'तुझ्याविना' व्यक्त करणार मनातील प्रेमभावना .



अवधूत गुप्ते यांनी सोशल मीडियावर ‘विश्वामित्र’ या अल्बममधील दुसऱ्या गाण्याचा टिझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘तुझ्याविना’ असे ह्या गाण्याचे बोल असून, तुटलेल्या हृदयाची कहाणी सांगणाऱ्या ह्या गाण्यातून प्रेमाची आणखी एक कथा पाहायला मिळणार आहे. ही प्रेमकथा आपल्याला येत्या २ फेब्रुवारीला समजणार आहे. अवधूत गुप्ते यांचे संगीत, बोल असलेल्या या गाण्याला आवाजही त्यांचाच लाभला आहे. एकविरा म्युझिक  प्रस्तुत ‘विश्वामित्र’ या अल्बमची निर्मिती गिरीजा गुप्ते यांनी केली आहे.

या गाण्याबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात, "आयुष्यात प्रत्येकाला कधीना कधी प्रेम होते. कोणाचे प्रेम शेवटपर्यंत टिकते तर कोणाची साथ अर्ध्या वाटेतच सुटते. या माझ्या मित्रमैत्रिणींच्या तुटलेल्या हृदयातील भावना मी या गाण्यातून मांडल्या आहेत. या गाण्यातील कथा, भावना मनात खोलवर भिडणाऱ्या आहेत. जसे प्रेम संगीतप्रेमींनी ‘विश्वामित्रा’च्या पहिल्या गाण्याला दिले, प्रेक्षकांची तीच पसंती या गाण्यालाही मिळेल.’’

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वैत मसूरकर दिग्दर्शित 'छबी' चित्रपट २५ एप्रिलला.....अभिनेता समीर धर्माधिकारी, अभिनेते मकरंद देशपांडे यांची मध्यवर्ती भूमिका

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...