ज्यात एक बाप आहे, जो घरचा मुख्य म्हणून आपली प्रतिमा जपण्यासाठी धडपडत आहे, एक आई जिचे जग तिच्या मुलांच्या लग्नाभोवती फिरतेय, एक प्राणीप्रेमी मुलगी जिला पाळीव प्राणी आणि त्यांच्यासाठी कपड्यांचा ब्रँड तयार करायचा आहे, एक मुलगा जो डॉक्टर असून जो आयरर्लंडमधून पीएचडी करत आहे. आणि अशा ह्या आगळ्या वेगळ्या कुटुंबाचे शेजारी ही तितकेच विचित्र आहेत बर का.. असे शेजारी ज्यांना आपल्या मुलीचं लग्न काळे कुटुंबात करून द्यायचं आहे.
    भन्नाट विनोदाने नटलेली, जबरदस्त डायलॉग बाजी असलेली ही वेबसिरीज येत्या २६जून रोजी जिओ सिनेमावर रीलीज होत आहे.
     या मालिकेची संकल्पना ऋषी मनोहर याची असून, त्याचं लिखाण ओम भूतकर याने केलं आहे. आणि अतुल केतकर यांनी या पहिल्या सिझन दिग्दर्शन केलं आहे. 

ट्रेलर लिंक - https://youtu.be/nP_wlfTx6Xk

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे निर्मित, महेश मांजरेकर, रुतुराज शिंदे आणि ऋषी मनोहर निर्मित, अतुल केतकर दिग्दर्शित "एका काळेचे मणी" २६ जून पासून जिओ सिनेमा वर होणार रिलीज!
                
महेश मांजरेकर 
 "बऱ्याच दिवसा पासून मी विचार करत होतो कि एक हलका फुलका शो असावा, मला स्वतः ला बघायला आवडेल असा, निखळ करमणूक करणारा छान पण विक्षिप्त आणि चमत्कारिक फॅमिली चा एक विनोदी कार्यक्रम करायचा माझ्या मनात होता. 'एका काळेचे मणी' हा शो जेव्हा लिहून झाला तेव्हा मला वाटलं कि हिच ती गोष्ट आहे. गोष्ट प्रत्यक्ष बनवताना प्रमुख पात्र, श्री. काळे हे पात्र सादर करायला प्रशांत दामले तयार झाले हि खूप आनंदी बातमी होती आणि त्यानंतर आम्ही मागे हटलो नाही. 
घर बसल्या एखादा छान हलका फुलका करमणूक करणारा आणि कौटुंबिक विनोदी शो बघायचा असेल तर एका कलेचे मणी जरूर बघायला पाहिजे. हा शो आपल्या प्रेक्षकांना नक्की आवडेल याची मला खात्री आहे. प्रशांत दामले, विशाखा सुभेदार, समीर चौगुले, पौर्णिमा मनोहर, ऋतुराज शिंदे, ऋषी मनोहर, इशा केसकर, आणि वंदना गुप्ते अशा विनोदी सुपरस्टार्स ने सजलेला हा शो आहे."

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.