पहिल्या प्रेमाची हळवी गोष्ट सांगणारा "गेट टुगेदर" आता अॅमेझॉन प्राइमवर!
पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणाऱ्या "गेट टुगेदर" हा चित्रपट नुकताच २६ मे ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आणि रसिक प्रेक्षकांना नॉस्टालजिक करुन गेला. वय वाढत पण आठवणी कायम राहतात या आशयवार हा सिनेमा भाष्य करतो. रोमान्स, हळुवारपणा, अल्लडपणाचे अनेक रंग या चित्तपटातून आपल्याला पाहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या ३० जून पासून आता आपल्याला अॅमेझॉन प्राइमवर बघता येणार आहे.
सतनाम फिल्म्स प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोंजारी, संजय गोंजारी, आशिष धोत्रे यांनी केली आहे. चित्रपटाचं पटकथा लेखन आणि दिग्दर्शन सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलं आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. तर एकनाथ गिते, त्रिशा कमलाकर, श्रेया पासलकर, इमरान तांबोळी, संजना काळे, मिताली कोळी, सुशांत कोळी, साकिब शेख आदींच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात प्रियंका बर्वे, जावेद अली, शंकर महादेवन यांनी गाणी गायली आहेत. या गाण्यांना समाजमाध्यमांतून उत्तम प्रतिसादही लाभत आहे.
आयुष्यातलं पहिलं प्रेम शाळा, कॉलेजमध्ये गवसतं. पण हे प्रेम यशस्वी होतंच असं नाही. पण पहिलं प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहतं याची जाणीव गेट टुगेदर या चित्रपटाचा ट्रेलर नव्याने करून देतो. रोमान्स, भावभावनांचा कल्लोळ या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. शाळा, कॉलेजमध्ये पहिल्या प्रेमासाठी केली मजामस्ती, त्यावेळचा अल्लडपणा, हळवेपणा पुढे पुढे या नात्याला अनेक रंग कसे येत जातात याची गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण गेट टूगेदर हा चित्रपट नक्कीच करून देईल यात शंका नाही.
Comments
Post a Comment