"वस्त्रहरण" नाटकाच्या ४४ वर्षाच्या निमित्ताने, सेलिब्रेटी कलाकारांच्या संचात रंगमंचावर ४४ मोजकेच प्रयोग सादर होणार.
मराठी माणूस आणि नाटक यांच एक अजब असं मेतकूट आहे. त्यात तो माणूस कोकणातला मालवणकडचा असेल तर दुधात साखर! कारण कीत्येक शतकांपासून इथे होत असलेली दशावतारी नाटके, शिमग्यातील खेळे, सोंगे, भारुडे इ. हि त्यानेच जपलेली आतापर्यंतची मनोरंजनाची सांस्कृतिक मूल्ये! या रंगभूमीवर आतापर्यंत शुध्द मराठी भाषेतून येत असलेली मराठी नाटके रसिक प्रेक्षक चोखंदळपणे पहात होता. पण कोकणात जन्मलेल्या एका मराठी मालवणी भाषिक माणसाने मालवणी बोलीभाषेतून “वस्त्रहरण” हे नवंकोर नाटक रंगभूमीवर आणून रंगमंच आणि रसिकांसाठी मनोरंजनाचे आगळेवेगळे नवे दालन उघडे केले.
१६ फेब्रुवारी १९८० साली कै. मच्छिंद्र कांबळी यांनी "वस्त्रहरण" या नाटकाचा पहिला प्रयोग केला. व्यावसायिक मराठी रंगभूमीवर इतिहास घडविलेल्या "वस्त्रहरण" या अजरामर कलाकृतीला आज १६ फेब्रुवारी रोजी ४४ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भद्रकाली प्रॉडक्शन्स सेलिब्रेटी कलाकारांच्या संचात रंगमंचावर ४४ मोजकेच प्रयोग सादर करणार असून लवकरच प्रयोग क्र. ५२५५ …. मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे.
Comments
Post a Comment