मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ने केली जिओ स्टुडिओजच्या 'बाईपण भारी देवा' चित्रपटाची स्तुती ! आता आईला ही दाखवणार चित्रपट.



सध्या महाराष्ट्रात ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या निमित्ताने उत्सवमय वातावरण झाल्याचे दिसून येत आहे.  कित्येक वर्षांनी एखाद्या चित्रपटासाठी नटून थटून, वेळातून वेळ काढून, अनेक मैलाचा प्रवास करून, वेगवेगळ्या वयोगटातील महिला चित्रपट बघायला येत असल्याचं आपण पहात आहोत. 
पण आता यात पुरुषही काही मागे राहिले नाहीयेत, बरं का!  आता नवं चित्र दिसतं आहे ते म्हणजे तेवढ्याच उत्साहाने पुरुषदेखील कुटुंबासमवेत सिनेमागृहांमधे हा चित्रपट बघताना दिसून येत आहेत.
चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना उलटून गेलाय तरीही बाईपण भारी देवाचं वादळ महाराष्ट्रभर ठाम धरून आहे. आणि आता ते सचिन तेंडुलकर पर्यंत पोहचलं असून, नुकताच त्यांनी हा चित्रपट आपली पत्नी अंजली तेंडुलकर आणि मित्र परिवारासह पाहिला. आणि आता त्यांनी आपल्या आईला ही फिल्म दाखवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
     सचिन आपल्या सोशल मिडिया वर चित्रपटाचे कौतुक करत म्हणाला कि, "बाईपण भारी देवा ही 6 बहिणींची हृदयस्पर्शी कथा आहे.  मला हा मराठी चित्रपट पाहून खूप आनंद झाला आणि कधी एकदा माझी आई आणि आत्या हा चित्रपट बघतायत याची मी आतुरतेने वाट पाहत आहे.  तसेच चित्रपटाच्या कलाकारांना भेटणे हा एक सुंदर अनुभव होता!’

https://twitter.com/sachin_rt/status/1688169515019071488?t=lHxuw8e-Ej1lqpZuJJ9V2g&s=19

चित्रपट पाहिल्यानंतर सचिन ने चित्रपटाच्या कलाकारांशी, दिग्दर्शक, लेखक तसेच संपूर्ण टीमशी गप्पा मारल्या व त्यांच्या कामाचं भरभरुन कौतुक ही केले. 
    बॉलिवूड हॉलिवूड चित्रपटांना बरोबरीचे टक्कर देत बाईपण भारी देवा ने बॉक्स ऑफिसवर सत्ता गाजवत सुपरडुपर हिट चा झेंडा फडकवला आहे. 
    जिओ स्टुडिओज प्रस्तुत, रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी- मोने, शिल्पा नवलकर आणि दीपा परब- चौधरी अभिनित 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाची निर्मिती माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओजनं केली आहे. या चित्रपटाचे सह-निर्माते बेला शिंदे आणि अजित भुरे आहेत. चित्रपटातील कलाकारांचा उत्तम अभिनय, उत्कृष्ट कथानक, सुरेल गाणी अन् दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या अष्टपैलू दिग्दर्शनामुळे बॉक्सऑफिसवर मराठी चित्रपटाने, इतर अनेक चित्रपटांना मागे टाकत, आपला जोरदार ठसा उमटवला आहे हे नक्की !

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.