Posts

Showing posts from October, 2023

विक्रम गोखलेंच्या 'सूर लागू दे' चित्रपटाचं नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला...

Image
रंगभूमीपासून मराठी-हिंदी सिनेसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटवणारे अभिनेते विक्रम गोखले यांनी मागच्या वर्षी इहलोकीची यात्रा संपवली असली तरी कलेच्या माध्यमातून ते अजरामर आहेत. प्रतिकूल परिस्थितीही आपल्या वाट्याला आलेलं काम चोख बजावणं हा अतिशय दुर्मिळ गुण विक्रम गोखले यांच्या ठायी होता. याच बळावर त्यांनी अखेरच्या काळात बऱ्याचदा प्रकृती अस्वस्थ असतानाही आपल्या व्यक्तिरेखेला न्याय देण्यासाठी मोठ्या जिद्दीनं कॅमेरा फेस केला. विक्रम गोखले यांच्या पश्चात अत्यंत जड अंत:करणारे 'सूर लागू दे' हा त्यांचा अखेरचा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचं नवीन पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. मनोरंजन विश्वातून यावर प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे. आॅडबॅाल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली निर्माते नितीन उपाध्याय आणि अभिषेक 'किंग' कुमार यांनी 'सूर लागू दे' या चित्रपटाची निर्मिती केली असून रतीश तावडे, अश्विन पांचाळ आणि देवांग गांधी या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. गोखलेंची अखेरची कलाकृती ठरलेल्या 'सूर लागू दे' या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रवीण विज

'शॉर्ट अँण्ड स्वीट’मध्ये झळकणार सोनाली कुलकर्णीचे आई-बाबा.

Image
सध्या प्रेक्षक गणेश दिनकर कदम दिग्दर्शित ‘शॅार्ट अँड स्वीट’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, हर्षद अतकरी, श्रीधर वत्सर आणि रसिका सुनील यांच्या प्रमुख भूमिका असून यात आणखीही दोन नवोदित कलाकार झळकणार आहे. प्रश्न पडला ना? कोण हे कलाकार? तर हे नवोदित कलाकार आहेत सोनाली कुलकर्णीचे आई - बाबा.  पुण्यात चित्रीकरण असल्याने सोनालीचे आई-बाबा तिला सहजच सेटवर भेटायला गेले होते. त्यावेळी बसमधील प्रवास करतानाचा सीन चित्रीत होत होता. सोनालीचे आई-बाबा तिथेच असल्याने दिग्दर्शकांनी त्यांना अभिनय करण्याची संधी दिली. दिग्दर्शकांनी दिलेल्या संधीला मान देत त्यांनीही अभिनय करण्याची संधी स्विकारली. या चित्रपटात ते सहप्रवाशाच्या भूमिकेत झळकणार आहेत. आपल्या मुलीसोबत काम करण्याचा आनंद काही औरच आहे, अशा शब्दांत सोनलीच्या आई-बाबांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. तर सोनालीलाही आपल्या आईबाबांसोबत काम करण्याचा अनुभव कमाल असल्याचे म्हटले आहे.  शुभम प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाचे पायल गणेश कदम, विनोद राव निर्माते आहेत. हा चित्रपट येत्या ३ नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात प्रद

मिलिंद अशोक ढोके लिखित-दिग्दर्शित ‘गाफील’.

Image
         'गाफील' असं काहीसं उत्सुकता वाढवणारं नाव असलेला चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रकाशित करण्यात आले. अमरावती येथील प्रसिद्ध तापडिया सिटी सेंटर मॉलमध्ये अमरावतीचे ज्येष्ठ फिल्म वितरक आणि तापडिया मॉल चे डायरेक्टर श्री. लक्ष्मीकांत लढ्ढा यांच्या हस्ते फिल्म च्या मुख्य पोस्टर चे अनावरण झाले. तर इतर २ पोस्टरचे अनावरण फिल्म चे मुख्य कलाकार आदित्य राज, वैष्णवी बरडे आणि निर्माते श्री. मनोज भेंडे व आलेख अग्रवाल यांच्या हस्ते झाले .           यापूर्वी प्रकाशित करण्यात आलेल्या टायटल पोस्टरवरून म्हणजेच चित्रपटाच्या 'गाफील' या नावावरूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला गेली होती. त्यामुळे या चित्रपटाचे मुख्य पोस्टर कसे असेल याची प्रतीक्षा प्रेक्षकांना होती. या पोस्टरमध्ये दोन प्रमुख कलाकार दिसतात. नवोदित कलाकार आदित्य राज हातातल्या अंगठीकडे बघत आहेत, तर अभिनेत्री वैष्णवी बरडे हिच्या हातात फुलांचा गुच्छ आहे, अशी दोघांची छबी या पोस्टरवर आहे. पण नक्की कोण कोणापासून गाफील आहे, हे मात्र चित्रपट बघितल्यावरच लक्षात येईल. चित्रपटाच्या ‘गाफी

२६ नोव्हेंबरला ‘मृदगंध पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन.

Image
अनेक नामवंत शाहीर रत्न महाराष्ट्राच्या मातीत झळाळून उठले आहेत. यापैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे शाहीर विठ्ठल उमप. आपली लोकसंगीताच्या अनुभवाची शिदोरी वेगवेगळ्या कार्यक्रमांतून सादर करत शाहीर विठ्ठल उमप यांनी लोककलेची परंपरा जपत समाजप्रबोधनासह जनजागृतीचा प्रयत्न सातत्याने केला. लोककलेचा हा वारसा जपत ही परंपरा त्यांची मुलं अभिमानाने पुढे चालवतायेत.  पोवाडा, बहुरूपी, भारूड, भजन, गण-गवळण, लावणी, कवने, तुंबडी, बोबडी, धनगरी गीते, नंदीबैल, वासुदेव, डोंबारी, पोतराज, गोंधळी अशा अस्सल मऱ्हाटमोळ्या लोककलेच्या सर्वच कलाप्रकारांत लीलया संचार केलेल्या ‘जांभूळ आख्यानकार’ ज्यांनी गाता गाता भर कार्यक्रमात आपला देह ठेवला अशा,लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या १३व्या स्मृतीदिनानिमित्त याहीवर्षी १३ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’ वितरणाचा भव्य सोहळा पार पडणार आहे. विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे आयोजित होणारा ‘मृदगंध पुरस्कार’ सोहळा येत्या २६ नोव्हेंबरला काशिनाथ घाणेकर सभागृह, ठाणे येथे संपन्न होणार आहे.  सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिष्ठि

‘झिम्मा २’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित!

Image
जिओ स्टुडिओज आणि आनंद एल. राय प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २' या बहुचर्चित चित्रपटाचा जबरदस्त टीझर आज प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा हा टीझर अनोखा असून पुन्हा एकदा यामधील दमदार गॅंग रियूनियनसाठी सज्ज झाली आहे. सात जणींच्या सात तऱ्हा पुन्हा एकदा टिझर मधून मजेदारपणे झळकत आहे. या टीझरमध्ये सिद्धार्थचा एक डायलॉग आहे, ''यावेळेला खूपच व्हरायटी आहे.'' आणि हे अगदी खरंच आहे. कारण यावेळी या ताफ्यात आणखी दोन मैत्रिणी सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे यावेळीही या इंद्रधनुष्याचे सात वेगवेगळे रंग बरसणार आहेत. मागच्यावेळेस नवीनच मैत्री झाली होती, हळूहळू ती बहरत गेली. आणि आता 'झिम्मा २' मध्ये ही मैत्री अधिकच परिपक्व झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी मनोरंजनरूपी यंदाची ही सहल अधिकच अविस्मरणीय ठरू शकते! सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव आणि सिद्धार्थ चांदेकर या गेल्या भागातील कलाकारांसोबत आता रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे या दोघी देखील या तगड्या स्टारकास्टमध्ये द

मामि फेस्टिवल मध्ये जिओ स्टुडिओजच्या एक नाही दोन नाही तर चक्क तीन मराठी चित्रपटांचा बोलबाला!

