'अस्मय थिएटर्स'चे 'मास्टर माईंड' नाटक रंगभूमीवर...



       मराठी रंगभूमीवर सध्या सस्पेन्स-थ्रिलर असे 'मास्टर माईंड' हे नाटक विशेष लक्ष वेधून घेत आहे. 'अस्मय थिएटर्स'चे निर्माते अजय विचारे यांनी हे नाटक अलीकडेच रंगभूमीवर आणले आहे. या निमित्ताने मराठी रंगभूमीला एक आश्वासक नाट्यनिर्माता लाभला आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. विशेष म्हणजे, रसिकांच्या पसंतीस उतरलेली आस्ताद काळे व अदिती सारंगधर ही कलावंतांची जोडी या नाटकात भूमिका साकारत आहे. आतापर्यंत तीन नाटकात एकत्र दिसलेल्या या जोडीने, 'मास्टर माईंड' या नाटकाच्या निमित्ताने रंगभूमीवर हॅटट्रिक साधली आहे. 

       'मास्टर माईंड' हे नाटक प्रकाश बोर्डवेकर यांनी लिहिले असून, त्याची रंगावृत्ती सुरेश जयराम यांनी केली आहे. शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना, प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य आणि अशोक पत्की यांचे संगीत या नाटकाला लाभले आहे. मंगल केंकरे यांनी नाटकासाठी वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे. अभय भावे व शरद रावराणे हे या नाटकाचे सहनिर्माते आहेत. श्रीकांत तटकरे या नाटकाचे सूत्रधार आहेत. या नाटकातला खरा 'मास्टर माईंड' कोण, हे समजून घ्यायचे असेल, तर या नाटकाचा अनुभव घेणे क्रमप्राप्त आहे. सध्या या नाटकाचे मुंबई आणि इतरत्र जोरात प्रयोग सुरु असून, या निमित्ताने एका आगळ्यावेगळ्या नाटकाचा आस्वाद घेण्याची संधी रसिकांना मिळत आहे.  

Comments

Popular posts from this blog

विकास विलास मिसाळ दिग्दर्शित "कासरा" येतोय, ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.

समाजासाठी झुंजार लढा देणाऱ्या ‘युवानेता’ चित्रपटाचा पोस्टर झाला लॉंच...

"पीफ" मध्ये "जिप्सी" चित्रपटासाठी बालकलाकार कबीर खंदारेने पटकावला "स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर सन्मान.