महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण पुरस्कारांमध्ये यंदा एक नवा पुरस्कार… पहा, समीक्षकांची कोणाला मिळणार पसंती.


झी टॉकीजच्या प्रेक्षकांना दरवर्षी नवीन वर्षात उत्सुकता लागून राहिलेली असते ती म्हणजे *‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’* या पुरस्कार सोहळ्याची. लवकरच या पुरस्कारांची घोषणा होणार आहे. झी टॉकीज या वाहिनीवर हा पुरस्कार सोहळा पाहता येणार आहे. या पुरस्काराचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांनी ज्या चित्रपट व कलाकारांना पसंतीचा कौल दिलेला असतो त्यांनाच *‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’* या पुरस्काराने गौरवण्यात येते. प्रत्येक कलाकाराला मायबाप रसिकांकडून प्रेम हवं असतं. रसिक प्रेक्षकांकडून मिळणारी दाद त्यांना हवी असते. त्यामुळे वर्षभरात प्रदर्शित झालेल्या सिनेमांमधील कलाकार, दिग्दर्शक, गायक यांच्यासह विविध विभागांसाठी नामांकने जाहीर केली जातात. प्रेक्षकांनी दिलेल्या पसंतीचा कौलच यंदाचा *‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’* त्या नावावर शिक्कामोर्तब करत असतो. नव्या वर्षातील या पुरस्कारावर कोण नाव कोरणार याची चर्चा आता सुरू झाली आहे. प्रेक्षकांची पसंती कलाकारांना जेवढी महत्वाची असते तितकाचा सन्मान त्यांना समीक्षकांनी केलेल्या मूल्यमापनातून मिळत असतो. त्यामुळे यंदा *‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’* या पुरस्कारांमध्ये एक नवा पुरस्कार दिला जाणार आहे. समीक्षक पसंती पुरस्कार हा विभाग यंदा नव्याने समाविष्ट केला आहे. गेल्या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमधून *सहा विभागांची* निवड यासाठी करण्यात आली आहे. यामध्ये *समीक्षकांच्या* नजरेतून, *सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट लेखक आणि सर्वोत्कृष्ट गीतकार* यांना *‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’* (समीक्षक पसंती) हा पुरस्कार देण्यात येणार आहे. समीक्षकांची पसंती मिळवण्यात कोण यशस्वी ठरणार याची कलाकार आणि प्रेक्षकांनाही कमालीची उत्सुकता आहे.
झी टॉकीज वाहिनी नेहमीच प्रेक्षकांना नवं काहीतरी देण्यासाठी पुढाकार घेत असते. त्याचप्रमाणे चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे कौतुक करण्यासाठी पुरस्कार सोहळ्याचा मंच खुला करत असते. प्रेक्षक आणि कलाकार यांच्यातील दुवा बनण्यासाठी झी टॉकीज वेगवेगळ्या संकल्पना राबवते. अनेक चांगले चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहता यावेत यासाठी झी टॉकीज पुढाकार घेते. जसे प्रेक्षक चांगले चित्रपट पाहण्यासाठी आतूर असतात तसेच कलाकारही प्रेक्षकांची दाद मिळावी यासाठी उत्सुक असतात. नेमकाच हाच धागा झी टॉकीज वाहिनीच्या *‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’* या पुरस्कारांमुळे विणला जातो. गेल्या अनेक वर्षापासून *‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’* हा पुरस्कार सोहळा यशस्वी करण्यात झी टॉकीज या वाहिनीने बाजी मारली आहे.
प्रेक्षकांची पसंती कोणत्या कलाकाराला किंवा चित्रपटाला मिळणार याकडे तर सर्वांचे लक्ष लागलेले आहेच पण यंदा झी टॉकीज वाहिनीने प्रथमच जाहिर केलेला *समीक्षक पसंती पुरस्कार* कोण पटकावणार याचीही चर्चा मराठी सिनेविश्वात रंगली आहे. चित्रपट किंवा कलाकार जसा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणे महत्वाचे असते तसाच तो समीक्षकांच्या कौतुकास पात्र ठरणेही यशाचे कारण ठरत असते. समीक्षक विविध दृष्टीकोनातून चित्रपट पाहत असतात. त्यामुळे तज्ज्ञ समीक्षकांच्या नजरेतून यंदा कोण अव्वल ठरणार हे लवकरच जाहीर होणार आहे.

यंदा समीक्षक पसंती स्पर्धेत चित्रपट विभागांमध्ये गोदावरी, आत्मपॅम्फलेट, श्यामची आई, तेंडल्या आणि वाळवी हे चित्रपट आहेत. तर समीक्षक पसंतीच्या नामांकनात दिग्दर्शक विभागासाठी निखिल महाजन, आशिष बेंडे, सुजय डहाके, सचिन जाधव व नचिकेत वाईकर, परेश मोकाशी यांच्या नावांची वर्णी लागली आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता या विभागात जितेंद्र जोशी, ओम भूतकर, स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे ही नावं स्पर्धेत आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या विभागातून नामांकनात गौरी नलावडे, गौरी देशपांडे आणि नीना कुलकर्णी यांची नावे आहेत. सर्वोत्कृष्ट लेखक म्हणून नामांकन यादीत निखिल महाजन आणि प्राजक्त देशमुख, परेश मोकाशी, सुनील सुकथनकर, सचिन जाधव आणि नचिकेत वाईकर, मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी, सुधाकर रेड्डी यंकट्टी आणि नागराज मंजुळे यांचा समावेश आहे. तर सर्वोत्कृष्ट गीतकार या विभागात जितेंद्र जोशी, गुरू ठाकूर आणि अजय अतुल यांची नावे स्पर्धेत आहेत.
यावर्षी प्रथमच जाहिर झालेले समीक्षक पसंती पुरस्कार कोण पटकवणार ह्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.*‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’* या पुरस्कार सोहळ्यात समीक्षक कोणत्या चित्रपटाला आणि कलाकारांना *‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’* (समीक्षक पसंती) हा किताब देणार हे लवकरच झी टॉकीज वाहिनीवर दिसेल.

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.