Image
"मुंबई अकॅडमी ऑफ मुव्हींग इमेजेस" म्हणजेच मामि या प्रतिष्ठित फिल्म फेस्टीवलला आज पासून सुरुवात झाली आहे. मुंबईतील प्रमुख चित्रपटगृहांमधे शुक्रवार २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान या महोत्सवात सहभागी झालेले चित्रपट दाखविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मामि चित्रपट महोत्सवात निवड झालेल्या चित्रपटांमध्ये जिओ स्टुडिओजचे चक्क ३ मराठी चित्रपट सामील आहेत. यामध्ये पहिला चित्रपट म्हणजे, समिक्षकांच्या कौतुकास प्राप्त ठरलेला  आदित्य सरपोतदार दिग्दर्शित “उनाड" या चित्रपटाचा समावेश आहे. यात तीन मित्रांची म्हणजेच शुभम (आशुतोष गायकवाड), बंड्या (अभिषेक भरते) आणि जमील (चिन्मय जाधव) आणि  स्वराली (हेमल इंगळे) यांच्या मैत्रीची गोष्ट आहे .  दुसऱ्या चित्रपटाबद्दल सांगायचे म्हणजे, यावर्षीचे बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॅार्ड मोडणारा, आजपर्यंतचा दुसरा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट माधुरी भोसले निर्मीत आणि केदार शिंदे दिग्दर्शीत "बाईपण भारी देवा" आहे. मामि निमित्त रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अश्या अभिनेत्रींची धमाल पुन्

'आली आली गं भागाबाई’ गाणं आलं भेटीला.

Image
एखाद्या गीताची जादूअथवा लोकप्रियता चित्रपटाला एक वेगळी ओळख निर्माण करून देत असते. अनेक चित्रपट एखाद्या हिट गाण्यांमुळे ओळखले जात  असल्याचे आपण बघतो. असंच  एक जोरदार गीत आगामी ‘एकदा येऊन तर बघा’ या धमाल  चित्रपटातून आपल्या  भेटीला आलं आहे.    प्रसाद खांडेकर दिग्दर्शित‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात ‘आली आली गं भागाबाई’ हे पारंपरिक गीत नव्या ढंगात सादरकेलं आहे. नुकतंच हे गीत प्रदर्शित झालं असून या गीतालाप्रेक्षक पसंतीची पावती मिळाली आहे.  हे गीतरोहन प्रधान यांनी गायलं आहे.  मंदार चोळकर यांच्या गीतलेखनाला रोहन-रोहनयांचं संगीत लाभलं आहे.  या गीतातून  चित्रपटातील सर्व कलाकारांचा ढिंच्याक अंदाजपहायला मिळतोय. या गीताची आणि चित्रपटाच्या कथेची गंमत चित्रपट पाहिल्यानंतरचउलगडेल. चित्रपटाच्या गीताचे हक्क सारेगम कडे आहेत.   २४  नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित 'एकदायेऊन तर बघा'या चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमारमोहंती,दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपकपेंटर यांचीअसून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायणमूरथी, डॉ.झारा खादर यांची आहे.गिर

विनोदवीर दादांच्या या सिनेमातील लावणी आणि भजन ४५ वर्षानंतरही घालते रसिकांना भुरळ.

Image
     निखळ मनोरंजन, साधी कथा, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रसंगांवर बेतलेले सिनेमातील सीन यांची भट्टी जमवणारे रसायन म्हणजे विनोदवीर दादा कोंडके. दादा कोंडके यांच्या ज्युबिली स्टार सिनेमांची पर्वणी घर बसल्या पाहता यावी यासाठी झी टॉकीज या वाहिनीने विडा उचलला आहे. दादा कोंडके यांचे सुपर डुपर हिट सिनेमे झी टॉकीज वाहिनीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहेत . याच मालिकेत दादा कोंडके यांच्या तुफान गाजलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे 'तुमचं आमचं जमलं' हा सिनेमा रविवार दिनांक २९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता झी टॉकीज वर प्रदर्शित होत आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा दादा कोंडके प्रेमी रसिकांना 'तुमचं आमचं जमलं' या सिनेमाचा आस्वाद घर बसल्या घेता येणार आहे.          झी टॉकीज नेहमीच चांगले सिनेमे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घेत असते . आजवर अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांची मेजवानी झी टॉकीजने प्रेक्षकांना दिली आहे. मराठी सिनेमाला मिळालेला अस्सल मातीतला नायक म्हणजे दादा कोंडके . एकीकडे ऐतिहासिक चित्रपट आणि तमाशा प्रधान चित्रपट लोकप्रिय होत असताना दादा को

स्त्री संघर्षाचा वेध घेणारा ‘सोंग्या’

Image
आपल्या समाजात अनेक प्रथा परंपरा आहेत त्या जशा चांगल्या आहेत तशाच काही कुप्रथाही आहेतच. ज्या स्त्रियांवर अन्याय करतात केवळ अशिक्षित स्त्रिया नाही तर शिक्षित स्त्रिया ही त्यात भरडल्या जातात. मुलींची स्वप्न धुळीला मिळतात. अशाच एका कुप्रथेविरुद्ध उभी राहते एक तरुणी, तिचं प्रेम, तिची स्वप्न, इच्छा सर्व मोडून सुरु करते एक नवा संघर्ष. या संघर्षातून तिचं अपेक्षित ध्येय साध्य होतं का? या धीरोदत्त संघर्षाची कथा सांगणारा निरामि फिल्म्सची निर्मिती असलेला मिलिंद इनामदार दिग्दर्शित ‘सोंग्या’ हा चित्रपट १५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याआधी या चित्रपटाचं अत्यंत समर्पक पोस्टर आपल्या भेटीला आलं आहे.    रूढी परंपरांच्या जोखडात अडकलेल्या स्त्री वेदनेचा वेध परखडपणे घेत त्यांच्या दृष्टीकोनातून समाजपरिवर्तनाचा प्रामाणिक प्रयत्न ‘सोंग्या’ चित्रपटाच्या माध्यमातून केला असल्याचे दिग्दर्शक मिलिंद इनामदार सांगतात. ‘सोंग्या’ चित्रपटातील मुख्य भूमिकेत ऋतुजा बागवे, अजिंक्य ननावरे, गणेश यादव, अनिल गवस, प्रदीप डोईफोडे आदि कलाकार दिसणार आहेत. निशांत काकिर्डे, राहुल पाटील, मिलिंद इनामदार ‘सोंग्या

अभिनयच्या प्रेमात प्रथमेशचा खोडा.

