‘फक्त मराठी सिने सन्मान १५सप्टेंबरला रंगणार ‘फक्त मराठी सिने सन्मान’२०२३



आपल्या कलाकृतीला कौतुकाची थाप मिळावी असं सगळ्याच कलाकारांना वाटतं. चांगल्या गुणवत्तेची दखल घेत ‘फक्त मराठी सिने सन्मान’ या पुरस्कारसोहळ्याने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आणि त्याला आज व्यापक व भव्यस्वरूप प्राप्त झालंय. मराठी चित्रपटात सातत्याने चांगल्या चित्रपटांची निर्मिती होत आहे, याची दखल घेत यंदाही ‘फक्त मराठी सिने सन्मान२०२३ या पुरस्कार सोहळ्यासाठी उत्तमोत्तम चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.  हा सन्मान  कलाकारांपुरता मर्यादित नसून मराठी मनोरंजनसृष्टीसाठी  महत्त्वाचं योगदान देणाऱ्या कलाकार आणि पडद्यामागे असलेल्या तंत्रज्ञाचा  हा सन्मान सोहळा आहे. या पुरस्कार सोहळ्यातील नामांकनांपासून पुरस्कार वितरणापर्यंत सर्वचगोष्टी नाविन्याने नटलेल्या असतात.  नुकतीच पारितोषिकांसाठीची नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. गेल्यावर्षापासूनआयोजित होत असलेल्या या सोहळ्याचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे.  येत्या १५ सप्टेंबरला यंदाचा ‘फक्तमराठी सिने सन्मान २०२३’ सोहळा रंगणार आहे. 

कलेच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत आपलं नाणं खणखणीत वाजवणाऱ्या व मराठी चित्रपटसृष्टी बहरावी यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करणे, हाआमच्यासाठी अभिमानाचा क्षण असून हा कौतुक सोहळा कलाकारांना अजून चांगलं काम करण्याचीऊर्जा देईल, असा विश्वास फक्त मराठी वाहिनीच्या हेड पल्लवी मळेकर यांनी व्यक्त  केला.

 चित्रपटसृष्टीसाठी मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘फक्त मराठी सिने सन्मान २०२३’ पुरस्कारांमध्ये यंदा ‘अनन्या’, ‘घर बंदूक बिर्याणी’,  ‘वाळवी’, ‘सरलाएक कोटी’, ‘वेड’, ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटांमध्ये चुरस रंगणार आहे. घोषित करण्यात आलेल्या या नामांकनातून आता कोणाला कौल मिळणार? याकडे सर्वांच्या नजरा  लागल्या आहेत.


Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.