आंतरराष्ट्रीय मंचावर आपली छाप सोडणारे भारतीय कलाकार !
इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाच्या शैली ने नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आहे. अली फझल, निम्रत कौर, अपेक्षा पोरवाल आणि हुमा कुरेशी हे भारतीय कलाकार आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या अभिनयाची चमक दाखवत आहेत. अष्टपैलुत्व आणि बॉलीवूडच्या सीमेपलीकडे जाऊन स्वतः ला त्यांनी जागतिक पातळीवर सिद्ध केलं आहे. या प्रतिभावान व्यक्तींनी त्यांच्या अपवादात्मक आणि समृद्ध कामगिरीने जगभरातील प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. जागतिक मनोरंजन इंडस्ट्रीत त्यांनी सगळ्यांची मन जिंकली आहेत.
अली फजल: या अभिनेत्याने स्वतःच्या अभिनयाने जगभरात कौतुक मिळवलं आहे. विविध भूमिका साकारून नेहमीच तो प्रेक्षकांच्या मनात राहिला आहे. अली फझलने जागतिक स्तरावर आपल्या अभिनयाची जादू दाखवून नेहमीच तो चर्चेचा विषय ठरला आहे. ब्रिटीश-अमेरिकन चित्रपट “व्हिक्टोरिया आणि अब्दुल” मधील भूमिकेसाठी त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर अनोखं स्थान मिळालं आहे. जिथे त्याने अकादमी पुरस्कार विजेते डेम जुडी डेंचसोबत काम केले. त्याचा अष्टपैलुत्व अभिनयाने आणि मोहक व्यक्तिमत्त्वाने तो आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट करतो आहे.
निम्रत कौर: निम्रत कौर ही एक अष्टपैलू अभिनेत्री आहे जिने भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावून नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकली. "द लंचबॉक्स" या अनोख्या चित्रपटाने समीक्षकां सोबत प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. निम्रतच्या प्रतिभावान अभिनयाने तिला केवळ हिट टेलिव्हिजन मालिका “होमलँड” सारख्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्स मध्ये काम करायला मिळालं तर या साठी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड्समध्ये नामांकनासह तिला अनेक पुरस्कारही मिळाले.
अपेक्षा पोरवाल: अपेक्षा पोरवाल ही भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्तम अभिनेत्री आहे. मनोरंजन इंडस्ट्रीत अवघ्या काही वर्षात अपेक्षाने तिच्या आव्हानात्मक भूमिकांनी सगळ्यांची मन जिंकली. " अनदेखी " या पहिल्या मालिकेत आदिवासी मुलीच्या भूमिकेपासून ते अरबी वेब सीरिज 'स्लेव्ह मार्केट'मध्ये गुलामगिरीत अडकलेल्या भारतीय राजकन्येची भूमिका करणे आणि प्रेक्षकांशी कनेक्ट होण्याच्या तिचा प्रवास उल्लेखनीय आहे.
हुमा कुरेशी: हुमा कुरेशी ही एक अभिनेत्री आहे जी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. नेटफ्लिक्सवर प्रीमियर झालेल्या “लीला” या डायस्टोपियन थ्रिलर मालिकेतून तिने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.
या चार भारतीय अभिनेत्यांनी यशस्वीरित्या आंतरराष्ट्रीय मनोरंजन क्षेत्रात आपला कामाचा ठसा उमटवला. जगभरात आपल्या अभिनयाची अनोखी छाप पाडणारे हे कलाकार ठरले आहेत.
Comments
Post a Comment