Image
‘दोस्त दोस्त ना रहा’ असं म्हणत अभिनय बेर्डे आणि प्रथमेश परब या दोन जिवलग मित्रांच्या नात्यात सध्या दुरावा निर्माण झाला आहे. प्रत्येकजण कधी ना कधी हा प्रेमात पडतोच. आपल्या मित्राला त्याचं प्रेम मिळावं यासाठी जीवाचं रान करणारे मित्र आपण पाहिले आहेत. मात्र अभिनयला त्याच प्रेम मिळू नये यासाठी चक्क प्रथमेशने खोडा घातला आहे. असं कोणतं कारण आहे की, अभिनयच्या प्रेमाच्या आड प्रथमेश येत असेल? हा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. याचं उत्तर ३ नोव्हेंबरला चित्रपटगृहात मिळणार असून त्यासाठी प्रथमेश आणि अभिनय या जोडीचा 'सिंगल' हा चित्रपट तुम्हाला पहावा लागेल.       अभिनय आणि प्रथमेश हे दोघेही ‘सिंगल’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करणार आहेत. हा एक धमाल चित्रपट असून एक मित्र प्रेमाच्या बाजूने तर दुसरा मित्र प्रेमाच्या विरोधात काय काय करामती करतो याची गंमत पहायला मिळणार आहे. पोरीपायी दोस्तीत कुस्ती होईल की प्रेम जिंकेल यावर भाष्य करणारा 'सिंगल' हा चित्रपट प्रेक्षकांच फूल टू मनोरंजन करेल असा विश्वास अभिनय आणि प्रथमेश व्यक्त करतात. या दोघांसोबत या चित

'सेक्स्टॅार्शन'वर भाष्य करणारी 'कांड' लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर

Image
सेक्स्टॅार्शन म्हणजेच लैंगिक खंडणी. सध्या समाजात खंडणीचा हा प्रकार मोठ्या प्रमाणात फोफावतोय. समाजातील विविध स्तरातील लोक प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष जाहिरातीतून, फोनवर, सोशल मीडियावर सेक्स संदर्भातील व्हिडीओज, जाहिराती बघतात आणि एका वेगळ्याच चक्रव्युहात अडकतात. समाजाच्या भीतीपोटी,शरमेखातर या महाजालमध्ये अडकलेले अनेक जण योग्य पाऊल उचलत नाहीत. समाजातील याच भयाण वास्तवावर भाष्य करणारी ‘कांड’ ही वेबसीरिज लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. भिमराव काशिनाथ मुडे दिग्दर्शित ‘कांड’ या वेबसीरिजचे पोस्टर सोशल मीडियावर नुकतेच झळकले असून मनवा नाईक, हरीश दुधाडे, भिमराव काशिनाथ मुडे यांनी या सीरिजचे लेखन केले आहे. प्लॅनेट मराठी आणि मॅन्यूएला क्रिएशन्स निर्मित या वेबसीरिजचे अक्षय विलास बर्दापूरकर आणि मनवा नाईक निर्माते आहेत. आता प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे ती यात कोणते चेहरे झळकणार आहेत याची.  ‘कांड’बद्दल दिग्दर्शक भिमराव काशिनाथ मुडे म्हणतात, ‘’लैंगिक खंडणी हा एक गंभीर विषय आहे. लैंगिक खंडणीला बळी पडलेले अनेकदा लाजेखातर, भीतीमुळे या विषयावर भाष्य करणे टाळतात आणि शेवटी ट

“लंडन मिसळ” ८ डिसेंबरलाप्रदर्शनासाठी सज्ज…

Image
    ए बी इंटरनॅशनल,म्हाळसा एंटरटेनमेंट आणि लंडन मिसळ लिमिटेड प्रस्तुत तसंच जालिंदर कुंभार दिग्दर्शित 'लंडन मिसळ' हा चित्रपट येत्या  ८ डिसेंबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.               भारतात तसेच लंडनमध्ये शूट झालेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांनी भरत जाधव एका मोठ्या अन् महत्त्वपूर्ण भूमिकेत पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत.  आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांना सरप्राईज देणाऱ्या भरत जाधव यांनी पहिल्यांदाच चित्रपटासाठी रॅप गायन देखील केलं आहे.  श्री. रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून 'लंडन मिसळ' हा चित्रपट प्रेरित आहे, हे या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य.   'लंडन मिसळ' या चित्रपटाचे निर्माते अमित बसनेट, सुरेश गोविंदराय पै आणि आरोन बसनेट आहेत तर  सह-निर्माते सानिस खाकुरेल आहेत.   दिग्दर्शक जालिंदर कुंभार यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे,  तर सह-दिग्दर्शन वैशाली पाटील यांनी केले आहे.        पटकथा-संवाद ओमकार मंगेश दत्त यांचे आहेत.    वैशाली सामंत,रोहित राऊत,वैष्णवी श्रीराम यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे तर 'बाईपण भारी

महाराष्ट्राच्या अलौकिक संत पंरपरेचा इतिहास उलगडणार,आदिशक्ती ‘मुक्ताई’ रुपेरी पडद्यावर.

Image
महाराष्ट्रात ज्या स्त्री संत आपल्या कर्तृत्वाने अजरामर  झाल्या त्यात  ‘संत मुक्ताई’  यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. संत मुक्ताईच्या मुक्तपणाचे व श्रेष्ठपणाचे संतश्रेष्ठींनी ‘मुक्तपणे मुक्त, ‘श्रेष्ठपणे श्रेष्ठ’, सर्वत्रा वरिष्ठ आदिशक्ती मुक्ताई’।। असे वर्णन केले आहे. संत ज्ञानेश्वरांची लहान बहीण म्हणून संत मुक्ताबाई या सर्वाना परिचित आहेत. माऊलींप्रमाणेच त्यांचेही आयुर्मान तुलनेने तसे फारच कमी होते. मात्र, त्यांच्या हातून घडलेले कार्य हे सर्वार्थाने महान असेच ठरले.  मुक्ताईचे छोटेसे जीवन अत्यंत तेजोमय, प्रखर ज्ञानचेतनेचे सिद्ध जीवन होते. छोट्या आयुष्यात या जगन्मायेने संत कवयित्रींच्या काव्यानुभवांचा पाया रचला. स्त्रियांना अध्यात्माचे क्षेत्र खुले करून देऊन त्यात स्त्री-कर्तृत्वाचा आदर्श उभा केला. अशा ‘मुक्ताई’ च्या दृष्टीकोनातून संत ज्ञानेश्वरांच्या दिव्य कुटुंबाची भेट घडवणारा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित  ‘मुक्ताई’ हा भव्य आध्यात्मिक मराठी चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येतोय. ‘शिवराज अष्टका’तील चित्रपटांना मिळत असलेल्या अभूतपूर्व यशानंतर महाराष्ट्राच्या संत परंप

कोजागरीनिमित्त "चुकभूल द्यावी घ्यावी" टीमची अनोखी कल्पना.

Image
       बालगंधर्वांच्या संगीत नाटकावेळी प्रयोगाला येणाऱ्या प्रेक्षकांचं स्वागत अत्तर लावून केलं जायचं. त्याच धर्तीवर आता अक्षया नाईक व अक्षय मुडावदकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या "चुकभूल द्यावी घ्यावी"या नाटकाच्या प्रयोगावेळी प्रेक्षकांना गोडव्याचा अनुभव मिळणार आहे. कोजागरीनिमित्त २८ ऑक्टोबरला रात्री ८:०० वा दादरच्या श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात होणाऱ्या प्रयोगावेळी प्रेक्षकांना नाटका सोबत मसाला दुधाचा आस्वाद घेता येणार आहे.       वाईड अँगल एंटरटेनमेंट निर्मित (केतकी प्रवीण कमळे) व भूमिका थिएटर प्रकाशित , दिलीप प्रभावळकर लिखित"चुकभूल द्यावी घ्यावी" गोड नात्यांची मिश्किल गोष्ट .ह्या नाटकाचं दिग्दर्शन महेश डोकंफोडे यांनी केलं आहे. संदेश बेंद्रे यांनी नेपथ्य, अशोक पत्की यांनी संगीत, अक्षय मुडावदकर आणि अभिषेक करंगुटकर यांनी गीतलेखन, शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजना, नेहा मुडावदकर यांनी वेशभूषा, संदीप नगरकर यांनी रंगभूषेची जबाबदारी निभावली आहे. तर अक्षय मुडावदकर, अक्षया नाईक यांच्यासह महेश डोकंफोडे, अमृता तोडरमल यांच्याही नाटकात भूमिका आहेत.         प्रासंगिक आणि

नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शनचे 'जयभीम पँथर' एक संघर्ष द्वारे पदार्पण.

