"भिशी मित्र मंडळ" चित्रपटात प्राजक्ता माळी सोबत झळकणार अभिनेत्री प्रिया बेर्डे.



       आजवर अनेक चित्रपट तसेच मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाची मोहोर रसिक प्रेक्षकांच्या मनात उमटवलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून  "भिशी मित्र मंडळ" या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. नुकतेच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला पुणे येथे सुरुवात झाली असून त्यामध्ये आता अजुन एका    अभिनेत्रीची वर्णी लागली आहे आणि त्या अभिनेत्री म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे.

अमोल कागणे आणि शरद पाटील हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत तर किरण कुमावत, लक्ष्मण कागणे, विनया मोरे, अजिंक्य जाधव, अक्षय बोडके आणि गौरी पाठक हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. सागर पाठक लिखित, सुमित संघमित्र दिग्दर्शित या चित्रपटाचे चित्रीकरण आता लवकरच पुणे येथे सुरु होणार असून संजीवकुमर चंद्रकांत हिल्ली ये सिनेमाटोग्राफर म्हणून काम पाहणार आहेत. फिल्मा स्त्र स्टूडियो हे या चित्रपटाचे वितरण करणार आहेत.  

सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यानी आजवर अनेक चित्रपट,मालिकांमधून आपल्या अभिनयाची एक वेगळीच छाप त्यांनी उमटवली आहे. भिशी हा प्रकार विशेषत: महिला, कामगार आणि व्यापाऱ्यांमध्ये अधिक प्रचलित आहे. धमाल, कॉमेडी  आणि निखळ मनोरंजक कथानक असलेल्या या "भिशी मित्र मंडळ" चित्रपटात प्राजक्तासोबत आता सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे झळकणार असून अजुन कोणते कलाकार झळकणार यासाठी अजुन थोडी वाट पहावी लागणार आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वैत मसूरकर दिग्दर्शित 'छबी' चित्रपट २५ एप्रिलला.....अभिनेता समीर धर्माधिकारी, अभिनेते मकरंद देशपांडे यांची मध्यवर्ती भूमिका

"अंकुश" चित्रपटातून प्रसिद्ध व्यावसायिक राजाभाऊ आप्पाराव घुले यांचे सिनेनिर्मितीत पदार्पण.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...