वेध गणपती बाप्पाचे, 'मोरया'च्या उत्सवाचे!


थरावर थर चढवून दहीहंडीचा उत्सव जोषात साजरा झाल्यावर आता वेध लागले आहेत गणपती बाप्पाच्या आगमनाचे. गणपती बाप्पाचं उत्साहात स्वागत करण्यासाठी सप्तसूर म्युझिकने मोरया या नव्याकोऱ्या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. मराठी बिगबॉस फेम सोनाली पाटील आणि इन्स्टाग्रामवरील लोकप्रिय कंटेट क्रिएटर धनंजय पोवार या म्युझिक व्हिडिओमध्ये झळकले आहेत.

सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष यांनी मोरया या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. स्टिवन पोल्स यांनी दिग्दर्शित केलेल्या या म्युझिक व्हिडिओचं गीतलेखन, संगीत आणि गायन विकी वाघ यांनी केलं आहे.  सोनाली पाटील, धनजंय पोवार यांच्यासह पार्थ केंद्रे, अमन कांबळे, समरवेर शाह, राजवीर पावसकर यांचाही या म्युझिक व्हिडिओमध्ये सहभाग आहे. दमदार शब्द, ताल धरायला लावणारे संगीत, देखणे छायाचित्रण ही या म्युझिक व्हिडिओची वैशिष्ट्यं आहेत. 

सप्तसूर म्युझिकनं नेहमीच वैविध्यपूर्ण म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. या म्युझिक व्हिडिओना मराठी संगीतप्रेमींनी भरभरून प्रतिसादही दिला आहे. त्यात आता मोरया या म्युझिक व्हिडिओची भर पडलीय. त्यामुळे गणेशोत्सवाचा उत्साह सर्वत्र पसरत असताना आता मोरया हे गाणं नक्कीच मंडळांच्या मंडपांमध्ये ऐकू येणार यात काहीच शंका नाही. 

*Song Link*

https://youtu.be/MO1fZHZYAXo?si=5f1UK3v66WJNCa2b


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वैत मसूरकर दिग्दर्शित 'छबी' चित्रपट २५ एप्रिलला.....अभिनेता समीर धर्माधिकारी, अभिनेते मकरंद देशपांडे यांची मध्यवर्ती भूमिका

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...