Image
बहुजन तरुणांना नवी दिशा देण्यासाठी समाज प्रबोधनासाठी नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शन "जयभीम पँथर" एक संघर्ष या चित्रपटाची निर्मिती करत आहे. निशांत नाथाराम धापसे दिग्दर्शित या चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतेच अशोका विजयादशमीच्या मुहूर्तावर छत्रपती संभाजीनगर येथे लाँच करण्यात आलं असून, एका संघर्षाची कहाणी या चित्रपटातून मांडली जाणार आहे. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय किर्तीचे पु.भ. विशुद्धानंद बोधी महायेरे, मा. खा.इम्तियाज जलील, पोलिस आयुक्त मनोज लोहिया , श्रीमती सूर्यकांता गाडे, भीमराव हत्तीअंबीरे तसेच चित्रपटाचे निर्माते,दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ टीम उपस्थित होते.                  भ. शीलबोधी यांच्या नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शनद्वारे निर्मिती होत असलेला "जयभीम पँथर" एक संघर्ष हा महत्त्वाचा चित्रपट ठरणार आहे. आयु. रामभाऊ तायडे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. संपूर्ण बौद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील भारत निर्माण करण्यासाठी चित्रपट, मालिका अशा माध्यमातून नवनिर्मिती करण्याचा या निर्मिती संस्थेचा मानस आहे. लेखक दिग्दर्शक निशांत नाथाराम धापसे यांनी आताप

बहुप्रतिक्षित चित्रपट ‘झिम्मा 2’ चं दसऱ्याचा शुभ मुहूर्तावर पोस्टर आऊट.

Image
जिओ स्टुडिओज आणि आनंद एल राय प्रस्तूत, चलचित्र मंडळी निर्मित आगामी मराठी चित्रपट झिम्मा २ चे मोठया जोमाने प्रमोशन सुरु झाले असल्याचे दिसुन येत आहे. काही दिवसांपूर्वीच निर्मात्यांनी २४ नोव्हेंबर रोजी चित्रपट रिलीज होत असल्याची घोषणा करताच सोशल  मीडियावर प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली होती, चित्रपटाच्या संपूर्ण टीमवर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना त्यात भर म्हणजे आज दसऱ्याच्या शुभ दिवशी चित्रपटाचा पहिलं पोस्टर आउट करण्यात आला आहे, ज्यात चित्रपटातले सर्व कलाकार दिसत आहेत!  सुपरहिट चित्रपट झिम्मा नंतर आता पुनः नव्या पोस्टर मधून आपल्या सगळ्या आवडत्या कलाकारांचा धम्माल लूक बघून प्रेक्षक मोठया पडद्यावर या सगळ्यांना भेटण्यास आतुर झाले आहेत. सुहास जोशी, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव आणि निर्मिती सावंत यांच्या बरोबरीने आणखी दोन प्रसिध्द चेहरे ह्या तगड्या कलाकारांच्या टोळीमध्ये सामील झाले आहेत. ते म्हणजे रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे. पण या दोघींची पात्रं काय आहेत आणि ती या कथेत काय रंग भरणार यासाठी मात्र प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार

'निळावंती' ती येतिय........उत्कंठावर्धक पोस्टर प्रदर्शित.

Image
चित्रपटसृष्टीमध्ये नेहमीच वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट पाहायला मिळतात.  आता 'निळावंती' चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे. पोस्टर पाहून हा थरारक  चित्रपट असल्याचे लक्षात येतेय. पोस्टरमध्ये एक स्री हातात कंदील घेऊन जंगलात चालताना दिसत आहे. ती येतिय... या टॅगलाईनचा नेमका अर्थ काय? हा  प्रश्न अनेकांच्या मनात चलबिचल करत आहे .याव्यतिरिक्त पोस्टरमध्ये असलेली ती पाठमोरी अभिनेत्री नक्की कोण आहे, याची उत्सुकताही प्रेक्षकांना लागली आहे.   'निळावंती' हा एक ग्रंथ आहे. या ग्रंथाबद्दल फार क्वचित लोकांना माहित आहे. हा ग्रंथ कोणी सहसा वाचत नाही कारण अनेक अफवा या ग्रंथाबद्दल पूर्वी पसरल्या होत्या. या सर्व गोष्टी सत्य घटनेवर आधारित  आहेत की नाही त्याचीच संपूर्ण कथा आता आपल्या समोर चित्रपटाच्या माध्यमातून सचिन दाभाडे दाखवणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून 'निळावंती' राक्षसी की दैवी रूप आहे, ही अफवा आहे की सत्य या अनेक गूढ गोष्टींचे रहस्य उलगडणार आहे.   लेखक, दिग्दर्शक सचिन दाभाडे म्हणतात, " लवकरच `निळावंती` चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तुम्हाल

अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं अस्तित्व शोधणारे 'अस्तित्व', भरत जाधव दिसणार एका वेगळ्याच भूमिकेत.

Image
नवनवीन कथा, आशय असणारी वेगवेगळ्या जॉनरची नाटके रंगभूमीवर येत असतानाच आता अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं अस्तित्व शोधणारे एक कौटुंबिक नाटक नाट्यरसिकांच्या भेटीला येत आहे. भरत जाधव एण्टरटेनमेंट निर्मित 'अस्तित्व' हे नाटक लवकरच नाट्यप्रेमींच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहे. स्वप्नील जाधव लिखित, दिग्दर्शित 'अस्तित्व' या नाटकाचा येत्या ३ नोव्हेंबर रोजी शुभारंभाचा प्रयोग असून यात चिन्मयी सुमित, सलोनी सुर्वे, हार्दिक जाधव, श्याम घोरपडे, जयराज नायर आणि भरत जाधव प्रमुख भूमिकेत आहेत. भरत जाधव हे एक हरहुन्नरी अभिनेते आहेत. आजवर त्यांनी विविध भूमिका साकारून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. बऱ्याच विनोदी भूमिका साकारल्या. नकारात्मक भूमिकाही त्यांनी केल्या. मात्र आता बऱ्याच काळानंतर भरत जाधव या नाटकाच्या माध्यमातून एका वेगळ्याच रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.   ही कथा एका अशा कुटुंबाची कहाणी आहे, जे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहे. कुटुंबातील एकमेव कमावणाऱ्या आणि नोकरीतून लवकरच निवृत्त होणाऱ्या संतोष हसोळकरची ही कथा आहे. ज्याने निवृत्तीनंतर मुं

महिलांवरील लैंगिक अत्याचाराचा वेध घेणाऱ्या 'कलम ३७६' चित्रपटाचे पोस्टर लाँच.

Image
हजारो वर्षांची संस्कृती सांगणाऱ्या भारत देशात स्त्रियांवरील अत्याचार हा मोठाच सामाजिक प्रश्न आहे. त्यातही स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार, शोषणाचा प्रश्नाचा वेध घेणाऱ्या कलम ३७६ या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं. सचिन धोत्रे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.  'ना कोर्ट न खटला, जो चुकला त्याला ठोकला' अशी धडाकेबाज टॅगलाईन असलेल्या कलम ३७६ या चित्रपटाची निर्मिती आशिष धोत्रे आणि समीर गोंंजारी यांनी केली आहे. सचिन धोत्रे आणि रवींद्र माठाधिकारी यांनी चित्रपटाचं लेखन, तर एम. बी.अल्लीकट्टी यांनी छायांकन केलं आहे. चित्रपटाचं पोस्टर अतिशय लक्षवेधी आहे. फाईलवर ठेवलेलं पिस्तुल आणि मागे भिंतीवर सावरकरांचा फोटो, महाराष्ट्र पोलिसची पाटी दिसते. त्यामुळे चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे. चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.               आतापर्यंत अनेक चित्रपटांतून स्त्रियांते प्रश्न हाताळण्यात आले आहेत. मात्र स्त्रियांचं लैंगिक शोषण, लैंगिक अत्याचार कायद्याच्या दृष्टिकोनातून, हार्डहिटिंग पद्धतीनं, कोर्टरूम ड्रामा पद्धतीनं मांडल्याची उदाहरणं

निराळ्या संकल्पनेवर आधारित "८ दोन ७५" चित्रपट येतोय १९ जानेवारीला.

Image
एका महत्त्वाच्या व संवेनशील विषयावर आधारित '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी' हा अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपट १९ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुश्रुत भागवत दिग्दर्शित या चित्रपटाची मोठी चर्चा असून, देहदान ही संकल्पना आणि त्याबाबत जागृती करणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरणार आहे. उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे सुधीर कोलते, विकास हांडे, लोकेश मांगडे हे ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटाचे निर्माते आहेत, तर सुश्रुत भागवत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाची पटकथा शर्वाणी - सुश्रुत यांनी लिहिली आहे, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे. अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे - विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी, अनुष्का पिंपुटकर, अक्षय मिटकल अशी चित्रपटाची दमदार स्टारकास्ट असून अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. वैभव जोशी यांचे गीतलेखन आणि अवधून गुप्ते यांनी संगीत दिग्

‘गाफील’ चित्रपटाचे पोस्टर लॉन्च.

Image
मराठी प्रेक्षक नेहमीच चित्रपटसृष्टीकडून आगळ्या-वेगळ्या आशयाची, विषयाची आणि वेगळ्याच ढंगाची कलाकृती बघायला मिळेल अशी अपेक्षा करतो. असे अनेक चित्रपट मराठी प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतल्याची उदाहरणं आहेत. यामुळे नवोदित दिग्दर्शकही काहीतरी नवीन, हटके विषयांवर सातत्याने कलाकृती घडवण्यासाठी तत्पर असतात. असेच एक हरहुन्नरी दिग्दर्शक मिलिंद अशोक ढोके आपल्यासमोर एक अनोखी कलाकृती चित्रपटाच्या स्वरूपात आणत असून, ‘गाफील’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचे टायटल पोस्टर नुकतेच लॉन्च करण्यात आले.  चित्रपटाच्या ‘गाफील’ या नावामुळेच प्रेक्षकांमध्ये हा चित्रपट नक्की कोणत्या विषयाशी निगडीत असेल याची उत्सुकता निर्माण झाली आहे. आदित्य राज आणि वैष्णवी बरडे हे कलाकार या चित्रपटातून कलासृष्टीत पदार्पण करतील. त्यामुळे ‘गाफील’ हा चित्रपट नक्की कसा असेल, समाज नक्की कशाबद्दल गाफील आहे, याची जाणीव करून देणारा हा चित्रपट असेल का, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडतील. मात्र, त्यांना चित्रपट बघितल्यावरच याची खरी उत्तरं कळतील.  धरती फिल्मस प्रस्तुत व निर्मित, मॅड आर्क पिक्चर्स सहनिर्मित ‘गाफील’ या चित

जिओ स्टुडिओज आणि आनंद एल राय यांच्या कलर यलो प्रोडक्शन्सच्या "नखरेवाली " चे चित्रीकरण सुरू .

Image
जिओ स्टुडिओज आणि आनंद एल राय यांचे कलर यलो प्रॉडक्शन्स हे नेहमीच त्यांच्या वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्स साठी ओळखले जातात लवकरच ते  "नखरेवाली" हा नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. या चित्रपटात अभिनेता अंश दुग्गल मुख्य भूमिकेत दिसणार आहे.       सिनेसृष्टीतील उदयोन्मुख नव्या चेहऱ्यांना  संधी देण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या कलर यलो प्रॉडक्शनने अंश दुग्गलची या रोमांचक प्रोजेक्ट् साठी मुख्य स्टार म्हणून निवड केली आहे. हा चित्रपट राहुल शांकल्या दिग्दर्शित करणार असून आज पासून त्याच्या चित्रीकरण सुरू होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि हिमांशू शर्मा करणार आहेत. .       हा चित्रपट संपूर्ण एंटरटेनर बनण्याचे वचन तर देतो आहे ज्यात भावनांची भरभराट आहे जी भारतभरातील प्रेक्षकांना आकर्षित करेल. चित्रपटाच्या थीमची एक झलक या व्हिडिओ मधून प्रेक्षकांना दिसणार आहे.   अभिनेता अंश दुग्गल याने या प्रकल्पाविषयी उत्साह व्यक्त करताना सांगितले की, "आनंद सर आणि आमचे दिग्दर्शक राहुल शंकल्य यांच्यासोबत माझ्या

'चैतू'ची आई आता तरी त्याच्याशी बोलणार का?

Image
'नाळ'च्या पहिल्या भागात 'चैतू'ची आई त्याच्याशी न बोलताच निघून गेली. आता चैतू त्याच्या आईला पश्चिम महाराष्ट्रात भेटायला जाणार आहे. मात्र आता इतकी वर्षं झाल्यानंतर त्यांच्यातील हा दुरावा निवळेल का? चैतू त्याच्या आईकडे येईल का? त्यांच्यातील हा अबोला संपेल का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले असतील. परंतु या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना १० नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात मिळणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे दुसरे टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. टिझर पाहाता चैतू त्याच्या आईबरोबर दिसत आहे, मात्र त्यांच्या नात्याची नाळ जुळली आहे का, हे अद्यापही अनुत्तरित आहे. याचा उलगडा आता लवकरच होणार आहे.    ‘नाळ भाग २’च्या पहिल्या टिझरलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भिंगोरी’ गाणेही सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. ‘आई मला खेलायला जायचंय’ या गाण्याप्रमाणेच ‘भिंगोरी’ या गाण्याचे व्ह्यूजही दिवसेंदिवस वाढत आहेत. झी स्टुडिओज आणि नागराज मंजुळे निर्मित 'नाळ भाग २'चे सुधाकर रेड्डी यंक्कट्टी दिग्दर्शक आहेत. 'नाळ' ने प्रेक्षकांशी नाळ जो

मराठी कलाविश्वातील प्रतिभेच्या सन्मानासाठी 'टीव्ही ९ मराठीचा 'आपला बायोस्कोप'.

Image
महाराष्ट्रातील नंबर १ मराठी न्यूज चॅनेल TV9 मराठीच्या वतीने 'आपला बायोस्कोप २०२३' या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन जगतातील नवोदित तसेच दिग्गज कलाकारांचा सन्मान 'आपला बायोस्कोप २०२३' हा पुरस्कार देऊन केला जाणार आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्ती, समूह यांच्या कामाचा गौरव याप्रसंगी केला जाणार आहे. येत्या ३० नोव्हेंबरला 'आपला बायोस्कोप २०२३' पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा मुंबईत संपन्न होणार आहे.       गेल्या दोन दशकांत मराठी सिनेसृष्टीने मोठी झेप घेतल्याचे पाहायला मिळते. मनोरंजनासोबतच विविध विषय मराठी कलासृष्टीने अत्यंत समर्थपणे हाताळले. अभिरुचीसंपन्न आणि चोखंदळ मानल्या जाणाऱ्या मराठी प्रेक्षकांनी अशा अनेक कलाकृती अक्षरश: डोक्यावर घेतल्या. मालिका आणि सिनेजगतातील उत्कृष्ट कलाकृतींचा गौरव 'आपला बायोस्कोप २०२३' या पुरस्काराच्या माध्यमातून केला जाणार आहे.      मालिकांसाठी सर्वोत्कृष्ट मराठी मालिका, सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेता, सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत

२८ ऑक्टोबरला रंगणार 'फक्त मराठी सिने सन्मान २०२३’.

Image
मराठी मनोरंजन विश्वात आपलं वेगळेपण अधोरेखित करीत अल्पावधीत प्रतिष्ठेचा ठरलेला आणि गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट बघत होते असा 'फक्त मराठी सिने सन्मान २०२३’  हा पुरस्कार सोहळा  येत्या  शनिवारी २८ ऑक्टोबर सायं.  ७. ०० वा.  आणि रविवारी २९ ऑक्टोबरला दुपारी. १२. ०० वा. फक्त मराठीवर रंगणार आहे. मुख्य  सोहळ्याआधी शनिवारी सायं. ६. ३० वा. आणि रविवारी दुपारी ११. ३० वा. रेड कार्पेटची खास  झलकही पहायला मिळणार आहे..  विशेष म्हणजे या  पुरस्कार सोहळ्याचा  आस्वाद सलग दोन दिवस  प्रेक्षकांना घेता येणार असून या सोहळ्याचे पूर्वरंग रविवार २२ ऑक्टोबरला  सकाळी ११.३० वा  आणि सायं. ५. ३० वा. पहायला मिळणार आहेत. मनोरंजनाचा ‘फूल ऑन तडका’, कलाकारांचे एकापेक्षा एक जबरदस्त परफॉर्मन्सेस आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची मांदियाळी असा जबरदस्त नजराणा असलेला हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. बॉलीवूडमधले ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी या सोहळ्याला विशेष उपस्थिती लावली.  उत्साहात संपन्न झालेल्या या सोहळ्यात कलाकारांच्या धमाकेदार सादरीकरणाने उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन केले. य

शाळकरी वयातल्या प्रेमाची धमाल ३ नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात.

Image
शाळेच्या अल्लड वयातलं प्रेम, त्यासाठी केलेली धडपड आणि त्यातून झालेली धमाल याची गोष्ट 'रंगीले फंटर' या चित्रपटातून उलगडणार आहे. दोस्तीत कुस्ती नाय पाहिजे अशी टॅगलाइन आणि उत्तम स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला.  ए. के. इंटरनॅशनल मुव्हीजच्या प्रशांत अडसूळ, शशिकांत अडसूळ यांनी 'रंगीले फंटर' चित्रपटाची निर्मिती केली आहे. आजवर अनेक महोत्सवांमध्ये गौरवालेला हा चित्रपट येत्या  ३ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.  चित्रपटाच दिग्दर्शन निशांत नाथाराम धापसे यांनी केलं आहे. अक्षय गोरे यांनी कथा, पटकथा, संवाद लेखन,  नितीन रायकवार, कौस्तुभ पणत यांनी गीतलेखन, राजा अली यांनी संगीत दिग्दर्शन, राजदत्त रेवणकर यांनी छाया दिग्दर्शन,  फुलवा खामकर यांनी नृत्य दिग्दर्शन आणि सिद्धेश मोरे यांनी संकलन केलं आहे.कला दिग्दर्शक  प्रकाश शिनगारे आणि कार्यकारी निर्माता म्हणून   बाबासाहेब पाटील यांनी काम पाहिले आहे.चित्रपटात  हंसराज जगताप, रुपेश बने, जीवन करलकर, यश कुलकर्णी, मिलिंद शिंदे, किशोर चौघुले, सिया पाटील, पलक अडसूळ, डॅनी अडसूळ, वैशाली दाभाडे, अरूण गीते अशी दमदा

एका अनोख्या कुटुंबाची विलक्षण गोष्ट.

Image
वडिल आणि मुलाचे नाते हे नेहमीच संवेदनशील असते. मुळात वडिल आणि मुलाचे नाते आईच्या माध्यमातून जोडले जाते. ती या दोघांमधील दुवा असते.  त्यामुळे या नात्यात खरी कसोटी असते ती आईची. या नात्यात सुसंवाद साधला गेला तर हे नाते खूप सुंदर बहरू शकते. अशाच नात्यावर भाष्य करणाऱ्या ‘शॅार्ट अँण्ड स्वीट’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शुभम प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाचे गणेश कदम दिग्दर्शक आहेत. तर पायल गणेश कदम, विनोद राव निर्माते आहेत. सोनाली कुलकर्णी, हर्षद अतकरी, श्रीधर वत्सर आणि रसिका सुनील यांची गोड कथा सांगणारा हा चित्रपट येत्या ३ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  आपल्या वडिलांना भेटण्याची तीव्र ओढ असतानाच एक अशी व्यक्ती वडिल म्हणून समोर येते, ज्याची त्याने स्वप्नातही कल्पना केलेली नसते. अशा वेळी मुलाची झालेली अवस्था, वडिल म्हणून त्यांना स्वीकारताना मनात होत असलेली चलबिचल यात पाहायला मिळणार आहेत. त्याच्या आईने इतक्या वर्षांपासून वडिलांची ओळख का लपवून ठेवली आणि मुलगा कारण कळल्यानंतर वडिलांना स्वीकारणार का, या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट

'सफाई कामगार ते सरपंच', ‘मोऱ्या’ उर्फ सीताराम जेधेचा थक्क करणारा प्रवास.

Image
      आपण वाट्टेल तिथे फेकलेला हजारो टन कचरा, टाकलेलं - कुजलेलं अन्न, प्लास्टिक, बाटल्या, रत्यावर मारलेल्या पिचकाऱ्या, स्वयंपाकघर, प्रसाधनगृहातील सांडपाणी, फुटलेली - तुंबलेली गटारे, कुठल्याही साधनसामुग्रीशिवाय मॅनहोलखालील ड्रेनेज लाइन स्वच्छ करणाऱ्या देवदूतांपैकीच एक असणारा 'मोऱ्या' उर्फ सीताराम जेधे. सफाई कामगार ते पिंपळनेरचा सरपंच हा त्याचा थक्क करणारा जीवनप्रवास नेमका आहे तरी कसा हे दाखविण्यासाठी 'मोऱ्या' चित्रपट लवकरच सर्वांच्या भेटीस येत आहे.  'मोऱ्या'ची कथेने युरोपमधील लंडन, मिल्टन केन्स, मेंचेस्टर, इटली इत्यादी शहरांसह अमेरिकेतील न्यूयॉर्क, रॅले, ऑक्सफर्ड (यूएसए) तसेच ऑस्ट्रेलिया, सिंगापूर अश्या देशांतील रसिकांना आकर्षित केले असून 'मोऱ्या' उर्फ सीताराम जेधेला भेटण्यासाठी ते विशेष उत्सुक आहेत. येत्या ५ नोव्हेंबरला मोऱ्या उर्फ सीताराम जेधेची भूमिका करणारा लेखक, दिग्दर्शक व अभिनेता जितेंद्र बर्डे लंडनला रवाना होणार आहे. वरील देशांतील प्रतिनिधींसाठी या चित्रपटाचं विशेष स्क्रीनिंग लंडनजवळच्या मिल्टन केन्स येथे आयोजित करण्यात आले आहे. या शो

भल्याभल्यांची वाजवणारा दादांचा ‘वाजवू का?’ सिनेमा येतोय झी टॉकीजवर .

Image
दादा कोंडके यांच्या कोणत्याही सिनेमाचं नाव घ्या, त्या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर अक्षरशः वादळ आणले आहे. दादा कोंडके यांच्या गाजलेल्या सिनेमांचा काळ अनुभवणं ही सिनेमाप्रेंमींसाठी कायमच एक पर्वणी असते. त्यासाठीच झी टॉकीज वाहिनीने ही संधी प्रेक्षकांसाठी आणली आहे. दादा कोंडके यांच्या अनेक सुपरहिट सिनेमांपैकी एक म्हणजे ‘वाजवू का?’ हा सिनेमा.    रमेश भाटकर आणि नंदिनी जोग या जोडीला पडद्यावर आणले ते या सिनेमाने. दादा कोंडके यांनी अभिनयासोबतच दिग्दर्शनाची धुरा सांभाळत ‘वाजवू का?’ हा सिनेमा बनवला आणि सुपरहिट केला. या सिनेमाची रंगत घरबसल्या पाहण्याची पर्वणी झी टॉकीजवर येत्या रविवारी २२ ऑक्टोबरला दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता मिळणार आहे.    दादा कोंडके म्हणजे मराठी सिनेसृष्टीला लाभलेले एक अनमोल रत्न. ज्यांनी आपल्या चित्रपटांद्वारे मराठी सिनेसृष्टीत स्वतंत्र असे अढळ स्थान निर्माण केले. ग्रामीण मराठी प्रेक्षक आणि शाहीर दादा कोंडके यांचे वेगळे अतूट नाते जमले. दादा कोंडके म्हणजे बाप माणूस, उत्तम प्रतिभा आणि अचूकतेचा संगम. मराठी प्रेक्षकांची नाडी ओळखलेला अवलिया. साचेबद्ध नायकासारखे ना व्यक्तिम

जिओ स्टुडिओज आणि आनंद एल राय, 24 नोव्हेंबरला घेऊन येत आहेत महाराष्ट्राच्या लाडक्या चित्रपटाचा सिक्वेल ‘झिम्मा2.

Image
मराठीतील बहुप्रतिक्षित सिक्वेल झिम्मा2 ची आज तारीख जाहीर झाली आहे. एका पोस्टरद्वारे निर्माते जिओ स्टुडिओज आणि कलर येल्लो प्रॉडक्शन्स, चलचित्र मंडळी यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत 24 नोव्हेंबर 2023 रोजी चित्रपट रिलीज करत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.          आपल्या सोशल मिडिया अकाउंट वर पोस्ट करत निर्मात्यांनी असे म्हंटले आहे की, “पुढच्या ट्रीपची तारीख ठरली… आनंदाची गाडी सुटली! २४ नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात” कलर येलो प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित, ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मीत, हेमंत ढोमे दिग्दर्शित ह्या चित्रपटात तगड्या आणि लोकप्रिय कलाकारांची फौज पुन्हा एकत्र येत आहे ज्यात सुहास जोशी, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव आणि निर्मिती सावंत यांचा समावेश आहे. आणि महत्वाचं म्हणजे या कलाकारांच्या टीम मध्ये काहीं नवीन सदस्य ही सामील होणार आहेत अशी चर्चा आहे.  "झिम्मा2" पुन्हा एकदा आनंदाचा खेळ खेळायला, पुर्नःभेटीचा अविस्मरणीय अनुभव द्यायला 24 नोव्हेंबर 202

शार्प शूटर...... विशाखा

Image
अभिनेत्री विशाखा सुभेदार सध्या त्यांच्या बेधडक आणि डॅशिंग अंदाजामुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. हातात गन घेतलेलं त्यांचं बेअरिंग आणि वेशभूषा पाहता एखाद्या खलनायकाची अथवा 'शूटर' ची  व्यक्तिरेखा  त्या साकारताना दिसतील. त्यांचा हा ‘शूटर’ अंदाज आगामी ‘एकदा येऊन तर बघा’  या चित्रपटातला आहे. या चित्रपटात विशाखाने ‘मगरु’ या ‘शार्प शूटर’ ची भूमिका साकारली असून यात त्या 'डॅशिंग रावडी लूक' मध्ये दिसणार आहेत.  या भूमिकेबद्दल बोलताना विशाखाने सांगितलं की, ही अतिशय भन्नाट व्यक्तिरेखा आहे. ग्रे शेड असलेली भूमिका साकारताना मेकअप, बॉडी लँग्वेज, एक्स्प्रेशन्स या सगळ्यांकडे खास लक्ष द्यावं लागतं. भूमिका कोणत्याही प्रकारची असली, तरी ती चांगली व्हावी यासाठी कलाकारांना कष्ट घ्यावे लागतात. एकाच इमेजमध्ये अडकून पडायचं नसल्याने ही वेगळी भूमिका स्वीकारल्याचं त्या सांगतात.  येत्या २४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित  'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सह

‘नाळ भाग २’मधील ‘भिंगोरी’गाणे श्रोत्यांच्या भेटीला.

Image
२०१८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘नाळ’ चित्रपट सुपरहिट ठरला. राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या या चित्रपटाशी प्रेक्षकांशी नाळ जोडली गेली. ‘चैत्या’चे बोबडे बोल सगळ्यांनाच भावले, गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली. आता ‘नाळ भाग २’ प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘भिंगोरी’ असे गाण्याचे बोल असून ए. व्ही. प्रफुल्लाचंद्रा यांचे संगीत लाभलेल्या या गाण्याला वैभव देशमुख यांनी शब्दबद्ध केले आहे. तर या सुरेल गाण्याला मास्टर अवन, कडूबाई खरात, मनीष राजगिरे आणि नागेश मोरवेकर यांचा आवाज लाभला आहे. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित, सुधाकर रेड्डी यक्कंटी दिग्दर्शित ‘नाळ भाग २’ १० नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  २०१८ साली ‘नाळ’मध्ये विदर्भातल्या नदीचं विस्तीर्ण पात्र दिसलं होतं. त्या पात्रात पाणी कमी, आणि वाळवंट जास्त होतं. असं असूनही पडद्यावर विदर्भ कधी नव्हे इतका विलोभनीय दिसला होता. ती कमाल होती सुधाकर रेड्डी यक्कंटी यांच्या कॅमेराची. तर अशा रखरखीत वातावरणातही माया करणाऱ्या माणसांच्या सावलीत चैतू घडत होता. आता ‘नाळ २’ मध्ये मोठा झाल

'वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स' या पहिल्या हिंदी वेबसीरिजच्या चित्रीकरणास प्रारंभ.

Image
'वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स' या हिंदी भाषेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावरील पहिल्या वेबसीरिजच्या चित्रीकरणाचा प्रारंभ भोर येथील राजवाड्यात घटस्थापनेच्या मुहूर्तावर करण्यात आला. यावेळी या वेब सीरिजचे लेखक दिग्दर्शक योगेश सोमण, निर्माते आणि डेक्कन ग्रुपचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. अनिर्बान सरकार, डेक्कन ए व्ही मीडियाचे संचालक अजय कांबळे,प्रॉडक्शन हेड साची गाढवे, सिनेमॅटोग्राफर प्रसाद भेंडे, प्रोडक्शन डिझायनर, सिद्धार्थ तातूसकर,कला दिग्दर्शक महेश कोरे आदी उपस्थित होते.  दिग्दर्शक योगेश सोमण म्हणाले," सावरकरांनी आपले संपूर्ण आयुष्य कुटुंबासहित देशकार्यासाठी अर्पण केले. त्यामुळे त्यांचे कार्य समाजासमोर आलेच पाहिजे असे आम्हाला वाटते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर देणे हे आमचे नॅरेटिव्ह नसून 'वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स' या वेबसीरिजच्या माध्यमातून इतिहासाला अवगत असणारे, ज्याचे पुरावे उपलब्ध आहेत, जे पुरावे तार्किक दृष्टीने मांडता येतील आणि त्यातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्व जसे होते तसे मांडण्याचा

सिद्धार्थ जाधव आणि महेश मांजरेकर यांच्या 'सर्व लाईन व्यस्त आहेत' चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर.

Image
        रसिक प्रेक्षकांना सहकुटुंब सहपरिवार भरभरून मनोरंजनाचा अनुभव घेता येणार आहे कारण ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या सुपरहिट चित्रपटाचा २३ ऑक्टोबर २०२३ रोजी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन ‘प्रदीप मेस्त्री’ यांनी केले असून चित्रपट सिद्धार्थ जाधव, महेश मांजरेकर, कमलाकर सातपुते, गौरव मोरे, हेमांगी कवी, संस्कृती बालगुडे, सौरभ गोखले, स्मिता शेवाळे आणि निथा शेट्टी यांच्या अभिनयाने चित्रपट उजळून आला आहे. तसेच पंकज पडघम आणि उद्भव ओझा यांनी चित्रपटाला संगीत दिले असून आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरांनी चित्रपटातील गाणी दुमदुमनार आहेत. बाब्याच्या (सिद्धार्थ जाधव) लग्नात त्याची एक्स गर्लफ्रेंड प्रियंका (हेमांगी कवी) गोंधळ घालण्यासाठी येते परंतु गडबडे बाबाच्या (महेश मांजरेकर) आशीर्वादाने समीर (सौरभ गोखले) बाब्याच्या मदतीला येऊन तिला अडवतो. परंतु त्याच वेळी प्रियंकाचा भाऊही (कमलाकर सातपुते) येतो आणि तिथे एक नवा तूफान विनोदी गोंधळ सुरू होतो. या गोंधळात बाब्याचं लग्न होतं की नाही ? या कोड्याचं उत्तर चित्रपटात

मध्य प्रदेशमध्ये आजपासून जिओ स्टुडिओजचा भव्यदिव्य संगीतमय चित्रपट “मानापमान"च्या चित्रीकरणास सुरूवात!

Image
सुपरहिट संगीतमय चित्रपट 'कट्यार काळजात घुसली' नंतर पुन्हा एकदा अभिनेता - दिग्दर्शक सुबोध भावे, चित्रपट "मानापमान" द्वारे भव्यदिव्य संगीतमय नजराणा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेवून येण्यास सज्ज झाले असून, आज ग्वालियर मध्ये चित्रपटाची संपुर्ण टीम शूटींगसाठी पोहचली असून पुढचे काही दिवस ओरछा मधील विलक्षण ठिकाणी चित्रपटातील खूप महत्वाचे सीन शूट केले जाणार आहेत. बहुप्रशांसित चित्रपट कट्यार काळजात घुसली आणि डॉ. काशिनाथ घाणेकर चित्रपटाची संपूर्ण टीम ह्या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येत आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त 'मी वसंतराव',  'गोदावरी' आणि 'बाईपण भारी देवा'चे बॉक्स ऑफिसवरील प्रचंड यश साजरे केल्यानंतर जिओ स्टुडिओज् आता कृष्णाजी खाडिलकर लिखित "संगीत मानापमान" या प्रसिद्ध नाटकावरून प्रेरित होवून ही नवीन संगीतमय कलाकृती घेऊन येत आहेत.  जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनीत "मानापमान" चित्रपटाचे चित्रीकरण भारतातील वेगवेगळ्या नेत्रदीपक ठिकाणी होणार असून, आकर्षक वेशभूषा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला ट्रेलर लाँच सोहळा.

Image
‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशी ओळख असणाऱ्या नितीन जयराम गडकरी यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच नागपूर येथे दिमाखात पार पडला. या वेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय क्रिकेटर उमेश यादव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी चित्रपटात नितीन गडकरी यांची भूमिका साकारणाऱ्या राहुल चोपडा यांनी ‘गडकरी’ शैलीने उपस्थित राहून प्रेक्षकांची मने जिंकली.   अभिजीत मजुमदार आणि ए एम सिनेमा प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित ‘गडकरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे. देशाच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांची भूमिका राहुल चोपडा यांनी साकारली असून या चित्रपटात ऐश्वर्या डोरले, अभिलाष भुसारी, पुष्पक भट, अभय नवाथे, वेदांत देशमुख, तृप्ती प्रमिला काळकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अनुराग भुसारी यांची कथा, पटकथा असलेल्या या चित्रपटाचे अनुराग भुसारी, मिहिर फाटे सहनिर्माते आहेत.  ट्रेलरमध्ये ‘गडकरी’ ते ‘रोडकरी’चा प्रवास दिसत आहे. नितीन गडकरी यांचा हा प्रवास निश

'बॉईज ४’ मधील 'ये ना राणी’वर थिरकणार महाराष्ट्र .

Image
‘बॅाईज’ चित्रपटाच्या सगळ्या भागांची खासियत म्हणजे त्यातील गाणी. या गाण्यांनी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले. ही गाणी, त्यातील हूक स्टेप हे सगळेच ट्रेण्डिंगमध्ये असते. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘बॅाईज ४’मधील गाण्यांनीही यापूर्वीच संगीतप्रेमींना वेड लावले आहे. आता ‘बॅाईज ४’मधील प्रत्येकाला थिरकायला लावणारे ‘ये ना राणी’ हे पार्टी साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतिक लाड, अभिनय बेर्डे आणि जुई बेंडखळे याच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या या हॅपनिंग साँगला अवधूत गुप्ते यांचे जबरदस्त संगीत आणि बोल लाभले आहे. तर अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या आवाजाने हे गाणे अधिकच जल्लोशमय झाले आहे. राहुल ठोंबरे यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे.  हे एनर्जेटिक गाणे तरूणाईला आवडेल, असे आहे. या गाण्याचे बोल, संगीत खूपच स्फूर्तीदायी आहे. त्यामुळे नवीन वर्षात प्रत्येक पार्टीत हे गाणे नक्कीच वाजणार.  गाण्याबद्दल संगीतकार अवधूत गुप्ते म्हणतात, " 'बॉईज ४' मधील दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला, असाच प्रतिसाद 'ये ना राणी तू ये ना ' आता